पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण દુર छत्रसाल यांच्या दरबारी असलेल्या कवींचाच डले आहेत पण काव्योत्तेजनाचें कांहीं सांप- भाऊ होता. भूषणाचा धाकटा भाऊ मतिराम हा ललित- ललाम, छंदसार व रसराज या तीन ग्रंथांचा कर्ता होता व तो कुमायूंचा राजा उदोतचंद व छत्र- साल इत्यादिकांच्या दरबारी प्रतिष्ठा पावला. सर्वात धाकटा मुलगा नीलकंठ हाहि प्रसिद्ध कवी होता. थोरला भाऊ चिंतामणि हा तर औरंगझे- बाच्या दरबारी कवि होता. तर या प्रकारचे संबंध असलेला कवि शिवाजीच्या दरबारीं आला हा एक चांगला दैवयोग होता यांत शंका गाहीं. असा कवि दरबारी असल्यामुळे निरनिराळ्या राजांच्या दरबारांत शिवाजीची कीर्ति आपोआप फैलावत असली पाहिजे. भूषण कवी संबंधानें जी माहिती आपल्याकडे मराठी ग्रंथांत सांपडते ती शिवाजी बखरींतील होय. ही प्रथम विस्तारांत प्रसिद्ध झाली. तींत थोडाबहुत बाष्कळपणाच आहे. / भूषण कवीचा शिवबावनी नांवाचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. (प्रकाशक गोवर्धनदास लक्ष्मीदास). राजप्रशस्ति वाङ्मयाच्या संस्कृत शाखेकडे आतां वळू आणि जयराम व परमानंद यांचा परामर्ष घेऊ. यांचीं काव्ये नुकतीं प्रसिद्ध झाली आहेत. जयरामाचें “राधामाधवविलासचंपू” हैं काव्य कै. वि. का. राजवाडे यांनी संपादन करून येथील चित्रशाळेने प्रसिद्ध केले आहे (शके १८४४ तसेंच त्याचें “पर्णालप`तग्रहणाख्यान " हैं पुस्तक रा. स. मा. दिवेकर यांनी संपादून प्रसिद्ध केलें आहे (शके १८४५). रा. दिवेकर यांनींच परमा- नंदाचा "शिवभारत" हा ग्रंथ नुकताच (शके १८४९) प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राच्या राजघराण्यांत व सरदारघराण्यांत वाङ्मयविषयक अभिरुचि होती तिची परंपरा पहावयाची म्हटली म्हणजे शहाजीच्या कालापासून सुरवात करावयास पाहिजे. सुदैवानें मालोजीच्या वेळचे तीर्थोपाध्यायांस दाने केल्याचे लेख सांप- ) डले नाहीं. शहाजी संबंधाने मात्र आपणांस पुरावा चांगलाच आहे. जयराम कवीने राधा- माधवविलासचंपू, पर्णालाख्यान वगैरे जे ग्रंथ लिहिले आहेत त्यांत भोसले घराण्याने कविव- र्गास कसा आश्रय दिला होता, हे सांगितलें आहे. त्यावरून असे दिसून येतें कीं कवींस सौख्यांत ठेवावें हें भोंसले घराण्यास चांगलेच समजत होतें. आणि त्या राजाश्रयास प्रारंभ शिवाजीच्या अगोदर म्हणजे शहाजीच्याच काळांत झाला आहे. शहाजीचें वैभव मोठेच दिसतें, व तो विद्येचें चीज करण्यामध्ये मुळींच कुचर नव्हता. चंपूकडेच अवलोकन केलें तर खालील गोष्टी दिसून येतात. शहाजीनें हा चंपू स्वतः श्रवण केला, शहा- जीच्या पदरीं अनेक भाट असत व ते त्याचें गुणवर्णन करीत, तो त्यांनां अशी काव्ये कर- ण्यास सांगे. शहाजीकालीन समाजांत कवित्व कशास म्हणत हैं जाणण्यास चंपू एक साधन आहे. जयराम म्हणतो अलंकार शास्त्रग्रंथ पाहून किंवा पढून कवित्वशक्ति येत नाहीं, ती मूळची व ईश्वरानुग्रहप्राप्त अशी प्रतिभा असावी लागते. यावरून तुकाराम रामदासांच्या पूर्वीच झालेले प्रेरणाकाव्याचे विचार कत्रीने स्वीकारून आपण त्या वर्गात मोडतो असा हक्क सांगितलाच आहे. चंपूंत संभोग, विप्रलंभ, स्त्रियांचे नखशिखांत वर्णन इत्यादि प्रकारचें कवित्व असून मग शहाजी प्रशंसा आहे. शहाजी स्वतः संस्कृत जाणणारा कवित्व करणारा होता. तो कवींनां संस्कृत समस्या घाली. शहाजीचा वडील मुलगा संभाजी हाहि संस्कृतज्ञ व समस्या घालणारा होता; शहा- जीच्या दरबारांत मोठमोठे पंडित कवी, लष्करी सरदार असत. यांची संख्या ७० आढळते; शहाजी खूष झाला म्हणजे कवींनां घोडे पोषाक, इनामी देई; शहाजीने मल्याळ देशांतील बंड मोडलें व दक्षिण कर्नाटकांतील एक पुरंदर नांवाचा किल्ला