पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रांताच्या जहागिरीचा अधिकार शहाजीनें सोंप- विला. शिवाजी अनेकविद्यानिपुण होता. राज- नीति, पुराणें, श्रुति, स्मृति, भारतरामायण, शास्त्रे, काव्य, वस्तु, निरनिराळ्या भाषा, पद्य, लष्करी- विद्या वगैरे त्याला येत होतें. परमानंद म्हणतो- प्रतिभेशिवाय काव्य उत्पन्न होत नाहीं. यानें अशुभ चिन्हांचा उतारा बहुधां महाभारतांतून घेतला आहे. लढाईचें वर्णन परमानंद चांगले करतो. खळद बेलसरची लढाई, शिरवळची लढाई, पुरंदरची लढाई शिवाजी व आदिलशहा यांच्यांत झालेली सविस्तर दिली आहे, हें वर्णन नवीन आहे. यांचा उल्लेख व थोडीशी माहिती फक्त दुसरी- कडे आली आहे. परमानंदाला तत्कालीन आदि- लशाही, मोंगलाई, शिवाजीचें राज्य यांतील प्रसिद्ध व्यक्तींची ओळख चांगली असावी. निदान हैं भारत रचतांना त्याला सरकारी कागदपत्रे तरी पहावयास मिळाली असावीत, कारण तो अनेक सरदारांची प्रत्यक्ष नांवेंच देतो. हीं खरी कां खोटी हे ठरविण्यास प्रत्यंतर पुरावा पाहिजे; पर- मानंद महाभारतांतील व्यासवचनें (म्हणी ) देतो (अ. १३ श्लो. १८). तसेंच शुक्र, वरुण वगैरे राजनीतीहि उद्धृत करतो (अ. १६); आपल्या म्हणण्यास चांगली उदाहरणे देण्याचें परमानंदास साधलें आहे. तसेंच राजनीति व लोकव्यवहार कसा असावा हैंहि तो मधून मधून देतो (अ. १३ आणि अ. १६). त्याला उत्कृष्ट उपमा साधतात. (अ. १३ श्लो. ८४–८७ व अ. १४ श्लो. ४-८); शहाजीची कैदेंतून सुटका शिवाजीनें व संभाजीनें महाराष्ट्र व कर्नाटक या दोहोंकडे आदिलशहा - विरुद्ध एकदम चढाई केल्यामुळे लवकर झाली ही माहिती नवीन आहे; अल्ली आदिलशहानेंच शिवाजीला जिवंत पकडून आणण्याची आज्ञा अफझलास केली व त्याप्रमाणें मनांत कपट ठेवून खान शिवाजीवर चालून आला होता हैं परमानंद ६७ शिवकालीन वाड्डायासंबंधी वातावरण स्पष्ट सांगतो. खानानें तुळजापूरच्या देवीचा अप- मान केला, खानानेच प्रथम महाराजांवर वार केला व दगा दिला असें परमानंद सांगतो. मध्यान्हीं हा खानाचा वध झाला. त्यानंतरचें सृष्टीचे वर्णन परमानंदानें रावणाच्या किंवा कंसाच्या वधानं- तरच्या पौराणिक वर्णनाबरहुकूम केलें आहे. कोल्हापूरनजीकच्या रुस्तुम - जमान व शिवाजी यांच्यांतील युद्धाची इतकी साम्र हकीकत दुसरी- कडे आढळत नाहीं. शास्ताखानाचे सरदार (राय- बागीण यांत आहे) व त्याची मोहीम आणि उंबरखिंडीची लढाई ही माहिती भरपूर दिली आहे. उंबरखिंडीच्या लढाईचा काल व स्थल यांची माहिती तर अश्रुतपूर्व आहे. बखरकारांनी या लढाईचा अत्यंत घोटाळा केला होता. तोफांच्या लढायांत व आरमारांत फिरंग्यादि परकीय लोक निष्णात होते असें परमानंद सांगतो. शिवाजीनें (अध्याय ३० श्लोक १-४ ) राजापुरास खणत्या लावून गांवांतील खंडणी वसूल केली होती. पन्हाळावेढा, शिद्दी जोहराने घातलेला, यांतील लष्करी दृष्टीनें दिलेली माहिती बखरींत आढळत नाहीं. सहारों लोकांचें पायदळ घेऊन शिवाजी एके रात्री पहिल्या प्रहरीं पालखींत बसून पन्हा- ळ्याहून निसटून विशाळगडास गेला. त्या रात्री पाऊस पडत असल्यानें व भवानीच्या मायेनें शिद्दीचे सैन्य गाफील झालें होतें. विशाळगडास पूर्वीच जोहाराच्या एका तुकडीने वेढा दिला होता पण तो फोडून शिवाजी गडांत गेला. नंतर जोहाराने पाठलागासाठी पाठविलेला मसूद यानें विशाळगडास येऊन व तेथील आपले पूर्वीचें सैन्य गोळा करून कडेकोट वेढा घातला. पण शिवाजीनें सतत हल्ले करून मसुदास पिटाळून लावलें व तो गेल्यानंतर पुणे प्रांतांत शास्ताखा- नाने धुमाकूळ घातल्याचे समजल्यावरून तो विशाळगड सोडून पुण्याकडे गेला. या संबंध प्रसंगांत बाजी प्रभूचें नांव कोठेंहि आलेलें नाहीं