पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५ तो सुद्धां अत्यंत विपुल आणि उग्र अशा ताम्रांनी (मोगलांनी) घेऊन आपल्या ताब्यांत सुरक्षित ठेविला होता (३२ व ३३). तो त्यांच्या - पासून महा बलवान् शिवाजी महाराजांनीं हां हां म्हणतां घेतला. त्यानंतर मधून मधून अलंग कुरंग, निगलवाडी येथे कडाक्याचें युद्ध झालें. अहिवंतगड, मार्केडगड, रवळा जवळा नांवाचे सुंदर व अजिंक्य विल्ले देखील आपले वडील बंधु जे शिवाजी महाराज त्यांनी काबीज केले (३४, ३५, ३६). त्याचप्रमाणे चामुंडगड, हरि- चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे सुद्धां निकराने लढून घेतले (३७), नंतर जीवधन नांवाचा यवनांचा मोठा किल्ला त्यांचा प्राणभूत असा होता तो किल्लासुद्धां महाराजांनी त्यांज- पासून घेतला (३८). जव्हार नांवाचें कोळ्यांचं जें प्राचीन राज्य तें विक्रमशहापासून महाराजांनी पराक्रमानें घेतलें (३९). त्याचप्रमाणें सोमदशहाचे रामनगर नांवाचें प्रख्यात राज्य शिवाचा अवतार जे शिवाजीमहा- राज त्यांनी सहज लीलेनें घेतलें (४०). महा- राजांनी प्रत्येक गडास नवीन नांव दिले ती कथा प्रसंगाने पुढे सांगेन. याप्रमाणे मी अल्पसें वर्णन केलें तें आपण(महाराजांनी) ऐकावें (४ १४ १।।). " “पन्हाळा नांवाचा आमच्या बादशहाचा अत्यंत विस्तीर्ण किल्ला बादशाहाशी सख्य ( तह) अस- तांहि (महाराजांनी) कसा घेतला व कां घेतला ? ज्याच्यावर धान्यें, वृक्ष, फळे, फलें, गाईची खिल्लारे, मीठ, तेल, गवत, नवें नवें नाना प्रकारचें सर्पण आहे; ज्याच्यावर सर्वत्र विहिरीच्या गोड पाण्याचें वैपुल्य आहे; जेथे मौल्यवान् टोलेजंग वाडे, घोड्यां"या पागा, हत्तीखाने, लोकांची घरे यांच्या सुंदर रांगा झळकत आहेत; जेथील बाजारपेठ देखील इतकी विस्तीर्ण आहे की, ती एक दुसरा समुद्रच भासते. ज्याच्यावर चतुरंग सेनेसहित शैकर्डो सेनापती(सरदार) हि आहेत; जेथें सर्व शिवकालीन वाड्मयासंबंधी वातावरण लेखक ( चिटणीस) नागोजी पंडित ( नागजित् ) सर्वांचे वेतन लिहीत भालदारांसह सभोंवतीं हिंडत असतो (४२ पूर्ण ४३, ४४, ४५,४६६४७). ज्याच्यावरील पहारेकरी लोक मध्यरात्री जाग- रूक असतात आणि मोठी घोषणा करतात, शिंगें व घंटा (तास) यांचा मधून मधून निनाद करून आणि तटांच्या आंत व बाहेर हातांत शेकडों लोक दिवटया मशाली घेऊन चांगलें उजाडेपर्यंत जागत असतात, अशा प्रकारचा अत्यंत बलाढ्य असा हा गड, ज्याप्रमाणें गरुड अति दुरून झडप घालून सापास झटकन पकडतो त्याप्रमाणें क्षणार्धात हस्तगत केला (४८, ४९ व १० ). तेव्हां एवढ्या ह्या कृत्याला दुष्कर असें कां म्हणूं नये ! आणि हें अचाट कृत्य दाजीस्वामींनी ( शिवाजी महाराजांनी) केलें (५१). ती सर्व हकीकत मला प्रथम ऐकावयाची आहे. मागाहून दुसरें वृत्त सांगावें." याप्रमाणे राजाने म्हटल्यावर त्या कवीनें त्यास पन्हाळगडचा ( स्वारीचा) सर्व वृत्तांत आरं- भापासून सविस्तर सांगितला. तो येणेंप्रमाणे (१२). "इंद्राच्या भीतीनें दीर्घकाल समुद्रांत बुडून राहिलेल्या मैनाकाप्रमाणे त्या पन्हाळगडास अत्यंत दयाळू शिवाजीमहाराजांनी धीर देऊन यवन- रूपी समुद्रांतून अशा प्रकारें वर काढलें." श्रीजय रामकविविरचित शिवचरिनांतील पन्हाळगड ग्रह- णाख्यानाचा पहिला अध्याय समाप्त. यापुढील हकीगत आपल्या दृष्टीनें अप्रकृत आहे आतां दुसऱ्या एका कवीकडे वळू. परमानंद काशीस गेला असतां ब्राह्मणांनी विचारल्यावरून परमानंदाने हैं शिवभारत सांगि- तलें. यावेळी शिवाजी हयातच होता. शिवाजीचे सर्व उल्लेख वर्तमानकालीन आहेत. परमानंद नेवासेचा रहिवासी व पुराणिक होता. बापाचें नांव गोविंद. त्याने काशीस जाण्यापूर्वीच हैं शिव- भारत तयार केलें होतें. शिवाजीनें परमानंदास आपले चरित्र वर्णन करण्यास आज्ञा केली होती.