पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३ स्वतः अभिप्राय व्यक्त करण्याची पद्धति विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी तर उलट स्तुतीच निर्णय निघतो की भयंकर मत्सरपिशाच्चिकेने केली आहे. तो अभंग येणेप्रमाणे. १ ॥ "संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥ ज्ञानदेवें रचिला पाया । रचियेलें देवालया ॥ २ ॥ नामा तयाचा किंकर । तेणें केला हा विस्तार ॥३॥ जनार्दन एकनाथ | ध्वज उभारिला भागवत || ४ || भजन करा सावकाश । तुका झालासे कळस || ५ ||" ( आवटे - तुकाराम गाथा, अभंग ४१४५ ) - प्रो. दांडेकर यांचें असें मत आहे कीं, हा अभंग तुकारामाचा नसून बहिणाबाईचा आहे. तथापि तसें मत व्यक्त करण्यास चांगलासा आधार दिलेला नाहीं. असो. तुकारामाचे हे वरचे उद्गार काव्यपरीक्षण - वाचक कितपत आहेत, तें सांगतां येत नाहीं. याने हे उद्गार कोणत्या "कवीश्वरा" संबंधाने काढले हे समजण्यास आज मार्ग नाहीं. या उद्गा- रामध्ये जे आरोप केले आहेत ते म्हटले म्हणजे टीकाविषय झालेला "कवीश्वर" दुसन्यांच्या कल्पना किंवा शब्द चोरतो, त्याचीं वागणूक वाईट आहे आणि ती कोणत्या बाबतीत म्हणून विचारल्यास तुकाराम एवढेच सांगतो की त्याच्या मनांतून द्रव्याशा आणि स्त्रीप्रेम गळालेली नाहींत त्याला मुले व्हावीत अशी आवड आहे वगैरे. तुकाराम त्या " कवीश्वराच्या पदरीं परदारा- भिलाष बांधीत नाहीं हें लक्षांत ठेवण्याजोगे आहे. दुसरे आरोप कोणते तर तो दंभ करतो, आणि लोकांना तो आपल्या पायां पडायला लावतो, 'अंगांत गुण नसतांना तो लोकमान्य होऊ पहातो वगैरे. त्याला भजणारे लोक आंधळे आणि बहि- रट आहेत वगैरे. हे सर्व तुकारामाचे शब्द वाचले म्हणजे टीकाविषय झालेला मनुष्य खरोखर मोठा बाईट इसम दिसत नाहीं. इतकें असतां तो मनुष्य यावच्चंद्रदिवाकरौ नरकांत पडणार आहे असें तुकारामांनी का म्हणावें बरें. त्यावरून एकच तुकाराम बोवांस पछाडलें होते. तुकारामाच्या या शिवराळ भाषेवरून लोक- मान्य टिळकांच्या दुर्बल टीकाकारांची आठवण होते. ते तरी काय म्हणत. ते एवढेच म्हणत कीं, लोकमान्यांना खरी देशभक्ति नाहीं. लोक वेडे म्हणून ते त्यांची पूजा करतात, वगैरे. तुकारामाला ज्या कवीचा इतका संताप येत होता आणि ज्या विषयीं इतका मत्सर वाटत होता तो कवि फारच उच्च असला पाहिजे यांत शंका नाहीं. या कवीचें नांव तुकारामानें कां बरें प्रसिद्ध केलें नाहीं ? कदा- चित सालोमालोवर जो दुसरा एक ताशेरा झाडला आहे त्यावरून तोच कवि असेल काय अशी शंका उत्पन्न होते. तुकारामाचा टीकाविषय झालेला कवि देहूच्या आसपासच होऊन गेला असणे शक्य आहे. कधीं कधीं असेंहि होतें कीं, एखादा मोठा मनुष्य आपल्या समकालीन फाल्तु व्यक्तीबद्दल मनांत राग धरतो आणि त्यावर कोरडे ओढतो. होते. तुकारामाने एका समकालीन “हरीच्या त्यामुळे ती फालतु व्यक्ति मात्र चिरस्मरणीय दासाला " चिरंजीव केलें आहे. नाहीं तर "सालो- मालोचें नांव कोणास ठाऊक असतें ? तुकाराम त्याविषयी खालीलप्रमाणें लिहितो- "सालोमालो हरिचा दास । म्हणुन केला अवघा नास ॥१॥ अवघें वच मंगळ केलें । म्हणती एकाचें आपुलें ॥२॥ मोडुनि संतांचीं वचनें । करिती आपणां भूषणें ||३|| तुका म्हणे कवी । जगामधीं रूढ दावी || ४ || (आवटे, तुका. गाथा, पृ. ६०१-६०२). तुकारामानें आपल्याविषयीं मत आणखी एका ठिकाणीं व्यक्त केलें आहे. ते अभंग येणेप्रमाणे- कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार (पृ. १७०) " करूं कवित्व काय नाहीं आतां लाज । मज