पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ६८ हैं आश्चर्य आहे. या प्रसंगांत आलेली पुष्कळशी माहिती आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हती. श्रृंगारपूर व पाली येथील संस्थाने शिवाजीनें ताब्यांत घेतली. येथपर्यंतच शिवभारतांत मज- कूर आहे. पुढील अध्याय अर्धवटच बंद होऊन शिवभारत संपलें. पवाडे लिहिण्याची चाल जुनीच होती. शिवा जीच्या काळांत तिला उत्तेजन मिळाले असावें एवढेच तव्हे तर पवाडे रचण्यासाठी कवींस माहिती दरबारनें पुरविली असावी असें दिसतें. त्याशिवाय प्रतापगडच्या उर्फ अफजुलखानवबाच्या पोवाड्यांत बन्याच व्यक्तीचा उल्लेख आला नसता. रा. भावे यांनी या पवाड्याची कोणची प्रत पाहिली हैं मला समजलें नाहीं. बहुतकरून त्यांनी शाळि ग्रामी आवृत्ति ग्राह्य धरिलीसें दिसत आहे. कैलासवासी भावे यांस आधारग्रंथ देण्याचें इति- हास लेखकाचे कर्तव्य याची जाणीव अजीबाद नव्हती आणि त्यामुळे त्यांची विधाने तपासणे हें पुष्कळ जड जातें आणि त्यांत अभ्या सकाचा वेळ विनाकारण जातो. अफजलखा- नाच्या वधाची जी प्रत कै. भावे यांच्यासमोर होती त्या प्रतीत या वाड्याला पुष्कळ च अर्वा चीन संस्कार झाला आहे असें दिसतें. हा पवाडा विविधज्ञानविस्तारांत दोनदां छापला गेला. विस्तारांतील पवाडा अधिक जुनाट दिसतो. व ज्या पुराव्यावरून हा पोवाडा अफझलखान वधानंतर लिहिला गेला असें दिसत आहे तो पुरावा भावे यांनी घेतलेल्या आवृत्तींत पुसटून टाकला गेला आह. प्रतापगडच्या युद्धाचा पोवाडा (वि. विस्तार) यांत पोवाडे गाणाऱ्या कवीला मुद्दाम बोलावून पोवाडा रचावयास सांगितल्याचा उल्लेख आणून आहे. "बाइनें ( जिजाबाई में ) शाहीर बोलाविला || आमीनदास कवीश्वर 'त्याने कडाका गाईला ॥ दिला एक इनाम गांव इनाम गांव बक्षीस त्याला ॥ चढविले हाताला, लंगर सोन्याचे दोन ॥ भाग मी राजाचें गाईन ॥ ११ ॥” या पोवाड्यावरून केवळ पोवाडा रचण्याबद्दल गांव इनाम मिळत होते असें समजण्याचे कारण नाहीं. शाहीर व गारुडी यांच्यामध्ये आपणांस श्रोत्याने किंवा यजमानानें कोणतेंहि पारितोषक देण्याच्या अगोदरच मोठे बक्षीस दिल्याचे बोलून ते लागू करूं पहाण्याची संवय सुप्रसिद्धच आहे. शिवकालीन राजाश्रयी वाङ्मयाचें वरूप वर दिलेच आहे, आता एकंदर वाङ्मयाचें वैशिष्ट्य दाखविण्यासाठी थोडेसें लिहितों. संस्कृत ग्रंथांची भाषांतरे करण्याचा काल शिव- कालापूर्वीच सुरू झाला होता. मुक्तेश्वरानें महा- भारताचे भाषांतर सुरू केलें त्यांत पूर्वीच्या भाषां- तरकारांवर टीका आलेली आहे. ज्ञानेश्वरी व भाग- वताच्या दशमस्कंधावरील टीका यांस भाषांतरें म्हणतां येणार नाहीं तर स्वतंत्र ग्रंथच म्हटलें पाहिजे. तथापि या टीकाग्रंथांत व भाषांतरांत एक साम्य आहे तें म्हटले म्हणजे आधारासाठी एखादा ग्रंथ धरून लिहिणें हैं होय. तथापि या कालांत जी स्वतंत्र ग्रंथरचना झाली तींत तुकारामाचे आख्या- नेतर अभंग रामदासाच्या ग्रंथांतील आख्यान- भाग सोडून इतर भाग यांस प्राधान्य दिले पाहिजे. संतकवींनी आपल्या ईश्वरविषयक भावना प्रगट करणें व भोवतालची परिस्थिति लक्षांत आणून जे विचार येतील ते प्रगट करणे ( धीट काव्य ) यांस स्वतंत्र काव्यात्मक ग्रंथरचना म्हणतां येईल. याप्रकारची रचना संतकवींकडून बरीच झाली आहे. तसेंच बोलिंबराजानें रत्न कलेवर लिहिलेल्या शृंगारिक काव्यास स्वतंत्र काव्य म्हणतां येईल. तसेंच "अलिगोरी" सारखी कविता रचना झालीच आहे. हा काळ संतकवींच्या स्वतंत्र ग्रंथरचनेच्या काळाचा तसाच भाषांतरोत्पत्तीच्या काळाचा