पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण पण दुखत होतें हें खरें. शिवाय तें इतकें दुखत होतें कीं त्याबद्दल आजच्या ग्रंथकारास हसू आल्या - . शिवाय रहाणार नाहीं. एखाद्यानें भक्ति चांगली केली व दुसऱ्याने जरा बेडीवांकडी म्हणजे दुस- याचे शब्द घेऊन केली म्हणून खेदाचें कारण नाहीं. तर मग काव्य करतांना इकडचे तिकडचे शब्द घेतले म्हणून काय बिघडलें ? याचे उत्तर हेंच कीं, काव्य हें केवळ ईश्वरभक्तीचें साधन वाटत नव्हतें, तुम्हां आम्हांप्रमाणे तुकारामहि गौर - वाचा भुकेला होता आणि त्यास संत म्हणून ख्याती हवी होती एवढेच नव्हे तर कवि म्हणून ख्याती हवी होती व दुसऱ्याची तशी ख्याती नको - होती.. तुकारामास आपल्या काव्याची उच्चता भासत होती व आपल्या काव्यक्षेत्रांत कमी योग्य- तेच्या मनुष्याने उडी घातली तर न जाणो पुढें मागे त्यास आणि आपल्यास एकाच मालिकेत लोक ओवतील असा तुकारामास घाबरटपणा उत्पन्न झाला होता. आपल्याला जो सन्मान मिळावयास पाहिजे तो दुसन्यास मिळतो असें त्यास वाटे. “एकाचिया सोई कवित्वाचे बांधे | बांधलिया साधे काय तेथें ॥ १ ॥ काय हाती लागे भुसाचे कांडणीं । सत्याची दाटणी करूनि ठेवी ॥ २ ॥ कवित्वाचे रूढी पायां पाडी जग । सुखावोनी मग नरका जाय ॥ २॥ तुका म्हणे देव केल्याविण साहे । फजिती ते आहे लटिक्या अंगीं ॥। ४ ॥ . तुकारामास घाबरटपणा आणि त्वेष आला त्याचे कारण जग त्या कवीच्या पायां पडे हेंच होतें; आणि त्यामुळे तुकारामास इतका संताप येई की तो उष्ट्या पत्रावळी गोळा करणारांस चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत नरकांत पाठवितो !! “उष्ट्या पत्रावळी करूनिया गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥ १॥ ऐसे जे पातकी ते नरकीं पंचती । जोवरीं भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥ तुका ४२ म्हणे एका नारायणा ध्याई । वरकडा वाही शोक बसे ॥ ३ ॥" तुकाराम ज्या इतक्या त्वेषाने एका विशिष्ट व्यक्तीस शाप देत होता, केवळ सामान्य विधान करीत नव्हता त्या व्यक्तीस लोक " कवीश्वर " म्हणत असावेत असें दिसतें. तुकारामास त्या कवीश्वराचा इतका राग येई. कीं त्याचा आम्हाला विटाळ होतो असें तुकाराम सांगतो. त्याच्या दांभिक कवितेची आवड धरणारे लोक बहिरट आणि आंधळे आहेत पण शेवटी तोंड (कोणाचें ? कवीश्वराचे किंवा त्याच्या चहात्यांचे) काळे होईल असें तुकाराम भविष्य करतो. "कवीश्वरांचा तो आम्हांसी विटाळ | प्रसाद वोंगळ चिवडिती ॥ १ ॥ दंभाचे आवडी बहिराट आंधळे । शेवटास काळे होईल तोंड ॥२॥ सोन्याशेजारीं तो लाखेची जतन । सतत ते गुण जैसे तैसे || ३ || सेव्यसेवकता न पडतां ठावी । तुका म्हणे गोबी पावती हीं ॥ ४ ॥” तुकारामाच्या आत्मप्रौढीच्या अभंगांबद्दल राग मात्र वाचकांस येत नाहीं आणि याचें मुख्य कारण म्हटले म्हणजे, प्रत्येक मनुष्याला आत्म- प्रशंसेची थोडीबहुत तरी आवड असतेच हें होय; व त्यास तुकारामबाबांसारखे नम्र गृहस्थ देखील आत्मस्तुति करतात हैं पाहून तुकाराम- बाबांसारख्याविषयीं आपलेपणा वाटू लागतो. जें स्वाभाविक आहे, तें दृष्टीस पडले म्हणजे जें प्रेम वाटतें तें आपणाशी अगदी विसदृश अशा व्यक्तीबद्दल वाटत नाहीं; आणि यामुळे थोरां- मोठ्यांचे जे दोष दिसू लागतात, तेच त्यांच्या- विषयी लोकांच्या मनांत आपलेपणा उत्पन्न कर- तात. शिवाय लोकांनां एकसारखा भक्तीत तल्लीन झालेला तुकारामच पहावयास हवा आहे असें नाहीं, तर शेजान्याचा गौरव पाहून मत्सर झालेला व शिव्या देणारा तुकाराम देखील पहावयास हवा आहे. एका प्रौढीच्या अभंगाची निबंधमालाकार