पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १६ वे (पृ. १०७-१०८) अशिष्ट वाङ्मयाचें शिष्टीकरण जेव्हां ग्रंथ पिढ्यान्पिढ्या प्रचलित राहतो तेव्हां त्याचें स्वरूप पाठांतरें उत्पन्न होऊन बदलूं लागते. सूतवाङ्मय ब्राह्मण वाङ्मय झालें. तें होतांना हीच क्रिया होत होती (पृ. १०८). प्रकरण १७ वें (पृ. १०९-११५ ) महाराष्ट्राची काव्यग्राहकता काव्याचा सामाजिक उपयोग समाजाच्या सुस्थितसि अवश्य असणाऱ्या गोष्टी गौरविण्या- साठीं आहे. काव्य समाजाची गरज आहे. तथापि समाज ज्या मानानें वाङ्मय ग्रहण करतो त्या मानाने समाजाची उच्चनीचता ठरते. समाजा- मध्ये अनेक ठिकाणांहून येणारे काव्याचे तुकडे जिरतात. ज्ञानेश्वर, महिपति, शिनदिनकेसरी, माणिकप्रभु, प्रेमाबाई, हरिकवि, काशीकवि, एक. नाथ, चोखामेळा, गोपाळनाथ यांची लोकांत पस- रलेली पदें (पृ. ११८). प्रकरण १८ वे (पृ. ११८-१२३ ) सामाजिक परिस्थिति, ग्रंथपरीक्षण आणि ग्रंथक्षेत्र ग्रंथाभिरुचि व ग्रंथक्षेत्र हीं त्याचप्रमाणे सामा- जिक कारणांनी मर्यादित झाली आहेत. अखिल हिंदुस्थानाशीं संबंधाच्या आवश्यकतेमुळे शास्त्रांची भाषा संस्कृत राहिली; व केवळ सामान्य ग्रंथ प्राकृतमध्ये झाले. जीं शास्त्रे संस्कृत भाषेच्या अनु- षंगाने निर्माण झाली ती मराठी भाषेला लागली नाहींत. ज्या सामाजिक वर्गाचा गौरव कवितेने झाला किंवा झाला नाहीं त्यांची कारणें (पृ.११८). प्रकरण १२ के ( पृ. १२३-१२७ ) ग्रंथाभिरुचि आणि ग्रंथविक्रय मराठी राज्यांत पुस्तकाच्या नकला करून विक- ण्याचा धंदा कसा होता याची माहिती नाही. अव्वल इंग्रजीतील ग्रंथप्रसिद्धीची माहिती. गोविंद रघुनाथ केतकर. आमच्या घरची हस्तलिखितें (पृ. १२३). प्रकरण २० वें (पृ. १२७-१२८ ) उपसंहार या पुस्तकांत अप्रत्यक्षमतव्यक्तीचे व परी- क्षणाचे प्रकार मांडले आहेत. इंग्रजी राज्यामध्यें नवीन शिक्षणामुळे संस्कृत ग्रंथांचे पुनरवलोकन निराळ्या दृष्टीने झाले, पाश्चात्य वाङ्मयाची ओळख झाली त्यामुळे जुनें साहित्यशास्त्र आणि नवीन कल्पना यांच्या एकीकरणानें निराळ्या तऱ्हेचें परीक्षणवाङ्मय तयार झालें आहे तें या पुस्त- काच्या उत्तरभागांत सांपडेल. (पृ. १२७).