पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण " क्रियेवीण शब्द ज्ञान । तथा न मानिती सज्जन म्हणौनि देव प्रसन्न । अनुतापें करावा ॥५॥ देवाचेन प्रसन्नपणें । जें जें घडे बोलणें । तें तें अत्यंत लावणें । या नांव प्रासादिक ॥ ६॥ रामदास कवित्वांचे प्रकार व्याख्येसह पुढे सांग- तात- 1 59 " "वीट पाठ प्रासादिक । ऐसे बोलती अनेक । तरी हा त्रिविध विवेक । बोलिजेल ॥ ७ ॥ “ धीट म्हणजे धीटपणें केलें । जें जें आपुल्या मनासि आलें | बळेंच कवित्व रचिलें । या नांव वीट बोलिजे ॥ ८ ॥ । " पाठ म्हणजे पाठांतर । बहुत पाहिले ग्रंथांतर तयासारिखा उतार । आपणहि केला ॥ ९॥ " या दोन प्रकारच्या काव्याशिवाय, पण प्रासा- दिक नसलेल्या, काव्याची उत्पत्ति वर सांगितलेल्या दोन्ही गुणांच्या संयोगानें उत्पन्न होते. त्यास रामदास धीटपाठ म्हणतात. त्याचे लक्षण ते पुढील ओव्यांत देतात- “शीघ्रचि कवित्व जोडिलें । दृष्टी पडिले तेंचि वर्णिलें | भक्तिवांचून जें केलें । त्या नांव धीट पाठ ॥ १० ॥ ' 34 “कामिक रसिक शृंगारिक । वीर हास्य प्रस्ताविक कौतुक विनोद अनेक । या नांव धीटपाठ ॥११॥ मन झालें कामाकार । तैसेचि निघती उद्गार | घीटपाठे परपार । पाविजेत नाहीं ॥ १२ ॥ व्हावया उदरशांति । करणे लागे नरस्तुति तेथें केली ते विपत्ति । त्या नांव घटिपाठ ॥१३॥ वर "धीट पाठ कवित्वा"च्या व्याख्येंत राम- दासांनी प्रत्येक शब्द मोजून घालण्याइतकी तर्कशास्त्रीय शुद्धि राखली नाहीं. तथापि आपली दृष्टि मात्र मांडली आहे; किंबहुना, भावनेच्या खोलपणामुळे तें धीट म्हणता येणार नाहीं. असें कव्य या नवीन सदरांत घातले आहे. जेव्हां मन कामाकार होते तेव्हां भावना वरवरची नसते तरी त्या काव्यास केवळ भावनोत्कटतेमुळे प्रासादिक काव्यांत घालावयास रामदासस्वामींना नको होते. धीट, पाठ, व धीट पाठ हे हलक्या तन्हेचें कवित्व रामदास समजतात आणि म्हणतात- "कवित्व नसावें धीट पाठ । कवित्व नसावें खटपट । कवित्व नसावें उद्घट | पाषांड मत ॥ १४ ॥ कवित्व नसावें वादांग । कवित्व नसावें रसभंग । कवित्व नसावें रंगभंग | दृष्टांतहीन ॥१५॥ कवित्व नसावें पाल्हाळ | कवित्व नसावें बाष्कळ । कवित्व नसावें कुटिल । लक्षुनियां ॥ १६ ॥ हीन कवित्व नसावें । बोलिलेंचि न बोलावें । छेदभंग न करावें । मुद्राहीन ॥ १७॥ वित्पत्तीहीन तर्कहीन | कलाहीन शब्दहीन | भक्तिज्ञानवैराग्यहीन | कवित्व नसावें ॥१८॥” 1 हे सर्व विवेचन दोष कोणते टाळावेत यावि- षयींचें आहे. आणि ज्यास विद्या, तर्क, कला, शब्द किंवा भक्तिज्ञानादि भावना नाहींत त्याने काव्याच्या भानगडीत पडण्यांत अर्थ नाहीं असें सांगणारे आहे. कोणास तरी लक्षून लिहिलेली कुटिल कविता स्वामींनी पाहिली असावी. ती टिकली नाहीं हें मात्र खरें. कवीता भावप्रधान पाहिजे हैं पुढच्या ओव्यांत दाखवितात- "भक्तीहीन जें कवित्व । तेंचि जाणावें ठोंबें मत । आवडीहीन जें वक्तृत्व | कंटाळवाणें ॥ १९ ॥ भक्तीविण जो अनुवाद । तोचि जाणावा विनोद | प्रीतिविण संवाद । घडे केंवि ॥ २०॥” आवडीशिवाय ज्याप्रमाणे वक्तृत्व कंटाळ- वाणें होतें त्याचप्रमाणे भक्तिकाव्य भक्तीशिवाय कंटाळवाणें होतें. त्यास "ठोंबें" काव्य म्हणावें. जो अनुवाद भक्तीशिवाय होतो ती "थट्टा" आहे, संवाद नव्हे. म्हणजे प्रेमाशिवाय प्रेमव्यंजक जे