पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मध्यबिंदु आहे. भाषांतरें या कालानंतर वाढलेली दिसत आहेत व कवीची स्वहृदयप्रकाशक काव्य- रचना कमी होत गेलेली आहे. एका प्रकारच्या काव्याचा या कालानंतर उत्कर्ष झाला तर दुसन्या प्रकारच्या काव्यास उतार झाला पण दोन्ही प्रकारच्या ग्रंथांचा माध्याह्न काल शिवकालच होय. हा अत्यंत उत्पादक काल होता. या वेळचा वाङ्मय संभार किती प्रचंड आहे याचा बोध केवळ मागे दिलेल्या कविनामांवरून कांहीं अंशी होईल पण पुरा होणार नाहीं. कित्येक संत- कवींनीं जे ग्रंथ अगर काव्यें केली त्यांची यादीच फार मोठी होईल. अशांमध्ये शिवराम - स्वामी, तुकाराम, वामन व रामदास ही मंडळी येतील. पुष्कळदां ग्रंथ एकच असतो पण तो मोठा असतो. अशांमध्ये शिवकल्याणाच्या भागवताच्या दशमस्कंधावरील टीकेचें नांव घेतले पाहिजे. या टक्ति जवळजवळ एक लक्ष ओव्या आहेत . म्हणजे हा ग्रंथच महाभारताहून मोठा होतो. या कालांतलें सर्व वाङ्मय उपलब्ध झालें नाहीं एव ढेंच नव्हे तर उपलब्ध झालेल्या वाङ्मयाचा शतांश देखील प्रसिद्ध झाला नाहीं असें म्हटलें तरी चालेल. व शिवाजीच्या काळांत झालेल्या वाङ्मयाचे ज्या वातावरणांत हैं वाङ्मय तयार झालें त्या वातावरणाचें प्रस्तुत प्रसंगीं दिल्याप्रमाणे अगदीं स्थूल अवलोकन केलें असतां हा वाङ्मयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काल होऊन गेला असें वाटल्याखेरीज रहात नाहीं. वाङ्मयाच्या बाबतींत हा जो महत्त्वाचा काल आहे तो एकंदरींत महाराष्ट्राचा कर्तृत्वाचा काल होय. या काळांत महाराष्ट्रीय कर्ते पुरुष दक्षिणच्या अगदी टोकांपर्यंत गेले होते आणि वाङ्मयाचे पुरस्कर्ते म्हणून ठाऊक झाले होते. शहाजी व व्यंकोजी हे संस्कृत कवींचे आश्रयदाते म्हणून प्रसिद्ध झाले होते. आणि शिवाजीनें उत्तरेकडील ६९ शिवकालीन वाङ्मयासंबंधी वातावरण हिंदी भाषेत कविता करणाऱ्या कवींसह आश्रय दिला होता आणि त्यामुळे भोंसले घराण्याची वाङ्मयास आश्रय देणारे म्हणून कीर्ति दिल्ली - पासून रामेश्वरापर्यंत पसरली होती यांत शंका नाहीं. तथापि मराठी वाङ्मयाकडे पाहिले तर मात्र हे वाङ्मय राजाश्रयाशिवायच वाढत होतें व याचे कारण शिवाजीचे औदासिन्य हैं खास नव्हतें. संस्कृत कवी व हिंदी कवी यांच्यापाशीं शिवाजी जर आश्रयदात्याप्रमाणें वागत होता तर मराठी संतकवींपाशीं तो शिष्याप्रमाणें वागत होता आणि त्यांच्याकडून प्रशस्तीचे शब्द मिळ- विण्या ऐवजीं शाबासकीचे शब्द मिळवीत होता, त्यामुळे संतकवींच्याकडे शिवाजी अगदी निराळ्या दृष्टीनें पहात होता यांत शंका नाहीं. व शिवा- जीची आपल्या देशांतील आणि भाषेतील ग्रंथकारां- विषयीं जीं लीन वृत्ति उत्पन्न झाली होती तिचें कारण राजाश्रयाविषयीं निस्पृहता हेंच प्राधान्याने होतें असें म्हणतां येईल. संतकवींस राजाश्रय नको होता. या सर्व मंडळीस पोट होतेंच पण तें भिक्षेवर म्हणजे सार्वजनिक आश्र- यानें भरत होतें. व जनता त्यांस सत्पुरुष म्हणून भिक्षा घालावयास तयार होती. ज्यांस आपण संतकवी म्हणत नाहीं तर केवळ कवी असें म्हणूं, अशांपैकी वामनाकडे पाहिलें तरी तोच देखावा दृष्टीस पडतो. शिवाजीनें रामदासांस राज्य लिहून दिलें होतें व तें त्यांनी परत केलें म्हणून कथा आहे, व रामदासांनी जवळ जवळ शिवाजीच्या अंतकाळापर्यंत आपल्या मठासहि कांहीं घेतलें नव्हतें. चाफळच्या उत्सवाला शिवाजी कांहीं वर्गणी देई तेवढीच, हें "चाफळ संस्थानचे उत्पन्न" या राजवाड्यांच्या लेखांत दाखविलेंच आहे (रामदास व रामदासी, वर्ष ३) म्हणजे मराठी कवींनी तरी आपल्यापुरता राजाश्रय निरपेक्ष संप्र- दाय स्थापन केला होता. व वामन पंडि परंपरेंतच समाविष्ट झाला. राजे लोकांची प्रशंसा