पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण दासबोध हें काव्य नसून एक मोठे विचारभांडार आहे हें कोणासहि एका वाचनानेच समजण्या- सारखें आहे. ४६ रामदासांनी कर्मयोगपर विचार ज्याप्रमाणें कांहीं तरी नवें सांगून उत्कर्षास नेला त्याप्रमा- णेच त्यांनीं साहित्यशास्त्रीय विचार अगदी स्वतंत्र केला आणि तो संस्कृत ग्रंथकारांच्या पुढे नेला आहे. रामदासांचे काव्यावर लिहिणें साहित्य शास्त्राच्या दृष्टीनें कितपत शास्त्रीयविवेचन आहे, त्यांच्या विचारांत कांहीं नावीन्य आहे काय, किंवा तें निदान विचार करण्याजोगे आहे काय हे आपण पाहूं. दासबोधांतून या विषयावर कांहीं उतारे घेतां येतील. जेव्हां संतकवी कवितेवर विवेचन करीत तेव्हां कवित्वाविषयीं स्वसंप्रदायनिरपेक्ष विचार प्रगट करीत नसून आपल्या संप्रदायांतील काव्य करूं इच्छिणारांनां सूचना देत आहेत हैं लक्षांत घ्यावें आणि त्यांच्या स्वसंप्रदायविषयक सूचना त्यांच्या विवेचनांतून वजा केल्या म्हणजे त्यांचे कवित्व- विषयक सामान्य विचार आपण निवडून काढले असें समजावें. 1 " कवित्व असावें निर्मळ । कवित्व असावें सरळ- कवित्व असावें प्रांजळ | अन्वयाचें ||३६|| मृदु- मंजुळ कोमळ । भव्य अद्भुत विशाळ । गौल्य माधुर्य रसाळ | भक्तिरसें ॥४०॥ जेणें अनुताप उपजे । जेणें लौकिक लाजे । जेणें ज्ञान उमजे । या नांव कवित्व ॥४८॥ जेणें देहबुद्धि तुटे । जेणें भवसिंधु आटे | जेणें भगवंत प्रगटे । या नांव कवित्व ||१०|| जेणें सद्बुद्धि लागे । जेणे पाखंड भंगे । जेणें विवेक जागें । या नांव कवित्व ॥ १७॥ जेणें सद्वस्तु भासे । जेणें भास हा निरसे । जेणें भिन्नत्व नासे । या नांव कवित्व ॥ ५२ ॥ जेणें होये समाधान । जेणें तुटे संसारबंधन । जया मानिती सज्जन | या नांव कवित् ॥५३॥" (दशक १४, समास ३). वर घेतलेल्या उताऱ्यांत स्वसंप्रदायसापेक्ष विचार आणि कवित्वविषयक विचार यांचे पृथ- क्करण करतां येणेंप्रमाणें मांडणी करता येईल- वरील उताऱ्यांत केवळ कविताविषयक विवे- चन फार थोडें आहे. कवित्व निर्मळ असावें, सरळ असावें, प्रांजल अन्वयाचे असावें म्हणजे कवचे म्हणणे समजावयास कांहीं एक आयास पडू नयेत. तें मृदु, मंजुळ आणि कोमल असावें, गौल्यामुळे माधुर्यामुळे रसाळ असावें एवढेच सांगि- किंवा भव्य अद्भुत विशाल असावें, तसेंच तें तलें आहे. इतक्या अनेक शब्दांत जर मुख्य कांहीं कल्पना असेल तर ती हीच कीं अलंकार घाल- इच्छेने, किंवा दुसन्या अनेक क्लृप्त्या लढवून कवीनें ण्याच्या किंवा व्यंग्यार्थाला प्राधान्य देण्याच्या आपला सरळपणा घालवू नये. संस्कृत कवितेच्या उत्तर काळी कवितेला जी कृत्रिमता कवींनीं आणली तिचा निषेध स्पष्ट शब्दांत रामदासांनी केला आहे. केवळ सौलभ्याच्या उपदेशानें कवित्वाचें स्पष्टी- मतें अधिक तपासली पाहिजेत. करण होत नाहीं. रामदासांची काव्यविषयक काव्यास काव्यत्व कशानें येईल याचें तात्त्विक निरपेक्ष विवरण रामदासांनी केलेले नाहीं तर आपल्या संप्रदायाचें काव्य कसें असावें हें त्याच समासांत सांगितलें आहे. त्यांत साहित्यशास्त्रीय तत्त्व गोंवून दिलें आहे कीं कवित्वाचे परिणाम अजमावले पाहिजेत. कवित्व जर परिणामकारी होईल तरच त्यास महत्त्व आहे. परिणाम कसे व्हावयास पाहिजेत हैं रामदास पुढें सांगतात व ते परिणाम त्यांस इष्ट असलेल्या भक्ति- रसमय रसाळ कवितेपासूनच अपेक्षितात. जर कवित्व अन्य रसाचें असले तर अन्य परिणाम अपे- क्षिले पाहिजेत. भक्तिरसमय काव्याचे मनावर अपेक्षिलेले परिणाम असे त्या काव्यामुळे अनुताप उपजला पाहिजे, लौकिकाविषयीं इच्छा लाजली