पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घेतला. विजयानगर, कनकगिरीहि काबीज केली. शहाजी आपल्यासमोर द्वंद्वयुद्ध व कुस्त्या करवी वगैरे गोष्टी जयरामानें उल्लेखिल्या आहेत. शहाजीला गोवर्धनाचार्याच्या आर्या फार आव- डत. कोठलाहि कवि आश्रयास आल्यास शहाजी त्याला ठेवून घेई. जयरामाने अशा ३५ कवींचीं नांवें दिली आहेत ती येणेप्रमाणे- शहाजीच्या राजसभेतील कवी - (१) रघुनाथ व्यास; (२) रघुनंदन; (३) ठाकुर चतुरद; (४) लछीराम; (५) श्यामगुसाई; (६) ठाकूर शिव- दास; (७) केसरिदास; (८) नारायणभट्ट गुरु; (९) गयंदकवि; (१०) द्वारकादास (११) देव काशीकर; (१२) शेष व्यास काशीकर; (१३) बलभद्र कवि; (१४) सुखलाल; (१५) अल्ली खान; (१६) बाल कधि; (१७) रघुनंदन रामानुज; (१८) जदुराय; (१९) दुर्ग ठाकूर; (२०) सुबु - द्धिराव; (२१) ढुढरी कवी; (२२) अकब्बरपूरचा कवि; (२३) एक पंजाबी कवि; (२४) एक हिंदु- स्थानी कवि; (२५) एक फारशी कवि; (२६) एक गुजराथी कवि; (२७) मोरिना भाट; (२८) बर्गी कवि; (२९) मोदलराय (३०) कोड्डा पोब- राय; (३१) लालमणि; (३२) घनशाम ; ( ३३ विश्वभर भाट (३४) बलदेव नरायन (३५) अनंत नरायन ) शहाजीच्या सैन्यांत व राज्यांत अनेक प्रांतीय लोक रहात त्यामुळे त्याच्या दरबारांतहि अनेक प्रांतीय विद्वान आश्रयार्थ होते म्हणून अनेक प्रांतीय भाषा त्याला व दरबाराला समजत. शहाजीच्या पदरीं खुषमस्करे असत. शके १५५० च्या सुमा रास शहाजी इतका प्रबळ झाला की " उत्तरेस शहाजहान व दक्षिणेस शहाजी हे रक्षक आहेत" अशी म्हण हिंदुस्थानांत पडली होती. शहाजीनें गुत्तीच्या स्वारीत मीरजुम्ला याचा पराभव केला होता. शहाजीने सर्व कर्नाटक जिंकले. महंमद आदिलशहा म्हणे कीं, माझी बादशाही शहाजीनें ६३ शिवकालीन बाडायासंबंधी वातावरण राखीली आहे. शहाजी हा फाल्गुनांत वसंत दर- बार भरवीत असे; शहाजी शाहिरांचे मराठी पवाडे श्रवण करी, पक्ष्यांचे आलाप श्रवण करी. नाच गायन ऐके, यज्ञयाग करी साधुसंतांचे दर्शन घेई, लढाया खेळे; शहाजीचा रोजचा वर्तनक्रम प्राचीन क्षत्रिय राजांप्रमाणे असे. हैं शहाजीचे वर्णन ज्याने लिहून ठेवलें आहे, त्या जयरामाचीच कथा त्या वेळच्या कवींस असलेल्या राजाश्रयाची बोधक आहे. जयरामा आडनांव पिंड्ये नाशिक जिल्ह्यांतील मार्केड्याच्या डोंगराजवळील एका गांधी हा रहात होता. बापाचें नांव गंभीरराव. याच्याकडे मार्केडापासून अहिवंता- पर्यंतच्या ७ किल्ल्यांची किल्लेदारी होती; शहाजी निजामशाहीचे पुनरुज्जीवन करीत असतां त्याची गंभीररावाशी ओळख झाली. त्यामुळे पुढें जयराम हा बंगळूरास शहाजीच्या दरबारी गेला. जयरा- मास तत्कालीन मुख्य मुख्य १२ भाषा येत होत्या. त्यानें हें चंपूकाव्य शहाजीच्या सांगण्यावरून रचिलें. यांत शहाजीचे गुणवर्णन आहे. जय. रामानें शाजीच्या प्रथम भेटीच्या वेळी १२ नारळ शहाजीपुढे ठेवून आपल्याला १२ भाषा येतात म्हणून सांगितलें. मग शहाजीनें जय- रामास आश्रय दिला व अनेक बक्षिसें दिली; जय- रामानें गोवर्धनाचार्याच्या आर्यांसारख्या आर्या रचिल्या. जयरामाने केलेला स्तुतिपर श्लोक संभाजी राजाच्या कारभाऱ्यानें आपल्या मुद्रेत कोरविला. व्यंकोजी राजानें जयरामास, राधा- माधवविलासचंपू ऐकल्यावर दर वर्षास १ हजार वराह होन देण्याची नेमणूक केली. व्यंकोजी बरो- बर जयराम हा शैलमल्लिकार्जुनाच्या यात्रेस गेला होता. शहाजीच्या राखेचा पुत्र कोयाजी हा संस्कृत, प्राकृत, नृत्य, गायन जाणणारा होता शास्त्रांत निष्णात होता व त्याची मुलगी नायकीण नांवाची असून ती नृत्य गायन कलेत निष्णात