पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण करण्याकडे वामनपंडिताची बुद्धि वळण्याऐवजीं ती यथार्थदीपिका लिहिण्याकडे वळली. त्याला राजदरबारी प्रशंसा मिळविण्याची आकांक्षा नसून संतमंडळी व इतर ग्रंथकार आणि वाचक वर्ग यांच्या कडूनच · प्रशंसा मिळविण्याची आकांक्षा होती. प्रतिस्पर्धी म्हणून भोवतालच्या मंडळीकडे तो पहात नव्हता तर त्याच्या मनांत ज्ञानेश्वराशी स्पर्धा उत्पन्न होत होती. मोठे कवी पूर्वीच होऊन गेले; आतां स्पर्धा तरी कोणाशी कराव- याची अशा भावनेने भट्टनारायण किंवा जगन्ना- थराय हे ज्याप्रमाणें । “काव्यालाप सुभाषितव्यसनिनस्ते राजहंसा गताः ता गोष्ठ्यः क्षयमागता गुणलवश्लाध्या न वाचः सताम् ॥ सालंकाररसप्रसन्नमधुराकाराः कवीनां गिरः । प्राप्ता नाशमयं तु भूमि वलये जीयात् प्रबंधो महान् ॥ किंवा 66 " दिगंते श्रूयन्ते मदमलिनगंडा : करटिन: करिण्यः कारुण्यास्पदमसमशीलाः खलु मृगाः अशा तऱ्हेचे उद्गार काढीत होते त्याप्रमाणेच वामनाने काढले आहेत. " प्राकृतग्रंथकर्तारो ये तु वर्षशतात्पुरा त्यक्तदेहास्तैर्यथोक्तं न तथा ज्ञानिनोऽधुना ' उद्गार यथार्थ होते असें मात्र नाहीं. कारण एक ज्ञानेश्वर वगळला तर गीतेवर चांगले भाष्य- कार याच वेळेस होऊन गेले, व या कालचें वाङ्मय जितकें विस्तृत आहे तितकें कोणत्याच काळचें नाहीं. तथापि वामनपंडितास बऱ्याच सम- कालीन लोकांची माहिती नसावी व बरीच मंडळी वामन पंडितानंतर विख्यात झाली असावी असें दिसतें. तथापि वामनाच्या उद्गारांवरून एक गोष्ट मात्र दिसते आणि ती म्हटली म्हणजे "ज्ञानी" वर्गात तो प्राकृत ग्रंथकारांनां घालतो ही होय. म्हणजे प्राकृत ग्रंथकारांस आपण कोठे तरी पुढे जात आहे ही भावना उत्पन्न होऊ लागली होती. व ती त्यांची भावना एका दृष्टीनें यथार्थ होती. ७० जें मराठी वाङ्मय संतकवींचें होतें त्यांत वार- करी संतकवि आणि रामदासी असे दोन मोठे भेद पडतात. वारकरी संप्रदायामध्येच शिवराम स्वामीची गणना करता येईल. हा ग्रंथकार जरी फार जाडा होऊन गेला तरी त्याच्यामध्ये राम- दासासारखा निराळेपणा नाहीं. इतर संतकवि ज्ञानेश्वरापासून आलेलें वळण गिरवीत होते तर रामदासांनी निराळ्या प्रकारचा उपक्रम केला होता. थोडक्या वेळांत त्यांनी इतके मठ उत्पन्न केले होते कीं, आजच्या अत्यंत कर्तृत्ववान अशा माणसांस देखील आश्चर्य वाटल्याखेरीज रहाणार नाहीं. शिवाजीने आपल्या राज्याची स्थापना केली, त्याच्यापूर्वी त्याला अगोदरच लहानसें राज्य बापा- होती. पण रामदासास सर्व नवीन सृष्टि तयार कडून मिळाले होते आणि कर्ती माणसें मिळालीं करावयाची होती. रामदासांच्या अनुयायांत पूर्वीच मठाधिपति असलेली मंडळी आली होती हैं जयरामस्वामी, रंगनाथ स्वामी निगडीकर यांच्या उदाहरणांवरून सांगतां येईल. यावेळचे ग्रंथकार प्रवास पुष्कळ करीत होते असें दिसतें. जयराम कवीनें तंजावरपासून पन्हा- ळ्यापर्यंत प्रवास केल्याचे सांगितलेच आहे. वामन- पंडितानें मोगलाईत बाल्य घालविलें आणि पुढें काशीपासून मलयगिरीपर्यंत प्रवास केला, त्याची साक्ष त्यानेच दिली आहे. रामदासांनी बंगाल- पंजाबखेरीज सर्व हिंदुस्थानभर प्रवास केल्याचा पुरावा भरपूर आहेच ( रामदास व रामदासी, वर्ष ३, अंक २). जयरामाचा बराच प्रवास मराठी फौजांच्याबरोबर झाला, तरी तशी गोष्ट रामदास व वामन यांची नाहीं. त्यांनी भिक्षेवर किंवा स्वख- चनिच प्रवास केला असावा. तुकोबांनी फारसा प्रवास केला नाहीं. देहूपासून पंढरपूरपर्यंत ज्या वाऱ्या केल्या असतील तेवढ्याच तीर्थाटनें कर- ण्याबद्दल रामदासांचा उपदेश आहे. यावरून या काळांत बौद्धिक चळवळीत पडलेला वर्ग