पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ५ (पृ. १९-२४ ) मराठी वाङ्मयाचा पहिला काळ व कवींचें आपल्या अस्तित्वाचें समर्थन ज्ञानेश्वरपूर्वकालांत मराठींत शिष्टवाड्मय नसल्यामुळे ज्ञानेश्वरकालीं मराठीत ग्रंथलेखन करतांना दशभाषेत लेखनाबद्दल माफी माग ण्याची किंवा समर्थन करण्याची तन्हा पडली ती महिपतीच्या काळापर्यंतहि दिसून येते. दासो- पंत संस्कृतपेक्षां मराठींतच लिहिणें जास्त चांगलें असें समजत होता व संस्कृतमध्ये लिहिणें हा दांभिक पक्ष समजत होता. दासोपंताच्या वृत्तीत आणि मराठीच्या अर्वाचीन अभिमान्यांच्या वृत्तीत फरक आहे (पृ. १९). प्रकरण ६ वें (पृ. २५-२९ ) अभिज्ञतेचे तीन प्रकार आदरव्यक्ति, भाषांतर व अनुकरण संतमंडळी एकमेकांविषयीं आदर दाखवीत, पण तो कवि म्हणून न दाखवितां संत म्हणून दाखवीत. मराठी ग्रंथांची संस्कृतमध्ये रूपांतरें होत; आणि कवि एकमेकांचें अनुकरण करीत. मनास बोध नामदेव, एकनाथ, रामदास व वामन या चौघांनीं लिहिला आहे (पृ. २५). प्रकरण ७ बे (पृ. २९-३३) स्वकाव्यसमर्थन आणि त्याचें महत्त्व मराठी कवी स्वकाव्याचे समर्थन करीत. ती समर्थन करण्याची पद्धति अशी होती कीं, आपण ईश्वरी प्रेरणेमुळे बोलत आहोत असें ते दाखवीत. या प्रकारची प्रवृत्ति आपले विचार व्यक्त करणारे कवीच दाखवीत असें नव्हे तर महि- पतीसारखे चरित्रकार देखील दाखवीत (पृ. २९). प्रकरण ८ बे (पृ. ३३-४० ) संतकवींची आपल्या वैशिष्ट्याविषयीं जाणीव आपल्या काव्याचीं परीक्षणत निराळीं आहेत अशी संतकवींनां जाणीव होती; तथापि आपल्या वृत्तीचें साहित्यशास्त्रदृष्ट्या समर्थन कर- ण्याची बहुतेक कवींनां ताकद नव्हती, आणि यासाठीं ईश्वरी प्रेरणेचें विधान पुष्कळ प्रसंगीं होत होतें (पृ. ३३). संतकवींनीं रसास प्राधान्य दिलें आहे, आणि यासाठी सरळ अकृत्रिम काव्याचा आग्रह धरिला आहे. संतकवींची काव्य- विषयक वृत्ति आणि मोरोपंतांची काव्यविषयक वृत्ति हीं निन्न होतीं. मोरोपंतावर रानड्यांनीं टीका केली ती विषयीं चिपळुणकर आणि पांगा- रकर यांची चुकीची वृत्ति (पृ. ३८). प्रकरण १ वें (पृ. ४०-४४ ) स्वतःवर अभिप्राय व्यक्त करण्याची पद्धति संतकवी स्वतःच अभिप्राय देत. ती पद्धत आजच्या स्थितींत खपण्यासारखी नाहीं. तुकाराम आत्मस्तुतीबरोबर दुसऱ्यांची निंदा करीत होता. तुकारामास कोणत्या कवीविषयीं इतका मत्सर होत होता हें सांगतां येत नाहीं ( पृ ४२ ). प्रकरण १० वै ( पू. ४४ -१३ ) रामदासांचें साहित्यशास्त्र संतकवींच्या काव्यांतील भक्ति उत्तरकालीन स्तोत्ररूपी संस्कृतवाङ्मयापेक्षां उच्च प्रकारची आहे. रामदासांनी संतकवींच्या काव्याचे साहित्य- शास्त्र सांगितलें आहे. तें दासबोध दशक १ समास ७, व दशक १४ समास ३ यांत सांपडेल. रामदास कवितेचें धीट, पाठ व प्रासादिक असें