पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माहाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण "कवी देवांचे रूपकर्ते । कवी ऋषींचे महत्त्व वर्णिते । नाना शास्त्रांचे सामर्थ्यते । कवी वाखा- णिती ॥ २० ॥" म्हणजे कवींचा धंदा जाहिरात करण्याचा आहे हें रामदास कबूल करतात पण रजोगुणी कवी हे राजे आणि स्त्रीसौंदर्य यांचीच जाहिरात करतात. रामदासांच्या मताप्रमाणे कवीस जाहि- रात करण्याचा विषय त्याहून भिन्न व गंभीर आहे. निर्गुण देवास सगुणरूप देणें, राजांचे महत्त्व न वर्णितां ऋषींचें महत्त्व वर्णन करणे, एवढेच नव्हे तर धर्मशास्त्राविषयीं लोकांत आदर उत्पन्न करून त्यांस चिरस्थायी करणें हों मोठाली काव्यें सात्त्विक कवींपुढे आहेत. हीं करावयास सात्त्विकभावनाप्रधान कवि पाहिजे, पैशाचा लोभी कवि असून उपयोगी नाहीं. कारण निर्गुण- निराकाराला सगुण-साकार केल्याने तो पैसे थोडेच देणार? भावेंतालचे राजे त्यांचे महत्त्व वर्णन केल्यानें पैसे देतील पण, ऋषी व ते देखील मृत असलेले ! त्यांच्या महस्ववर्णनापासून द्रव्यदृष्टीनें कांहीं एक फायदा नाहीं. त्याचप्रमाणें शास्त्रांचे महत्व लोकांस पटविणारे काव्य केल्याने देखील कवीचा आर्थिक दृष्ट्या कांहीं एक फायदा नाहीं. त्या अर्थी या तिन्ही गंभीर गोष्टींविषयीं काव्यरचना करण्याला आणि त्यांचें महत्त्व समाजास पटवून द्यावयास द्रव्येच्छा नसलेला म्हणजे उच्च दर्जाचा कवि पाहिजे. रामदासांनीं शिवाजीची प्रशंसा केली नाहीं असें नाहीं; पण ती प्रशस्तिलेखक भाटाप्रमाणें केली नसून उत्तेजन देणाऱ्या वडील मनुष्याप्रमाणे केली आहे. सगुण ईश्वराचें काव्य, त्याप्रमाणेच प्राचीन ऋषींविषयीं अत्यादर, आणि धर्मशास्त्राप्रमाणें समाजशासनाचे महत्त्व या सर्व गोष्टी तर कवींनी उत्पन्न केल्या. कवीमुळे समाजास स्थैर्य आहे म्हणून रामदास पुढच्याच ओवीत म्हणतात.- ५२ " नसता कवींचा व्यापार । तरी कैचा असता जगदुद्धार | म्हणौनि कवि हे आधार | कळ सृष्टीशी ॥ २१ ॥” आतांपर्यंत झालेल्या रामदासांच्या काव्यविष- यक सिद्धांताचें पुनरवलोकन करूं. (१) काव्य सरळ असावें ( अलंकार किंवा व्यंग्यार्थास प्राधान्य इत्यादिकांनीं तें दुर्बोध करूं नये ). (२) कवित्वाचे वाचकावर परिणाम जितके दृढ, दीर्घ, किंवा मोठ्या आवेगाचे होतील तितकें तें काव्य चांगलें. (३) काव्यामुळे वाचकाच्या मनावर परिणाम होण्यासाठीं तें उत्पन्न करणाऱ्या कवीच्याच मना- वर परिणाम झालेला असला पाहिजे. (४) वीट, पाठ आणि प्रासादिक हे कवित्वाचे संस्कार न होतां कधीच आपल्या मनांत येईल तें तीन प्रकार आहेत. कवीच्या मनावर गहनरस बोलत असतो तेव्हां होणारे काव्य धीट, वर्गात होतां तो केवळ पूर्वीच्या कवींचे शब्द व भाव- मोडेल. पाठ म्हणजे कवीवर संस्कार कांहींच न दर्शक वर्णनें घेऊन कवित्व करतो तें कवित्व जातो तेव्हां तें काव्य प्रासादिक होय. हें वर्गीकरण पाठ होय, व कवि जेव्हां अगदीं भावबद्ध होऊन इंग्रजीत सांगावयाचे झाल्यास " इंप्रेशनिस्ट, " " इमिटेटिव्ह " आणि " इन्स्पायर्ड " असें रूपांतर करावे लागेल. गुण (५) भाव हाच ज्याअर्थी काव्याचा प्रधान आहे त्याअर्थी जो भाव जितका उच्च प्रका रचा तितकी त्या भावाशीं संबद्ध कविता चांगली भाव ईश्वराविषयींच चांगला, त्याअर्थी भक्तिप्रधान व ईश्वरी प्रेरणा झालेली म्हणजे प्रासादिक कविता श्रेष्ठ होय. (६) जर कवीच्या कवित्वाचे महत्त्व भाव- नांच्या उत्पादनावर अवलंबून आहे, आणि ज्या- अर्थी भावनांचें उत्पादन मनुष्याच्या मनाच्या