पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्य परीक्षण: भक्तराज हांसतील ॥ १ ॥ आतां आला एका निवा- ड्याचा दीस | सत्याविण रस विसरला ॥ २ ॥ अनुभवाविण कोण करी पाप । रितेचि संकल्प लावावे ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां न धरखे धीर । नव्हे जीव स्थिर माझा मज ॥ ४ ॥ " वरील अंभंगांवरून तुकारामास आरंभीच्या कालांत कविता करण्याविषयीं लाज वाटत होती, पण त्यास जो अध्यात्मिक अनुभव आला त्या- मुळेच त्यास कवन करण्यास धैर्य आलें असें दिसतें. 66 “ पावावें संतोष । तुम्हीं यासाठीं सायास ॥१॥ करीं आवही वचनें | पालटुनि क्षणक्षणें ॥ २ ॥ द्यावें अभयदान | भूमी न पडावें वचन ॥ ३ ॥ तुका म्हणे परस्परें | कांहीं वाढवी उत्तरे ॥ ४ ॥” केल्या पुरती आळीं । कांहीं होते टाळाटाळी ॥ १ ॥ सत्य संकल्पाचें फळ | होतां न दिसेची बळ ॥ २ ॥ दळणाच्या ओंव्या । रित्या खऱ्या मापें घ्याव्या ॥ ३ ॥ जातीं उखळें चाहूं । तुका म्हणे राज्य घाहूं ॥ ४ ॥ " कवींच्या मनांतील आपल्या काव्यांविषयींच्या आणि दुसऱ्याच्या काव्याविषयींच्या भावना काय होत्या हें आणखी कबी घेऊन देत नाहीं. अनेक कवींचीं कथा तुकाराम व वामन यांच्यासारखीच आहे. प्रकरण १० से. रामदासांचें साहित्यशास्त्र आपले काव्य निराळ्या प्रकारचें आहे ही जाणीव संतकवींनां जी झाली होती ती त्यांनीं आपली प्रेरणांकितता दाखवून आणि कवित्वाची व्याख्या निराळी करून व या प्रकारच्या अनेक रीतींनी व्यक्त केली होती. ही जाणीव तत्त्वरू- पानें कोठें तरी मांडली जाणें अवश्य होतें. आपला ४४ परमार्थविषयक संप्रदाय इतर लोकांपेक्षां जरा निगळा आहे ही गोष्ट ते उमजून चुकले होते. आपलें काव्यवैशिष्टय उमजण्यास आपल्या कान्यापेक्षां निराळ्या प्रकारचें काव्य ते आस- पास पहात असले पाहिजेत, व प्रचलित कल्प- नांशी भांडत असले पाहिजेत. अभिमानानें भांडण्याजोगें त्यांचे वैशिष्ट्य होतें हैं शिवकालीन वाङ्मयाचा आढावा घेऊन पुढे दाखविलें आहे. आपलें वैशिष्ट्य ईश्वरभक्तीत आहे तसेंच कवितें- तहि आहे असे रामदासांस अगदी स्पष्टपणें वाटत होते. संस्कृत ग्रंथांतील भक्ति ज्या प्रकारची होती त्यापेक्षां आपली भक्ति अधिक तीव्र आहे या प्रकारची भावना इतर संतकवींतहि होती. तशी भावना असल्याशिवाय, "ज्ञानदेवानें पाया रचिला आणि तुकारामाने त्याला कळस चढ- विला" असे वाक्य तुकाराम बोलला नसता, किंवा प्रो. दांडेकर यांच्या मताप्रमाणें तें वाक्य तुका- रामाचे नसून त्याची शिष्यीण बहिणाबाई ( ज्ञान- कोश पृ. व १५९ ) हिचें असले तर बहिणाबाई देखील ते बोलली नसती. संस्कृत काव्याच्या इतिहासांत शिवकाल हा स्तोत्ररचनेचा काल आहे. या काळचें संस्कृत वाङमय जर पाहिले तर त्यांत नाटयवाङ्मय बरेंच दिसतें पण खंडकाव्ये बेताचींच आहेत. त्यांत मुख्य भरणा स्तोत्रांचा आहे, पण ही स्तोत्र- रचना देशी वाङ्मयांत स्तोत्रवाड्मय वाढलें त्याचा परिणाम म्हणून झाली असावी असें वाटतें. महाकाव्यें हीं ज्ञानेश्वरकालापूर्वीच लिहून झाली होती आणि त्याच्यानंतरची काव्ये म्हणजे राजप्रशस्त्यांची काव्ये होत. हीं प्रशस्त्यांची काव्ये म्हटलीं म्हणजे त्यांत कवित्वशक्ति बेता- चीच असलेली आणि राजांच्या वंशावळया वगैरे देणारी अशी होती. हीं लहानच असत, वहीं ताम्रपटांमधून देखील दृग्गोचर होतात. प्रशस्त्या