पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण इतिहासांत हा अत्यंत महत्त्वाचा काळ होऊन गेला असेच म्हणावें लागेल. इतके अनेक ग्रंथकार असलेला हल्लींच्या काला खेरीज दुसरा काल नाहीच. ग्रंथोत्पत्तीची ठिकाणे अनेक आहेत. पुणे जिल्हा तर मुख्य महत्त्वाचे ठिकाण होतें असे म्हणण्यास हरकत नाहीं. निळोबा याच जिल्ह्यांतले. सर्व महाराष्ट्रभर एक तऱ्हेचें वाता - वरण उत्पन्न होण्यास निरनिराळ्या ठिकाणच्या कवींमध्ये एक दृष्टि पाहिजे ती उत्पन्न झाली होती; पण सहकार्य उत्पन्न झालें नव्हतें. अन्योन्य परि- चय होता किंवा नव्हता याविषयीं फारशी शंका नाहीं. अनेक कवीचा रामदास - तुकारामांशी प्रत्यक्ष संबंध आला आहे. पंढरीस वाऱ्या व्हाव- याच्या निमित्ताने या संतकवींच्या एकमेकांशी ओळखी होतच होत्या; व रामदासांन्या शिष्य मंडळांनी जी कविता निर्माण केली तींत तर एकाच ठिकाणाहून स्फूर्ति उत्पन्न झालेली होती. संतकवींच्या प्रयत्नांत सदृश वातावरण उत्पन्न झाले, पण सहकार्य उत्पन्न झालें नाहीं हें, अनेक कवी एकच पुस्तक भाषांतराला घेत यावरून सिद्ध होतें. त्यांच्यांत सांघिक कार्याची भावना असती तर वायास यापेक्षां देखील निराळे स्वरूप आले असतें. पुष्कळशा शक्तीचा अपव्यय झाला; वारकरी संप्रदाय हा वैयक्तिक प्रयत्न करणाऱ्या मंडळीचा संघ होता तर रामदासी संप्रदाय एकाच संघाच्या अनेक ठिकाणी एका तंत्राने चालणाऱ्या शाखा पसरवूं पहात होते. वामनाचा व रामदासांचा परिचय असावा असें त्या दोघांविषयींच्या आख्यायिकां- बरून वाटतें. रामदास वामन पंडितांस "यमक्या वामन" म्हणत आणि पंडितास आपले समा- धान करून घ्यावयासाठी दक्षिणेकडे जाण्यास रामदासांनीच सूचना केली. तुकारामबोघांवर वामनपंडिताने प्रशस्तीच लिहिली आहे. यावरून ही सर्व मंडळी एकमेकांस भेटत असावी आणि ७२ यामुळे सर्वसामान्य असें वातावरण उत्पन्न झाले होतें यांत शंका नाहीं. रामदासी मठांची व्याप- कता रा. भावे (महाराष्ट्र सारस्वत पृ. २०८ ) येणेंप्रमाणे वर्णन करितात. - "या सर्व मठांचे आदिपीठ चाफळ येथे श्री समर्थ रामदासस्वामी स्वतः हुजूर राहात. राम- दासाचा पट्टशिष्य कल्याण याला सीना नदीच्या कांठी डोमगांव येथे मठ स्थापून दिला होता. क्रमानें दुसरा शिष्य उद्धव नाहीं हें चुकलें ! वास्तविक पहातां समर्थांचा पहिला शिष्य उद्भव. यास दोन मठ स्थापून दिले होते, एक गोदेच्या पूर्वेला टाकळी येथें व दुसरा गोदेच्या पश्चिमेस इंदूर येथे. हें इंदूर म्हणजे पेशव्यांनी आपल्या एका सरदाराची जेथें स्थापना केली तें उत्तर हिंदुस्थानांतले इंदूर नव्हे. हें इंदूर म्हणजे मोंग- लाईतले निजाम हैद्राबादजवळचें इंदूर, कांहीं दिवस उद्धवानें या मठांत रहावें व कांहीं दिवस टांकळीच्या मठांत असावे अशी गुरुजींची त्यास अनुज्ञा असे. अहमदनगरजवळ दादेगांवास देव- दास यास, वन्हाडांत कारंजे येथे बाळकराम यास, औरंगाबादेजवळ भालगांवास त्र्यंबक गोसावी यास असे मठ स्थापून दिले होते. तसेंच काशीस रामचंद्र, रामेश्वरास हनुमान, गोमांतकांत गोविंद, सावंताच्या वाडीकडे संभुस्वामी या शिष्यांचे मठ होते. समुद्रकांठालाहि स्वामींचे मठ होते. दंडाराजपुरीवर त्रिंबक गगनीची नेम- णूक केली होती. सुरतेकडे जनार्दन व द्वारकेकडे हरिस्वामी हे होते. नदीकांठ, कडेपठारे आणि डोंगरी ठिकाणें हीहि यांच्या मठस्थापनेंतून सुटली नव्हती. श्रीशैल्य शिखरावर कोदंड रामाचा मठ, बद्रीकेदारी दयाळाचा मठ, औंढया पर्वतावर बल्लाळाचा, सह्याद्रीच्या डोंगरांत अनंतबुवाचा असे अनेक मठ जिकडे तिकडे होते; याशिवाय नारायणबुवा चक्रपाणी, रायचूर प्रांतांतले सदा- शिव, श्रीरंगपट्टणाकडे शंकर गोसावी, तेलंगणांत