पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्या वर्गाविषयीं लिहावयाच्या तो राजन्यवर्ग दुर्बल झाला म्हणजे त्याबरोबर त्याच्या प्रशस्तिलेखक कवींच्या कवित्वास सुद्धां ओहोटी लागणें स्वाभा - विक होतें. ४५ • शिवाजीवर जीं पर्णालाख्यान वगैरे काव्ये झाली ती दोन स्वरूपाची आहेत. एक तर तीं प्रशरतिवाङ्मयाचा विकास होत व पुराणवाङ्म- याशीं तीं संबद्ध होऊ पहाणारीं होत. अशा वेळेस कवितशक्तीचा ओघ स्तोत्ररच नेच्या कामी लागला होता. यास कवित्वाच्या इतिहासाच्या दृष्टीने, तसेंच धार्मिक इतिहासाच्या दृष्टीनें कारण आहे. ज्ञानेश्वरकालांतच बुद्धधर्म व जैनधर्म यांचे प्राबल्य नाहींसें होऊन पौरा- णिक धर्म चांगलाच स्थापन झाला होता हैं हेमाद्रीच्या चतुर्वर्ग चिंतामणीवरून अगदी स्पष्ट दिसून येते. या ग्रंथांत पौराणिक मतांचेच स्पष्टी करण वैशिष्ट्याने केलें आहे. पौराणिक धर्म स्थापनेबरोबरच सर्व प्रकारच्या वाङ्मयास पौरा णिक स्वरूप द्यावयाचें आणि त्याचा कोणत्या तरी पुराणांत अंतर्भाव करून द्यावयाचा इत्यादि प्रयत्न झालेले आहेत. राजप्रशंसा पुराणसंबद्ध करण्याचा प्रयत्न जसा शिवभारतांत दिसून येतो तसाच इतर प्रशस्तिलेखांत देखील दिसून येतो. स्तोत्रवाङ्मय जें तयार होई त्याला तें संस्कृ- तांत असल्यामुळे महत्त्व येई पण काव्य या दृष्टीनें त्याचें महत्त्व कमीच होतें. रामरक्षेसारखीं जीं स्तोत्रे तयार झालीं तीं देखील अत्यंत कृत्रिम आहेत आणि तसली स्तोतें पाहून संतकवींनां त्यांच्यापेक्षां आपलेच ग्रंथ सरस आहेत ही भावना उत्पन्न होणें अगदीं स्वाभाविक आहे. त्यांना असेंहि बाटे कीं, या पंडितवर्गाची भक्ती खोटी मी कुणबी झालों हेंच बरें झालें नाहीं तर दंभानेंच मेलों असतों असें तुकाराम म्हणे. रामदासांचे साहित्यशास्त्र पूर्वकालीन लेखकांनी आपल्यामध्ये वैशिष्ट्य- आहे याची जाणीव दाखविली तर आपल्या धार्मिक भावनांमध्ये कांहीं विशिष्ट शास्त्रीय पद्धति आहे असें रामदासांनी दाखविलें. दास- बोधामध्ये जो व्यावहारिक विचार आहे किंब- हुना संस्कृत ग्रंथकारांनीं सांगितलेल्यापेक्षां जें जास्त कर्मयोगशास्त्र त्यांत आहे त्याची परस्पर- संगति कै. राजवाडे यांनी चांगली जुळवून ती ग्रंथमालेत पूर्वी मांडली आहे. ज्याप्रमाणें आपल्या अत्यंत निराळ्या पारमार्थिक प्रवृत्तीचें शास्त्रीय विवेचन दासबोधांत रामदासांनी केले आहे, त्याचप्रमाणे आपल्या संप्रदायाच्या आश्रयाने जें काव्य उदित झाले त्याचेहि विवेचन या दास- बोधरूपी ज्ञानकोशांत रामदासांनीं केलें आहे. ग्रंथ कसा लिहावा हें, अक्षर कसें असावें येथपासून सांगितलें आहे. त्यावेळेस मराठीत प्रत्येक विषया- वर स्वतंत्र ग्रंथ व्हावा असा काळ आला नव्हता. त्यामुळे रामदासासारखी अनेक विषयांवर विचार करणारी जी व्यक्ति होती तिला आपले सर्व प्रकारचे विचार एकाच ग्रंथांत घालावे लागले. हा ग्रंथ वाचतांना असें वाटू लागतें कीं, हा ग्रंथ अजून लोकांस चांगला. समजला नाहीं. अनेक शास्त्रांवर ज्या नवीन गोष्टी यांत सांगितल्या आहेत, त्या गोष्टींचे महत्त्व, त्या त्या शास्त्राचें पूर्वरूप ठाऊक असल्याशिवाय समज- णार नाहीं. संस्कृत ग्रंथभांडार पाहिल्यानंतरच यांत नवीन काय आहे हे दिसूं लागतें. यांत पूर्वीच्या ग्रंथकारांस अपरिचित असें मानसशास्त्र आहे, तसेंच पूर्वी कोठें न सांगितलेलें असें समा- जशास्त्र आहे, तसेंच मानवी आयुष्याचें अत्यंत सूक्ष्म व नवीन असें पृथक्करण आहे. विचाराच्या नावीन्याची व विविधत्वाची जाणीव रा. देव यांस झाली, हें त्यांच्या दासबोधाच्या प्रस्तावनेवरून दिसतें. पण विचार नावीन्याची व्यापकता रा. देव- यांनीं मांडली तीपेक्षां पुष्कळच अधिक आहे.