पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१) जुनी मराठी समजेनाशी झाली होती म्हणून ज्ञानेश्वरींतील शब्द देणारा शामाराध्याचा पद्यमाला हा मागें उल्लेखीलेला कोश झाला. (२) राजव्यवहार मराठीत व्हावे. पण राज- व्यवहाराचे शब्द फारसी होते म्हणून फारसी शब्दांस प्रतिशब्द देणारा हणमंत्यांचा राज- व्यवहार कोश झाला. (३) संस्कृत भाषा संस्कृतमधून शिकविणें हें कठीण जाऊं लागलें म्हणून अमरकोशाचे मराठी भाषांतर झालें. एवंच चालू मराठी भाषेमार्फत अभ्यास व्हावा म्हणून या तीन बाजूंनी प्रयत्न झाला. ६१ शिबकालांत मराठी भाषेला महत्त्व आणण्या साठीं झालेल्या प्रयत्नांसंबंधाने एक महत्त्वाची गोष्ट निर्देशिली पाहिजे ती ही की, मराठी ग्रंथ कार जेव्हां मराठीचा अभिमान धरून लिहीत तेव्हां ते संस्कृत भाषेविरुद्ध लिहीत. राजदरबारांत मराठी असले पाहिजे व तें शुद्ध स्वरूपांत असले पाहिजे याबद्दल त्यांची धडपड दिसत नाहीं. पण तेवढ्यावरून ती धडपड नव्हती असे मात्र वाटत नाहीं. संतकवी धार्मिक विषयांवर लिहीत तेव्हां त्यांच्या क्षेत्रांत संस्कृत हीच प्रतिस्पर्धी होती. धार्मिक विचार व्यक्त करण्यासाठी भाषा कोणती असावी एवढ्या प्रश्नावर काय तें संतकवींनी लिहिलें आहे. संस्कृत ग्रंथ न शिकतां मराठी ग्रंथावर तहान भागवावी असा मूर्खपणा कर- ण्याचा दोष ज्याप्रमाणें त्यांच्यावर लादतां येणार नाहीं त्याप्रमाणें फारसी भाषेशी झगडा करण्याचें श्रेय त्यांचे नव्हे. मराठीची फारसी भाषेशी लढाई फारशी झाली नाहीं. राज्य पालटलें तेव्हां राजन्य वर्गाची दरबारी भाषा मराठी झाली. राज्यव्यव- स्थेचें एक अंग म्हणून वाङ्मय होऊं लागलें. त्या वाङ्मयास व्यापारी भाषेत बोलावयाचे झाल्यास असे म्हणतां येईल कीं, नव्या राज्याची जाहिरात हिंदी व संस्कृतमधून सर्व हिंदुस्थानभर फडकवली शिवकालीन वाङ्मयासंबंधीं वातावरण आणि राज्यरूपी कारखान्यांतली कामगारमंडळी मराठीच असल्यामुळे कारखान्यांत भाषा मराठीच करण्याचा प्रयत्न झाला. व हा सर्व प्रयत्न ज्यांचा कारखाना त्यांच्याकडून झाला. आतां मराठी राज्याबरोबर राजाश्रयानेंच वाढलेल्या आणि राजे लोकांची जाहिरात कर- णाऱ्या वाङ्मयाकडे लक्ष देऊ. हैं वाङ्मय सामान्य लोकांतील अभिरुचीचें द्योतक नसून दरबारी मंडळीच्या अभिरुचीचें दर्शक आहे. प्रथम शिवाजीचा कवि म्हणून प्रख्यात असलेल्या भूषणाकडे लक्ष देऊ. शिवाजीच्या पदरीं भूषण कवि होता. हा कनोजा ब्राह्मण होता. यानें जें शिवराजभूषण काव्य लिहिले. तो अलंकारावरील हिंदी भाषेतला एक ग्रंथ आहे. भूषणाचे शिवाजीवर अनेक ग्रंथ आहेत. शिवराज भूषणकाव्य ( निर्णय सागर ) प्रसिद्ध दिली आहे तीवरून त्या ग्रंथाची माहिती होते, झालें आहे, त्याच्या प्रस्तावनेत जी माहिती त्यांत भूषणाचें चरित्र आले आहे त्यावरून जी मुख्य गोष्ट बाहेर पडते ती ही कीं महाराष्ट्र आणि इतर भाग यांचा बौद्धिक संबंध स्थापित होण्यास उपयोगी पडले असावें. पंजाबी, फारसी व हिंदु- उत्तर हिंदुस्थानी कवीस आश्रय देणें हें फार स्थानी कवींना आश्रय देण्याची परंपरा शहाजीनेंच आणि भाट यांचा राजांनां मुख्य उपयोग त्यांची पाडली असें जयरामाच्या ग्रंथावरून दिसतें. कवि जाहिरात करणें हा होय. ही गोष्ट बिल्हणानें विक्रमांकदेवचरित्रांच्या प्रस्तावनेत स्पष्ट शब्दांत सांगितली आहे. लंकापतेः संकुचितं यशो यद् यत्कीर्तिपात्रं रघुराजपुत्रः स सर्व एवादिकवेः प्रभावो न कोपनीयाः कवयः क्षितींद्वैः हैं तत्त्व शिवाजीने ओळखले होतें एवढेच नव्हे तर कर्मधर्मसंयोग असा जुळून आला की शिवाजी - संबंधानें काव्य करणारा मनुष्य औरंगजेब आणि