पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण शिवकालीं शिवाजीची कीर्ति काशीपर्यंत जाऊन तेथील हिंदुलोकांत त्याचें चरित्र जाणण्याची उत्कृष्ट इच्छा उत्पन्न झाली होती. तसेंच शिवा- जीच्या चरित्रावर शिवभारतासारखें प्रखंड व शिव- राज प्रशस्तीसारखीं छोटीं काव्ये करण्याइतपत शिवाजीची कामगिरी त्याच्या हयातीतच वाढीस लागली होती. तुळजाभवानी व शंभुमहादेव यांस परमानंद विशेष प्रकारें नमन करतो. मालोजीची जहागीर पुणे प्रांतीं होती. तो दौलताबादच्या निजा- मशाहाचा मांडलिक होता. परमानंद ज्या उपमा देतो त्या उपमा चांगल्या व समर्पक असतात. (उ. अ. १, श्लो. ५७-५८) परमानंद आपल्यास “कबीन्द्र” म्हणवितो व शिवभारतास “अनुपु- राण” म्हणून “शतसहस्रसंहिता " हि म्हणतो. त्याच्या मनांत महाभारताप्रमाणें हा ग्रंथ १ लक्ष करावयाचा होता. परंतु हल्लीं सांपडलेला ग्रंथ फारच अल्प आहे. यांत १५८३ शकापर्यंत म्हणजे राजापूरची खंडणी घेतली व शृंगारपूर काबीज केलें इतकेंच शिवचरित्र आले आहे. भातवडीच्या लढाईतील जयामुळे निजाम- शहा, मलिक अंबर व शहाजीचे चुलत भाऊ याचा मत्सर करूं लागले म्हणून शहाजीनें निजामाची नौकरी सोडली असें परमानंद पुढील शहाजीचे स्थित्यंतर वर्णितो. ही माहिती तरी नवीन आहे. इब्राहिम आदिलशहाने शहाजीस आपल्या दरबारी बोलावून नेलें, शहाजीनें आदिलशहास बरेच प्रांत मिळवून दिले. जिजाबाईला एकंदर ६ पुत्र झाले त्यांत संभाजी व शिवाजी एवढेच जगले ही एक निराळीच गोष्ट तो सांगतो. परमानंद हा शिवाजीला अवतारी पुरुष म्हणतो. तो शिवाजीस विष्णूचा अवतार म्हणतो तर पुढच्या लेखकांनी त्याला शंकरावतार म्हटले आहे. तो म्लेच्छास दैत्य म्हणतो. त्यांच्यामुळे प्रायः क्षत्रिय नष्ट झाले. म्लेंच्छांच्या जुलुमानें पृथ्वी ब्रह्मदेवास शरण गेली. ६६ ती म्हणते यज्ञ बंद पडले, ब्राह्मणसत्कार, वेदा- ध्ययन बंद झालें. धर्मनिर्बंध मोडले, म्लेच्छ धर्म वृद्धि पावत आहे, सज्जनांचा छळ होत आहे, गोहत्या होते, साधूंचा व क्षत्रियांचा नाश होतो आहे. ब्रह्मदेवाने विष्णूची स्तुति केली, विष्णूनें शहाजी जिजाईच्या पोटीं अवतार घेण्याचे कबूल केलें. जन्म घेण्यापूर्वी विष्णूनें जिजाबाईस आपलें साक्षात् दर्शन दिलें. शिवाजीचा जन्म झाल्यावर देवांनीं नगारे वाजविले व सर्वांनीं येऊन त्याचें स्वस्तिवाचन केलें ( श्री कृष्ण किंवा श्री राम जन्माचें पौराणिक वर्णन येथें हुबेहुब परमानंदा वठविलें आहे ). क्षत्रियाच्या षष्ठिपूजनास नांगर, तरवार, धनुष्य, कार्तिकस्वामी, गणपति यांची पूजा करीत असें याच्या वर्णनावरून दिसतें. सातव्या अध्यायांतील सर्व वर्णन रामायण व भागवतांतील राम कृष्ण यांच्या बाललीला वर्ण- नाची नक्कल आहे, पण ती चांगली साधली आहे. दौलताबाद (निजामशाही) मोंगलानें व आदि- लशहानें घेण्याचा भिन्न भिन्न प्रयत्न एकाच वेळीं केला पण मोंगलाचा डाव साधला ही नवीन माहिती. मुसुलमानांना परमानंद असुरवंशी म्हणतो. शहाजीची निजामशाही सोडून आदिलशाहीत जाण्याची व ती सोडून पुन्हां निजामशाहींत जाण्याची दोन खेपांची माहिती नवीन आहे. शहाजीच्या मनांत स्वतंत्र स्वराज्य स्थापण्याचें होतें व त्यानें तशी खटपट केली पण मोंगल व विजापूर यांच्या दोघांच्या रेट्यामुळे तें निष्फळ झाले म्हणून यापुढे शिवाजीच्याकडून ती खट- पट त्याने केली ही माहिती नवीन आहे. शहाजी बंगळूरास असतां शिकार, साधुसेवा, काव्यचर्चा, नृत्य, लष्करपहाणी, योगशास्त्र यांत आपला काळ घालवी. शहाजी काव्यपारंगत होता. शिवाजीला ७ व्या वर्षी मूळाक्षरें शिकविली. तो लेखनकर्मात पारंगत झाला. शिवाजीवर १२ व्या वर्षी पुणे