पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण शिवाजीने ज्या प्रकारच्या काव्यास आश्रय दिला तें काव्य संस्कृत किंवा व्रज भाषेतील होय. मराठी कवींपैकीं शाहीरवर्गास कांहीं प्राप्ति या वाढल्या राजसत्तेमुळे झाली असली पाहिजे. एवंचं राजे लोक जरी वाङ्मयास उत्तेजन देणारे असले तरी ते काव्य म्हणजे आत्मप्रशंसेचें एक अंग या दृष्टीनेंच काव्याकडे पहात. रजोगुणी काव्याकडे संतमंडळी तुच्छतेने पहात होती आणि आपले उच्चत्त्व त्यांस भासत होतें यांत शंका नाहीं. त्यांना मराठी राज्य स्थापन होत आहे याबद्दल आनंद होत नव्हता असें नाहीं, आनंद होत होताच. व हा आनंद तुकारामानें आणि राम- दासाने व्यक्त केला आहे. पण या संतकवींस राजाचे आश्रित अगर भाटं बनावयाचें नव्हतें. राजाला आवडणारे काव्य करणारा वर्ग निर्माण झाला पण मराठी वाङ्मयावर संतकवींनीं जी छाप पाडली होती तीमुळे राजप्रशस्त्या लिहिण्याकडे मराठी भाषेचा उपयोग केला गेला नाहीं. ज्या- प्रमाणें आज प्रणयाची वाक्यें बोलणें मराठीत अजून शोभनासें झालें नाहीं त्याप्रमाणें मराठी ही राजप्रशस्तीची भाषा होऊं शकली नाहीं. जरी सूतवाङ्मय मराठींत उत्पन्न व्हावयास अडचण भासत होती तरी ती उणीव संस्कृत आणि हिंदी कवींनी भरून काढली. या कवींनीं रामदास वगैरे व्यक्तींशी आपला सारखेपणा दाख- विण्याचा प्रयत्नच केला नाहीं. राजाचे जे गुरु ते आपले गुरु; आपणांत आणि संतकवींत अंतर पुष्कळ आहे अशीच त्यांची भावना होती... ग्रंथाची उत्पत्ति आणि भोवतालच्या जनतेची बौद्धिक स्थितियां अन्योन्याश्रयाचा निकट संबंध आहे. भोवताली अभिज्ञ जनता असल्या शिवाय ग्रंथोत्पत्तीच व्हावयाची नाहीं. शिवाजी महारा- जांच्या कालामध्यें जितकी उच्च प्रकारची ग्रंथो- त्पत्ति झाली तितकी केव्हांच झाली नाहीं. सुंदर, गोड व सोप्या ओव्या लिहिणान्या मुक्तेश्वराच्या महाभारतापासून थोडीशी तरी डोकेफोड कराव- यास लागणारे यथार्थदीपिकेसारखे ग्रंथ याच काळांत झाले. त्याचप्रमाणे याच काळांत बखरी- वाङ्मय तयार होऊं लागलें, ऐतिहासिक पोवाडे तयार झाले आणि शृंगारिक संस्कृतकाव्याची ● भाषांतरें आणि स्वतंत्र शृंगारिक कविता यांच्या- कडे लोकप्रवृत्ति झाली. शृंगारिक काव्यांत तीन प्रकार दिसून येतात; पहिला प्रकार जो भाषां- तर त्यांत चौरपंचाशिकेचें भाषांतर येते. या स्वतंत्र शृंगारिक काव्यामध्ये देखील दोन प्रकार दिसून येतात; कृष्णाची लीला वर्णन करण्याचे निमित्त करून शृंगारिक काव्ये करणे, व मोठ्याश्या व्यक्तीशी संबंध न आणतां स्वतःचेच भाव व्यक्त करणे. दुसऱ्या प्रकारच्या कवींमध्ये लोलिंबराजाचा उल्लेख करतां येईल. याशिवाय अनेक विषयांचे विवेचन करणारे दासबोधासारखे ग्रंथ झाले. या कालाइतका वाङ्मयाच्या दृष्टीनें मह- त्वाचा प्रस्तुत काला खेरीज अन्य काल नाहीं. ज्या कालांत मोरोपंत आणि महिपति झाले ते काल देखील शिवकालाच्या मानानें कमी महत्त्वाचे दिसतात तर या कालाच्या एकंदर वाङ्मयाच्या उत्पादनाचे व लोकाभिरुचीचें साकल्याने निरी- क्षण करण्याचा प्रयत्न करूँ. हें निरीक्षण करा- वयाचें म्हणजे त्यांत जनतेच्या अनेक अंगांचे निरीक्षण करावें लागेल. साधुसंतांचा वर्ग व त्याचे चहाते, वामन - विठ्ठलासारखे प्रतिष्ठित कवी आणि त्यांचे चहाते; राजदरबार, शेतकरीवर्ग यांची वाङ्मयासंबंधाने मागणी व पुरवठा या सर्व गोष्टींचा स्थूल अवलोक घेतला पाहिजे. प्रथमतः तत्कालीन संतकवींच्या एकंदर वाङ्म- याचे विहंगमावलोकन करूं मुक्तेश्वरः - (शके १५२१-१५७१). याचे ग्रंथ महाभारताची पांच पर्वे, रामायण, कांहीं त्रुटित आख्यानें व किरकोळ ओवीबद्ध स्तोत्रे व अभंग यानें महाभारताची आणखी कांहीं पर्वे लिहिली