पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहिजे. आणि “ज्ञान” झाले पाहिजे. खऱ्या विदेहबुद्धि तुटावी, भवसिंधु आटावा, भग- बंत प्रगट व्हावा, सद्बुद्धि लागावी, पाखंड गंगावें, विवेक जागृत व्हावा; त्याच्या योगानें सत्य सम- जावें, आभास निरसला जावा, आणि आपपर भाव नाहींसा व्हावा, समाधान व्हावें, संसारबंध तुटावा इत्यादि इत्यादि. अर्थात भक्तिरूपी काव्यापासून जितके परि- णाम अपेक्षिले आहेत ते काव्यकत्यांच्या मनांत भक्तिभावाची उत्कटता व ज्ञानीपणा उतरल्या- शिवाय काव्यांत उत्पन्न होऊ शकणार नाहीत; म्हणजे रामदासांच्या दृष्टीने काव्य सरस पाहिजे; तें वाचकावर अत्यंत परिणाम घडविणारे पाहिजे; आणि त्यासाठी कर्त्याच्या मनांत प्रेरणा जोराची झाली पाहिजे, असा एकंदर अर्थ निघतो. काव्याचे परिणाम किती झाले पाहिजेत हैं सांगतांना जी भाषा रामदासांनी वापरली आहे ती भाषा वाचतांना देहबुद्धि तुटली पाहिजे, भवसिंधु आटला पाहिजे इत्यादि काव्यापासून अपेक्षिलेले परिणाम वाचून अतिशयोक्तीची भावना वाटल्यावांचून रहात नाहीं. तथापि ती 'अतिशयोक्तीची भाषा सकारण आहे. काव्याचा आत्मा रस आहे व चांगले काव्य म्हणजे ज्यांत इस हाच उत्कटतेस गेलेला असेल तेंच होय. पण उत्कटतेस गेलेला रस म्हणजे काय ? रसांची डिग्री मोजण्यासारखें साहित्यांतर्गत गणितशास्त्र अजून सांपडलें नाहीं. काव्यांत रस पुष्कळ आहे किंवा कमी आहे हे सांगावयाचे कसें ? रसोत्पत्ति ही तिचे वाचकांच्या मनावर परिणाम 'दाखवू • नच मोजावयाची असते. तिचे परिणाम जितके जास्त होतील तितका रस जास्त चांगला उतरला असे समजावयाचें. भक्तिरस व अध्यात्मभावना ही चांगली उतरली असें केव्हां समजावयाचे? तर तो ग्रंथ वाचून वाचकासच वैराग्यपरता भासेल ४७ रामदासांचे साहित्यशास्त्र तेव्हां अर्थात रसाचें दृढत्व कवीकडून मागण्या- साठी त्या त्या काव्याचे परिणाम आपण किती मोठाले अक्षेपितों हें सांगावयाचें, या दृष्टीनें काव्याचा परिणाम काय झाला पाहिजे याविषयीं अतिशयोक्तीची भाषा रामदासांच्या लेखांत आली आहे. आतां रामदासांनी केलेल्या कवींच्या वर्गी- करणाकडे लक्ष देऊ. हें वर्गीकरण करतांना उत्तम काव्य, कनिष्ठ काव्य इत्यादि तारतम्याची कल्पना देत आहे. रामदासांचे कवित्वविषयक विचार मुख्यत्वें - करून दासबोधांत दशक १४, समास ३ यांत व त्याचप्रमाणें दशक १ समास ७ यांमध्येहि सांपड- तात. तथापि त्यांची काव्यविषयक वृत्ति दास- दोघांत अनेक ठिकाणी आढळून येते. ही काव्य विषयक वृत्ति त्यांनी प्रत्यक्ष सांगितली नाहीं तर त्यांनी मानसशास्त्रीय विवेचन केले आहे त्यावरून ती आपणांस दिसून येते. ही कवित्वाचे स्वरूप ठरविणारी जी मनाची बरी वाईट प्रवृत्ति किंबहुना प्रवृत्तीच्याहि मागे असणारी जी प्रकृति तीवर काव्यपरता अवलं- बून असते. ती मनुष्यप्रकृति दाखविणारे उतारे घेतल्याशिवाय रामदासांच्या साहित्यशास्त्राचें स्पष्टीकरण होणार नाहीं. कवित्वकलेवरील १.४ व्या दशकांतील विवेचनाकडे प्रथम बळू. रामदासांच्या कवित्वविवेचनाची पहिलीच ओवी मोहक आहे ती अशी- "कवित्वशब्द सुमन माळा । अर्थ परिमळ आगळा । तेणें संत षट्पदकुळा । आनंद होये ॥ १॥" कवितेत जर केवळ दुसऱ्यांच्या शब्दांचा पुनरुच्चार नको असेल तर ज्या भावना लोकांत उत्पन्न करावयाच्या त्या कवींतच उत्पन्न झाल्या पाहिजेत हें धार्मिक काव्याच्या बाबतींत सांगण्या- साठी रामदास सांगतात.