पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण होती. तिच्या वस्तादजीची व जयरामाची मैत्री होती. जयराम हा संस्कृत भाषेवर फार प्रेम करी. प्राकृतांत कवि करणारांना तो "मर्कट म्हण व संस्कृत कवींनां सिंह म्हणे. जयरामानें शहाजीच्या दरबारांतील प्राकृत कवींनां वादांत अनेकदां जिंकिलें असें जयराम स्वतः सांगतो. जयराम शहाजींच्या दरवारी शक १५७५ पासून १५८० पर्यंत होता. चंपू काव्य शक १९८० च्या सुमा रास झाले. जयरामकविविरचित पर्णालपर्वतग्रहणाख्या- नांत जयराम हा व्यंकोजीच्या दरबाराचे वर्णन करतो." गवई, बजवय्ये, स्तुतिपाठक भाट, उत्तम नट आणि नर्तक हे सभेच्या पुढील अर्ध्या भागांत आपल्या स्थानीं आसनांवर बसून त्याची स्तुति गात होते (८, ९, १० व ११) ". "महाराज, ह्या मनुष्याकडे कृपादृष्टीने पाहावें." असें भाल. दारांनी प्रत्येकाचा नामोच्चार करून सांगितल्यावर त्या लोकसमुदायाने त्याला नमस्कार यथाक्रम केला. इतक्यांत द्वारपालानें येऊन सांगितलें कीं, हत्तीवर बसून जयरामकचि येत आहेत. तेव्हां राजाचे नेत्र हर्षाने प्रफुल्लित होऊन त्याने आदर पूर्वक (लगबगीनें) पण्डितांसह सचिवाला त्वरेनें सामोरे पाठविलें. नंतर जयराम कवीनें त्यांच्यासह सभेमध्ये प्रवेश केला. ( १२, १३, १४ व १५ ) तेव्हां एकोजी राजाने त्याच्या सन्मानार्थ उठून उभे राहून त्याला नमस्कार केला. आणि ज्या प्रमाणे विनयशील भरताने श्रीरामचंद्रासंबंधी कुशल प्रश्न विचारले त्याप्रमाणे त्यांनी आपले वडील बंधु जे श्रीशिवाजीमहाराज यांच्यासंबंधीं कुशल प्रश्न विचारले. कवीनें आधीं सर्व कुशल वृत्त सांगितलें. (१६ व १७) आणि तो म्हणाला “महाराज, देवश्रेष्ठ, जगत्प्रभु विष्णूच्या चरित्रा- सारखे असे आपले बंधु श्रीशिवाजीमहाराज यांचे चरित्र ऐका (१८). निष्कलंक कलंकी तरुणांचा (यवनांचा) नाश करील असें जें शास्त्रामध्ये ६४ ( पुराणांत) सांगितलेले आहे तेंच आतां वर्णितों (१९). कारण त्या युद्धाचे कवींनी पूर्वी यथाभूत ( जसें झालें तसें) वर्णन केले आहे. मी सुद्धां त्यांच्या कृपेनें कांही ऐकून वर्णन केले (२०). तें श्रवण करून महाराजाधिराज (शहाजी) सुद्धां पूर्वी संतुष्ट झाले. बेंगरूळ नगरीं गौरीविलास नांवाच्या सभेत (दिवाणखान्यांत ) आपणसुद्धां पूर्वार्ध आरंभापासून ऐकला. म्हणूनच आपण ( पुढील चरित्र) ऐकण्याच्या उत्सुकतेने मला बोलाविलें (२१ व २२ ). पुढे पद्ये रचीत रचीत कांहीं वर्षानी मी काव्यग्रंथ तयार केला व त्यांत सर्वांचा संग्रह केला (२३) तो हा सर्व आपण व राजवंशांतील इतर श्रेष्ठ पुरुषांनी मोठ्या तल्लीन- तेनें सविस्तर ऐकला (२४)." यानंतर व्यंकोजी उत्तर करतो- "पूर्वीचें चरित्र आम्ही ऐकले आहे. अलीकडचें आरंभापासून सांगावें. आपणास महाराजांचें दर्शन कसे घडले? हल्ली महाराज कोणत्या गडा- वर रहात आहेत! येथून तीन वर्षेपर्यंत आपण जें काय केलें तें सर्व ऐकण्याची आमची इच्छा आहे. आपण मोठे कवि आहां. (२५, २६ व २६३)।”. जयराम म्हणतो 'मी बारा भाषांत काव्यरचितों (२७ पूर्ण ). तेव्हां प्रथम मराठी भाषेत (त्यांचें चरित्र) वर्णिले. येथून राजगडास जाऊन मी महाराजांचे दर्शन घेतले (२८). त्यानंतर शिवाजी महाराजांनी सुरत पुनः लुटली. त्याचें वर्णन. मी हिंदी व मराठी या दोन भाषांत केलें (२९). नंतर त्याच मोहिमेंत श्री त्रिंबक नांवाचा प्रख्यात पवित्र किल्ला आनंदाने हस्तगत केला (३०). त्याच्यामागून जसें पूर्वी श्रीकृष्णानें भागदत्त नगर (भागलपुर) लुटलें तसें शिवाजी महाराज कारंजा शहर लुटून आले. (३१) त्याचेहि वर्णन मी मराठी व हिंदी या दोन भाषांत केलें. नंतर सह्याद्रीचें मस्तक जो बागलांच्या ताब्यां- तील पूर्वी पृथ्वीवर अतिविख्यात पन्हाळा किल्ला