पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रांचे परीक्षण मनोवृत्ति होय. त्याप्रमाणेंच प्रेम किंवा भक्ति ही ज्या व्यक्तींविषयीं उत्पन्न होतात त्या व्यक्तीच जर हनि स्वरूपाच्या असल्या तर तदाश्रयी कविता देखील हीन स्वरूपाची नाहीं काय? अशी त्यांची विचारसरणी होती. रामदासांनी काव्यामध्ये प्रासादिक काव्यास श्रेष्ठ ठरविले आहे. त्या बरो- बरच अनेक टिकाणी ईश्वरभक्तीचें जें कवित्व तेंच कवित्व या पदवीस लाख आहे असें वारं- बार म्हटले आहे. तर एकंदर ग्रंथकर्तृत्वासच राम- दासांनी तीच कसोटी लावली आहे. जो पारमार्थिक नव्हे तो ग्रंथच नव्हे असें रामदास म्हणतात. हें मत जरासें आग्रही दिसतें. पण आपल्या शिष्यवर्गानें आपल्या कवि- त्वाचा श्रेष्ठ उपयोग कसा करावा यासंबंधाने ते विचार व्यक्त करीत होते, यासाठीं प्रस्तुत आग्रही मत व्यक्त करतांना रामदासांच्या मनांत काय विचार होते (दशक ७ समास ९ ) हे देखील सम- जून घेतले पाहिजे. करीत आहेत. लौकिक ग्रंथास तो ग्रंथच नव्हे असें जें ते बोलतात ती केवळ अलंकारिक भाषा आहे. देशाभिमान, ग्रामाभिमान, अपत्यप्रेम, पत्नी- प्रेम इत्यादि भौतिक सुखांची अभिज्ञता, या गोष्टींनी युक्त असलेले काव्य आपणांस सुंदर वाटतें, तथापि या सर्व गोष्टींस प्राधान्य देणारें काव्य, ते गुण कवीच्या अंगी बाणल्याशिवाय काव्यांत कसे उत्पन्न होणार ? पण या प्रकारच्या गुणांनी युक्त पुरुष तोच रामदासांनी खालच्या दर्जाचा ठरविला आहे. 1 " जो गुण येतां शरीरी । वर्तणूक कैसा करी | सावध होऊनि चतुरीं । परिसावें ॥ ७ ॥ मातापिता आणि कांता । पुत्र सुना आणि दुहिता । इतकीयांची वाहे चिंता । तो रजो गुण ॥ ९ ॥ बरें खावे बरे जेवावें । वरे त्यावे बरे नसावें । दुसन्याचें अभिलाषायें | तो रजो गुण ॥ १० ॥ मी तरणा मी सुंदर भी बलाढ्य मी चतुर । मी सकळांमध्ये थोर | म्हणे तो रजो गुण ॥१४॥ "बहुत प्रकारे पाहतां । ग्रंथ नाहीं अद्वैताप माझा देश माझा गांव | माझा वाडा माझा ठाव । रता । परमार्थास तत्त्वतां । तारूंच कीं ॥ २८ ॥ इतर ऐसी मनीं घरी हांव । तो रजो गुण ॥ १५ ॥ . जे प्रापंचिक । हास्यविनोद नवरसिक । हित नव्हे बाळकावरी ममता । प्रीतीनें आवडे कांता । . तें पुस्तक | परमार्थासी ॥२९ ॥ जेणें परमार्थ वाढ | लोभ वाटे समस्तां । तो रजोगुण ॥ १८ ॥ आंगीं अनुताप चढे | भक्तिसाधन आवडे । त्या जिवलगांची खंती । जेणें काळे वाटे चित्तीं । नांव ग्रंथ ॥३०॥ जो ऐकतां गर्व गळे । कां ते तेणें काळें सीघ्रगती । रजोगुण झाला ॥ १९ ॥ भ्रांतीच मावळे । नातरी येकसर बोळे । मन भगवंतीं संसाराचे बहुत कष्ट | कैसा होईल शेवट । ॥३१॥ जेणें होय उपरति | अवगुण पालटती । मनास आठवे संकट | तो रजोगुण ॥ २० ॥ जेणें चुके अधोगति । त्या नांव ग्रंथ ||३२|| जेणें वैभव देखोनि दृष्टी । आवडी उपजली पोटीं । धारिष्ट वाढे | जेणें परोपकार घडे । जेणें विषय- आशागुणें हिंपुटी । करी तो रजोगुण ॥ २१ ॥ वासना मोडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३३ ॥ जेणें परत्र जें जें दृष्टी पडिलें । तें तें मनें मागितलें । साधन । जेणें ग्रंथे होये ज्ञान । जेणें होइजे पावन । लभ्य नसतां दुःख झालें । तो रजोगुण ॥ २२ ॥" या नांव ग्रंथ ॥ ३४ ॥ ग्रंथ बहुत असती । नाना विधानें फळश्रुति । जेथें नुपजे विरक्तिभक्ति । तो ग्रंथचि नव्हे ||३५||" रामदास येथें सार्वत्रिक स्वरूपाचें विधान करीत नसून आपल्या संप्रदायाच्याच दृष्टीनें या प्रकारें जें मन वर्णिले आहे त्या प्रकारचें मनच काव्याभिरुचीचे आणि रसिक वर्गाचें आहे असे रामदास दाखवितात. या प्रकारच्या मनास तें मध्यम प्रकारचें मन समजतात. ते पुढे म्हण- तात:-