पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वदों भाव त्याचा महाराष्ट्र वाणी । जरी शब्द थोडे न अर्थास वाणी । "" ( योगवासिष्ट, श्लोक ४) मराठी समश्लोकी- टीकेबद्दल वामनाचा स्वतःचा अभिप्राय- " समश्लोकी टीका प्रकटलि जगीं ज्ञानसरिता । सदा स्नाने पानें करुनि करि आनंदभरिता । अनंता जन्मांच्या हरूनि सकळा सांच दुरिता । स्वयें दे मोक्षातें श्रवणपठणी हे चि त्वरिता । " (भगवद्गीता श्लो. २२ ) वरील उताऱ्यांमध्ये आत्मश्लाघा नाहीं असें कोण म्हणेल? यांनी व्यक्त केली तितकी आत्मश्लाघा जर आज कोणी केली, तर भोवतालचे टीकाकार त्या कवीस फोडून काढतील यांत शंका नाहीं. तथापि तितपत आत्मश्लाघा करण्यांत वामनास संकोच वाटत नसावा हे उघड आहे व यास कारणहि आहे. हे कवी आपले ग्रंथ आपल्या चहात्यांसच दाखवीत असावेत व मुद्रणाच्या अभावामुळे हे ग्रंथ भलत्याच्या हाती पडतील अशी त्यांस भीति वाटत नसावी. मूळ आपल्या कवितेची तारीफ करण्याची क्रिया ग्रंथाच्या स्तुतीबरोबरच होत होती असें नाहीं. कधीं कधीं ही क्रिया परनिंदे बरोबरहि होत असे. या दृष्टीने सर्वात मोठा गुन्हेगार म्हटला म्हणजे तुकाराम होय. सहृदयतेने पाहिले तर, आत्म- प्रशंसेत देखील दोष नाहीं व परनिर्देत त्याहून नाहीं. ते केवळ मत व्यक्त करणे होय मात्र ही दोन्ही पाहून कवीचें कौतुक करावयास वाचक फारच सहृदय असावा लागतो. तुकारामाचे आत्मप्रशंसेचे व इतरांच्या निंदेचे तुरळक अभंग पुष्कळ ठिकाणी आढळतात, परंतु त्याचा एके ठिकाणी असलेला संच येणेप्रमाणे देता येईल.. 'माझें कवित्व स्वाभाविक झन्याप्रमाणें आहे, मानासाठी तयार केलेलें कृत्रिम नाहीं' असें तुकाराम पुढील अभंगांत सांगतो- ४१ स्वतः अभिप्राय व्यक्त करण्याची पद्धति "विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥ १ ॥ माझी वदवितो वाणी । ज्याणें धरिली धरणी ॥२॥ जोडिली अक्षरे । नव्हती बुद्धीची उत्तरें ॥ ३ ॥ नाहीं केली आटी । कांहीं मानदंभासाठीं ॥ ४ ॥ कोणी भाग्यवंत । तया कळेल उचित ॥ ५ ॥ तुका म्हणे झरा | आहे मुळींचाचि खरा ॥ ६ ॥” त्यांच्या हृदयांत भाव नसतांना ते कवित्व करतात व ते लोक द्रव्यदारालोभी आहेत असे तुकोबाचे आक्षेप आहेतच व त्या कवींनां यमदंड भोगावा लागेल असें तुकाराम म्हणतो. "कलियुगी कवित्व करिती पाषांड | कुशल है भांड बहु झाले ॥ १ ॥ द्रव्यदाराचित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडाची ॥२॥ दंभ करी सोंग मानावया जग । मुखे नोले त्याग मनीं नाहीं ॥ ३ ॥ वेदाज्ञे करोनि न करोति स्वहित । नव्हती अलिप्त देवाहुनि ॥ ४ ॥ तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥५॥” • बरोबरीच्या इतर कवींविषयी इतक्या मोकळे - पणाने काढलेले उद्गार आजच्या साहित्याच्या लोकशाहींत खपतील काय ? तुकारामाच्या वेळेस कवित्व पुष्कळच होतें व दुसऱ्याच्या काव्यांतील तुकडे घेऊन आपली कविता सजविण्याचा प्रयत्न होत असे. तुकाराम त्याविषयी संतापून बोलत आहे. “घरोघरीं जाले कवी । नेणें प्रसादाची चवी ॥ १ ॥ लंडा भूषणाची चाड । पुढें न विचारी नाड़ ॥ २ ॥ काढावें आइतें । तेंचि जोडावें स्वहितें ||३|| तुका म्हणे कळे । आहाच झांकतील डोळे ॥ ४ ॥ • प्रश्न असा होईल कीं, जर मान्यतेसाठी तुका- राम कवित्व करीत नव्हता केवळ भगवद् भक्तीसाठीं तो काव्य करीत होता, तर दुसऱ्या मनुष्यानें चोहोंकडचे चार शब्द गोळा करून काव्य केलें तर तुकारामाच्या पोटांत का दुखावें?