पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्गीकरण करतात, त्यांचे इंप्रेशनिस्ट, इमिटेटिव्ह व इन्स्पायर्ड असे भाषांतर होऊ शकेल. रामदा- सांनां काव्य सरळ पाहिजे, क्लृप्त्यांचे नको आहे.. काव्य हें जर मनावर अवलंबून आहे आणि मनाचे सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकारचे भेद आहेत आणि त्यांत सात्त्विक हैं श्रेष्ठ प्रकारचें मन आहे तर सास्विक काव्य देखील श्रेष्ठ आहे. त्याचे विषय राजे नाहींत तर ईश्वर, ऋषि व शास्त्र हे आहेत (पृ. ४४). प्रकरण ११ से (पृ. ५३–७३ ) शिवकालीन वाङ्मय आणि तत्संबद्ध वातावरण शिवकालीन संस्कृत आणि मराठी वाङ्मय अत्यंत विविध होते व आकाराने फार मोठे होते. राजाश्रयानें संस्कृत कविता आणि मराठी पोवाडे एवढेच काव्य झालें. आणि या काळांत वाड्म- योत्पादनाचीं स्थानें देखोल पंचवीस तीस होती. मराठी कवी सुमारें ६० वर दिसतात. मराठी भाषे- वरील फारशी आवरण काढून टाकण्याची खटपट झाली. कोशवाङ्मय झाले, अगदीं ऐहिक प्रकारचें वाङ्मय झालें व पुष्कळशा संस्कृत ग्रंयांची भाषां- तरे झाली. "अलिगोरीकल" वाङ्मय झालें. संस्कृत वाङ्मय शिवकाळांत पुष्कळच झालें आहे. शिवभारत आणि पर्णालपर्वतप्रहणाख्यान या दोन संस्कृत काव्यासंबंधी माहिती (पृ. १३) प्रकरण १२ वे (पृ. ७३-७४ ) गीर्वाण वाङ्मयशास्त्रें व मराठी ग्रंथकार छंदःशास्त्रावर निरंजनमाधवानें ग्रंथ केला. परशुराम कवीनें जोडाक्षरापूर्वीचें अक्षर गुरु होतें याला मराठी अपवाद दाखवून दिले (पृ. ७३ ). प्रकरण १३ में (७५-८५ ) भाषांतरकार आणि त्यांचें मूलपरीक्षण भाषांतकार भाषांतर करतांना मूळाचा स्वीकार किंवा त्याग करून मूळाविषयीं आपले मत व्यक्त करितात. तर या दृष्टीने अभ्यास करून मराठी कवींची ग्रंथपरीक्षणतत्वें काढतां येतील. या नियमाचें विशेषतः मोरोपंताचें वृद्धिसंकोच घेऊन स्पष्टीकरण; व त्यावरून मोरोपंताच्या काव्यपरी- क्षणवृत्तीचा अजमास (पृ. ७५). प्रकरण १४ के ( पृ. ८६-१७ ) चरित्रकार चरित्रकारांस चरित्रविषय झालेल्या व्यक्तींवर मत देण्याची संधि होती पण त्या संधीचा उप- योग काव्यपरीक्षणाच्या दृष्टीनें चरित्रकारांनी केला नाहीं. संतकवींच्या याद्या; व संतकवींवर असलेले वाड्मय या प्रकरणांत जितकें सविस्तर देतां येईल तितकें दिलें आहे (पृ. ८६). प्रकरण १५ (पृ. ९७ - १०७ ) महिपति आणि मोरोपंत मोरोपंतांनी सन्माणिमाळेंत फारशी मार्मिकता दाखविली नाहीं. त्याच्या संतचरित्राविषयीं तेंच विधान करावें लागेल. महिपतीचें ग्रंथकर्तृत्व तपासतांना त्यानें जी मार्मिकता दाखविली आहे ती चरित्रांत चरित्रविषय होणान्या व्यक्तींच्या काव्याचे उतारे घेऊन दाखविली आहे. त्याच्या चरित्रांतील उताऱ्यांवरून ज्या कवींचें जें काव्य आहे की नाहीं हें ठरविण्यास कांहीं प्रमाणांत आहे म्हणून सांगितलें जातें त्या कवींचें तें काव्य उपयोग होईल. काव्यपरक्षिणासाठी दैवी उपाय योजण्याची वृत्ति महिपतीनें दाखविली आहे . पृ. ९७ ). (