पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७७३ есл अल्पानुभवी मुळींच दिसत नाहीं. रामदासांच्या दासबोधाकडे पाहिलें असतां त्यांत खोल मानस- शास्त्र दिसून येतें आणि ते ग्रंथावरून घेतलेले दिसत नसून अनुभवानें तयार झालेले दिसतें. या काळांत ख्रिस्ती चळवळ होती व ती मराठी वाङ्मयोत्पादनाकडे वळली होती; महा- नुवाभांचें वाङ्मय पूर्वीचें जरी बरेंच होते तरी या काळांतहि बरेंच झालें. महानुभावांचे उपदेश घेणारांत ब्राह्मण होतेच; व लिंगाईतांचे उपदेश घेणारांमध्येंहि होते. असे ब्राह्मण रामदासांचेहि शिष्य होते असें दिसून येते. अशांमध्ये जयराम स्वामी वडगांवकर यांचें नांव प्रामुख्यात्वें देतां येईल. कानडीतून मराठी भाषांतर करण्याची क्रिया होत होती याला पुरावा चंद्रात्मज रुद्र याचा आहे. एवंच या काळचें मराठी वाङ्मय अनेक ओघ मिळून वाढत होतें. शिवकालीन एकंदर वाङ्मयाचे वर्गीकरण करूं लागल्यास त्यांत खालील प्रकार दिसून येतात- (१) बखरींची रचना त्या वेळेस होत होती. (२) ऐतिहासिक संस्कृत काव्यास सुरुवात झाली होती. म्हणजे कल्हणाच्या राजतरंगिणीनंतर ऐतिहासिक संस्कृत काव्य प्रथम महाराष्ट्रांतच उत्पन्न झालें होतें. हें राजाश्रयानें उत्पन्न झालें होतें. (३) राजव्यवहारकोश तयार होऊन भाषेचें मुसुलमानी स्वरूप काढून टाकून तिला संस्कृत भाषेचें पाठबळ देण्यासाठीं निश्चित प्रयत्न झाला. (४) मराठी भाषेतील ग्रंथांमध्ये संस्कृत शब्द जसेच्या तसे घेऊन भाषेला अगदी अर्वाचीन स्वरूप देण्यांत आलें. (५) मराठी काव्यामध्यें ज्याला परमार्थाचा गंध नाहीं असें लोलिंबराजाचें आपल्या रत्नकला नांव दिलेल्या मुसलमान बायकोबरोबर केलेले ७१ शिवकालीन वाढायासंबंधों वातावरण विलासवर्णन करणारे अगदीं स्वतंत्र शृंगारिक काव्य निर्माण झालें होतें. (६) महाभारत, रामायण, भागवत, योग- वासिष्ठ इत्यादि ग्रंथांची भाषांतरे झाली. (७) मराठी शब्दकोशास सुरुवात झाली, ती जुन्या मराठीतील शब्दांचे स्पष्टीकरण करण्या- साठी झाली. (८) स्त्री कवयित्री झाल्या एवढेच नव्हे तर मठाधिपती झाल्या. (९) अलिगोरिकल म्हणजे क्रियापरंपरा रूप- कानें दाखविणारी कविता तयार होऊं लागली. उदाहरणार्थ- हरिदासाचें मनःश्चंद्रबोध हैं काव्य सांगतां येईल. (१०) महाराष्ट्राचे वैभव सर्व हिंदुस्थानाला कळावे म्हणून हिंदी व फारशी कवींना देखील आश्रय देण्यांत आला. (११) नाटकें चालूच होतीं. नटांचा उल्लेख दासबोधांत देखील आला आहे. तुकाब्रह्मानंदाचें नाटक रामायण हा एक प्रत्यक्ष ग्रंथ आहे. (१२) पोवाडे करण्याऱ्या कवींनां राजाश्रय मिळू लागला. अफजुलखानवधाचा पोवाडा करण्या- साठी तर कवीस मुद्दाम पाचारण केलें गेलें. (१३) भक्तिवाङ्मय तर जोरांत होतें. या प्रकारचे अत्यंत श्रेष्ठ वाड्मय उत्पन्न करण्याचे श्रेय तुकारामास आहे. (१४) धर्मप्रचारास संघटित स्वरूप देण्याचा प्रयत्न अनेक मठ स्थापून रामदासांनी केला. (१५) निदान पंचवीस ठिकाणी तरी मराठी वाङ्मय तयार होऊन ते स्थानिक लोकांच्या बोधा- साठी वापरले जात होते. ज्या ठिकाणी वाङ्मय उत्पन्न होत होते ती ठिकाणे पुढे दिली आहेत- (१६) लिंगायत पंथीयांना देखील आपल्या- मध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न झाला. ह्रीं सर्व लेखकांचीं नांवें आणि त्यांचीं रहा- ण्याची स्थळे पहातां मराठी वाङ्मयाच्या