पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • JAN 1994

स्वाभाविक प्रकृतीवर अवलंबून आहे त्याअर्थी सत्व, रज, तम हे जे तीन मनुष्यप्रकृतीचे भेद आहेत त्यांस अनुसरून कवितादिव्यापारांचें उच्च नाचत्व ठरविणें योग्य आहे, ज्यास आपण संगी- • तादि गोष्टींची रसिकता म्हणतों ती आवड रजो- गुणी आहे. सात्त्विक आवड निराळ्याच प्रकारची आहे. यासाठीं सात्विक आवडीची कविता श्रेष्ठ होय. (७) राजसगुणाची कविता राजेरजवाड्यांच्या आश्रयाची अपेक्षा करून उत्पन्न होते. व तीमुळे राजाश्रयनिरपेक्ष कवितेचे विषय जितके गंभीर असूं शकतात तितके राजाश्रयाची अपेक्षा कर- णारे विषय गंभीर असू शकत नाहींत. वर्ण्य वस्तूचें गांभीर्य ही गोष्ट देखील कवितेचें महत्त्व ठरविते. व या दृष्टीनें ईश्वरास सरूपत्व देणारी आणि शास्त्राच्या अधिकारास जगांत मान्यता उत्पन्न करून देणारी कविता श्रेष्ठ प्रकारची होय. येणेप्रमाणे रामदासांच्या मताचें स्पष्टीकरण सरळपणें आणि विचारांतील अन्योन्याश्रय स्पष्ट करून मांडले आहे. रामदासांच्या या सर्व मतांची चर्चा याच स्थळीं करीत नाहीं. ह्रीं सर्व मतें अगदी बरोबर आहेत असेंहि म्हणत नाहीं ; तथापि या विचाराच्या मांडणीत साहित्यशास्त्रीय विचार पुढे सरकला आहे खास. रामदासाच्या मताविषयीं चर्चा पुढें उपसंहारांत केली आहे आणि ती रामदासांच्या तत्त्वांनां कांहीं मर्यादा आहेत हैं दाखविण्यासाठी केली आहे. रामदासांनी हें जें साहित्यशास्त्र मांडलें आहे तें मांडण्यासाठी त्यांनी विचार केला तो कोणत्या वाङ्मयाचें अवलोकन करून केला हें विचार करण्यासारखे आहे. आपण आज जी अनेक कवींची कविता पहातों ती प्रासादिक वर्गात जाऊ पहाणान्या संतकवींची आहे. रामदासांनी ज्या कवींस हलक्या प्रतीचे कवी ठरविले ते कोणते? त्यावेळचे धीट कवी कोठें आहेत ५३ शिवकालीन बाड्मयासंबंधीं वातावरण आणि पाठ कवि कोठे आहेत. तुकारामासारख्या अत्यंत प्रासादिक कवींच्या पेक्षां खालच्या दर्जाचे जे कवी आहेत उदाहरणार्थ, मोठ्या कवींच्या शिष्यवर्गातले कवी झाले त्यांच्याविषयीं " धीट", " पाठ" हे शब्द रामदासांनी उच्चारिले काय ? उच्चारले असतील असे वाटत नाहीं कारण जी पायां पडायला सामान्य मंडळी येत आणि "गुरु प्रसादानें " भीत भीत कविता करीत, त्यांना कमी ठरविण्याचा प्रयत्न कशास पाहिजे ? धीट, पाठ, हें जें वर्गीकरण रामदासांनीं केलें तें समकालीन स्वतःस मोठे समजणारे जे दुसरे कधी असतील त्यांसच उद्देशून रामदासांनी केले आहे. घीट - पाठ - प्रासादिकांचे वर्गीकरण समजण्यासाठी भोंवता- लची एकंदर काव्यसृष्टि समजून घेतली पाहिजे. तुकाराम देखील भोवतालच्या प्रासादिक नसलेल्या कवींसंबंधाने ओरडतच होता. ' घरोघरी झाले कबी । नेणें प्रसादाची चवी ।' म्हणून ज्या कवीं- बद्दल तो ओरडत होता ते कवी तुकारामाच्या दृष्टीनें “ धीटपाठच " असले पाहिजेत. परिस्थिति नीट समजून घेण्यासाठी संतकवींच्या साहित्य- शास्त्राची “थिअरी” ज्या काळांत मांडली गेली त्या काळाचें एकंदर वाङ्मयविषयक वातावरण समजून घेतलें पाहिजे. प्रकरण ११ के. शिवकालीन वाङ्मय आणि तत्संबद्ध वातावरण महाराष्ट्रांत स्वराज्यस्थापनेचा काल हा वाङ्मयाच्या दृष्टीने महत्त्वाचा काल होता पण याचें कारण राजसत्ता होती असे म्हणतां येत नाहीं. तुकाराम हा संतकवींतील श्रेष्ठ कवि खरा पण त्याचें काव्य, राज्य असतें अगर नसते तरी तसेंच चाललें असतें. रामदासाची गोष्ट तशीच आहे. वामनपंडित देखील राजाश्रयाचा कवि नाहीं- 16 MAR 1990