पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ५८ द गमारिस" याचा शुभवर्तमानांतील कथा- खुद्द शिवाजी महाराजांनी उत्तेजन दिले जाहे. भाग घेऊन लिहिलेला ग्रंथ. ग्रंथकार शिवकालीन असावा. याच्या अगोदर "मिनवेल डी आलेमडा" यानें “सेंट लोरन्स” या सिस्ती साधूचें गद्य चरित्र लिहिलें आहे. तें शिवाजीच्या काळांतच (इ. स. १६५८) गोंव्यांत छापलें गेलें. शिवकालीन महाराष्ट्रांतील वौद्धिक आणि काव्याभिरुचीचें वातावरण काय होतें हें अजमा- वण्यासाठीं वाङ्मय तपासतांना महाराष्ट्राशीं संबद्ध अशा हिंदी व संस्कृत वाङ्मयाचा हिशेब घेतला पाहिजे. त्याच्या योगानें महाराष्ट्रांतील बौद्धिक चलनवलनाच कांही तरी धागे कलून येतील. शिवाजीच्या प्रेरणेनें.अनेक संस्कृत ग्रंथ झाले. त्यांत खालील ग्रंथ उल्लेखिले पाहिजे. संस्कृत कवी जयरामः - पर्णालाख्यान, राधामाधवविलासचंपू. परमानंद - शिवभारत. रघुनाथ हणमंतेः-- राजव्यवहार कोश. याशिवाय जो एक ज्योतिषावरील ग्रंथ शिव- प्रेरणेनें झाला त्याचा उल्लेख पुढे येईल. शिवकाल हा एकंदर विद्येच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा होता याची कल्पना तत्कालीन संस्कृत भाषेतील काव्य आणि काव्ये- तर वाड्मय लक्षांत घेतल्याखेरीज होणार नाहीं. जे मराठी ग्रंथकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांत संस्कृत ग्रंथरचना करणारे आहेतच. यांत लोलिंब- राजाचा उल्लेख करतां येईल. त्याचें वैद्यजीवन दोन्ही भाषांत आहे. त्याचा हरिविलास ग्रंथ हा एक आणखी संस्कृत ग्रंथ होय. समर्थांच्या संप्र- दायांत खुद्द समर्थमेरु कवि, गिरधर रामदासी, जयराम स्वामी हे मराठी ग्रंथांचे त्याचप्रमाणें संस्कृत ग्रंथांचे कर्ते होते. संस्कृतमध्ये उच्च धार्मिक भावनांचे ग्रंथ झाले नाहीत, ते प्राकृत- मध्ये झाले पण ज्योतिष, वैद्यक वगैरे शास्त्रावरील ग्रंथ हे संकृतमध्ये झाले आहेत. ज्योतिष ग्रंथास या कालांत संस्कृत नाट्य वाङ्मय वाढलेच पण त्यावर देखील प्राकृत ग्रंथकारांनी जें वातावरण उत्पन्न केलें त्याचा परिणाम दिसून येत आहे. शंकरभक्ति, रामभक्ति व कृष्णभक्ति यांची साधनें म्हणून हे ग्रंथ झाले असावेत हें उघड दिसत आहे. व या वेळेस जीं देशी भाषांतून जागोजाग नाटकें अगर लळितें होत त्यांचा परिणाम संस्कृत नाट्य वाङ्मयावर झाला यांत शंका नाहीं. एवंच काव्य आणि नाटक यांच्या बाबतीत संस्कृत वाङ्मय देशी वाङ्मयाचें निर्णायक न होतां देशी धार्मिक वाड्मय आणि जानपद कला यांचा परिणाम संस्कृत वाङ्मयावर म्हणजे नागरिक वाङ्मयावर होऊ लागला होता, देशी वाङ्म- याचें प्राबल्य त्या वेळच्या संस्कृत ग्रंथकारां अगलें होतें हैं स्पष्ट दिसतें. मराठी कवींचा त्यां माकडे म्हणून- जो जयरामानें उपहास केला आहे तो उपहास देशी वाङ्मयाचें वाढतें बल दाखवितो. या वेळच्या संस्कृत ग्रंथकारांची नांवें व त्यांच्या ग्रंथाविषयी माहिती येणेप्रमाणे देतां येईल- चंपूकार स. नीलकंठ दीक्षित:- "नीलकंठविजयचंपू (इ. १६३६ ) नलचरित्र. नाटककार महादेव:-“अभ्दुतदपर्ण नाटक" यांत राम- कथा आहे (इ. स. १६९३ पूर्वी ). अतिरात्र याजिन:- हा नीलकंठ दीक्षित (वरील) याचा धाकटा भाऊ:- "कुशकुमुद्वतीय" नाटक, रामाचा पुत्र कुश व त्याची बायको कुमुद्वती यांच्या संबंधीचें. व्यंकट कृष्ण दीक्षितः-- " कुशलवाविजय " नाटक (इ. स. १६९३ पूर्वी ). शेषचिंतामणी :- " रुक्मिणीहरण" नाटक इ. स. १६७९ पूर्वी.