पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असण्याचा संभव आहे पण तीं सांपडली नाहींत. निवासस्थान पैठण, सोलापूर जिल्ह्यांत सोनारी गांवीं जोसपण व शेवटी तेरवाड येथे मृत्यु. बृह- रमावल्लभदासः-(शके १५३२ - मृत्यु ? ) - ग्रंथ (१) दशक निर्धार यांत भागवताच्या दशमस्कं- धाच्या आधाराने कृष्ण जन्मकथा सांगितली आहे. (२) वाक्यवृत्ति ही श्रीशंकराचार्यांच्या द्वाक्यवृत्ति या ग्रंथावर विस्तृत टीका आहे. (३) चमत्कारी नांवाची गीतेवर टीका. निवासस्थान कधीं वाई, कधीं दाभोळ मरु व कारवार जिल्ह्यांत चंदावर येथे. शिष्यपरंपरा गोमंतकांत आहे. शिवकल्याणः–भागवत दशमस्कंधावर विस्तृत टीका, जवळ जवळ एक लक्ष. अमृतानुभवावर . नित्यानंददीपिका. निवासस्थान जोगाईचें आंबें उर्फ मोमिनाबाद, मुक्ताबाईच्या शिष्यपरंपरेतील. टीका पंढरपूर येथे लिहिली. लोलिंबराज : - जुन्नर येथील रहाणारा साधु म्हणून उत्तरकालीन उद्धवचिद्वन, शिवराम इत्यादि- कांनी त्यास नमन केले आहे. ग्रंथ (१) भागवताच्या दशमस्कंधावर टीका, (२) वैद्यजीवन नांवाचा संस्कृत व मराठी ग्रंथ (३) लोलिंबराज चरित्र, शृंगारिक, मराठीत आत्मचरित्रात्मक लौकिक असें पहिलेच काव्य. हें फार अश्लील आहे म्हणून भावे बोभाटा करतात. लोलिंबाने एका यवनीबरोबर लग्न केलें होतें. तिला रत्नकला असें नांव दिले होते. (४) वरील ग्रंथाशिवाय याचीं पदें वगैरे पुष्कळच आहेत. शामाराध्यः - ( १ ) ग्रंथ ज्ञानेश्वरीतील कठिण शब्दांचा अर्थ सांगणारी "पद्यमाला", (२) भारत, (३) भागवत, (४) रामायण, यांतील अनेक आख्याने, (५) भागवताच्या दुसऱ्या व दहाव्या स्कंधावरील टीका, (६) आश्वलायन प्रश्नमाला, (७) नित्यानित्याचार (८) ज्ञानोदयसिंधु यांपैकी ६, ७, ८, हे ग्रंथ वेदांतावर आहेत. (९) गीत - ५५ शिवकालीन वाढायासंबंधी वातावरण वर टीका, (१०) कांहीं उपनिषदांवर भाष्य, (११) शिवाय पदें, स्तोत्रें, अभंगरचना वगैरे. तुकाराम : - देहू येथील रहाणारा. याचे अभंग सुप्रसिद्ध आहेत. बोधलेवोवाः- धामणगांवचे राहणारे. निंबराज:- हे दैठणचे रहाणारे. शके १६०० मध्ये दैठण येथे समाधिस्थ झाले. ग्रंथ - (१) ज्ञान- बोध; यांत निंबराज व त्यांचे गुरु (एकनाथशिष्य नरहरि ) यांचा संवाद आहे. (२) जपमाळ, यांत संतचरित्रे आहेत. मोरया गोसावी :- रहाणारे चिंचवडचे. ग्रंथ- शिवाय अनेक स्फुटपद्ये आहेत. गणेशपुराण नांवाचा मोठा ग्रंथ लिहिला आहे. गणेशनाथ: - रहाणार सारशे येथील. अनेक पढें व अभंग रचिले. त्र्यंबकः -- कांहीं पढ़ें व अभंग आहेत. त्र्यंबकसुतः - किरकोळ. विठ्ठलदास : - स्फुट पढ़ें व अभंग. घोंगडा:- काव्य उपलब्ध नाहीं. शिवदास कुंडेश व पणाभीविश्वनाथ:- कांहीं कविता संताजीच्या वहीत व इतर बाडांत आहे. सेना न्हावी :- काल अनिश्चित. थोडे अभंग उपलब्ध आहेत. शेख महंमदः -श्रीगोंदे येथील. स्फुट अभंग . पुष्कळच आहेत. रामदासः-(१५३०-१६०३) यांचे दासबोध, मनास बोध इत्यादि ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. रहाणें चाफळ मठांत. जन्म जांब येथे. गंगाधरः–रामदासांचे वडील बंधु ग्रंथ. (१) भक्तिरहस्य, (२) सुगमोपाय, शिवाय स्फुट प्रकरणे अभंग. मृत्युकाळ शके १५९९. जयराम स्वामी :- वडगांव मठाचे अधिकारी. ग्रंथ (१) दशमस्कंध (२) रुक्मिणीस्वयंवर. रंगनाथस्वामी: निगडी येथील मठाधिपति ग्रंथ (१) गजेंद्रमोक्ष, (२) गुरुगीता, (३) सुदामचरित्र,