पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपक्षण नाहीं. भक्तिकाव्याची पांडित्यप्रदर्शनानें किंवा कोट्यांनीं सरलता बिघडते असेंच त्यांस वाटत होतें. प्रकरण ९ . स्वतः अभिप्राय व्यक्त करण्याची पद्धति संतकवींच्या काव्याची आवड असलेले आणि त्यांच्या अंगीं साधुत्व असल्यामुळे हे संतकवि केवळ क्षमेचे सागर होते आणि अनेक मानवी भावना त्यांच्यांत नष्ट झालेल्या होत्या असें म्हण- ण्याची कित्येक लेखकांस संवयच लागली आहे. वस्तुस्थिति तशी नव्हती. ईश्वरविषयक भक्ति असली म्हणजे दुसऱ्या सर्व भावना मावळतात असें नाहीं. संतकवींच्या भावना इतक्या सरळपणें मांडल्या आहेत कीं, त्यांच्यामध्ये रामदासांनी वर्णिलेला व रामदासांच्या दृष्टीनें दुय्यम प्रकारच्या कवितेस कारण होणारा रजोगुण देखील आहे असें बाटल्याखेरीज रहात नाहीं. आणि जेव्हां तो दिसून येतो तेव्हां ती कविता ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी - पेक्षा अधिक आकर्षक होते. प्रेरणाविषयक विचार करतांना, कवी आप- ल्याच ग्रंथांविषयीं विचार कसे व्यक्त करीत असत हें भागे सविस्तर दाखविलेंच आहे. आपल्या कवि- त्वाची तारीफ व दुसऱ्यांच्या कवित्वाची निंदा करण्याच्या प्रवृत्तींतून बड्या बड्या व्यक्ती देखील सुटल्या नाहीत, हे आपणांस त्या त्या निरनिराळ्या कवींचे ग्रंथ पाहिले म्हणजे सांपडेल. नामदेवाच्या गाथेकडे पाहिलें असतां त्यानें आत्मचरित्र अत्यंत मोकळ्या मनानें सांगितलें आहे. त्या दृष्टीनें प्राचीन काळच्या संतमंड- ळींच्या एकमेकांशी असलेल्या संबंधाचे वाङ्मय यानें उत्तम तऱ्हेनें रक्षिलें आहे. पण तें विश्वस- नीय आहे किंवा नाही याची शंका आहे. नाम- देवाच्या अभंगांची भाषा अर्वाचीन दिसते तर उलटपक्षी त्या अभंगांत तो ज्ञानेश्वरसमकालीन कवींशी संबंध दाखवितो. ४० आपल्या कवितेवर आपणच मत व्यक्त कर- ण्याची चाल जवळजवळ प्रत्येक कवींत दिसून येते. त्या व्यक्त केलेल्या मतानें त्यांची काव्य- परीक्षणपद्धति स्पष्ट होते असें म्हणतां येत नाहीं. औघाने आपल्या कवितेवर अभिप्राय देत. याचीं पुष्कळदा हे कवी मूळ ग्रंथाची स्तुति करीत व उदाहरणे इतकीं आहेत कीं, तीं विस्ताराने देण्यांत मौज नाहीं. मुक्तेश्वर व वामन यांच्या काव्यांतील उतारे येथे देतों. प्रथम मुक्तेश्वराकडे लक्ष देऊ. महाभारताच्या फक्त वनपर्वात तो आपल्या कवितेविषयी चारदां मत व्यक्त करतो. " (१) . , जे बोलिलें व्यासदेवें । तेंचि महा- राष्ट्र वैभवें । अर्थ मिरत्रे सारखा ॥ (म. भा. वन- पर्व १. १६१) (२) मुक्तेश्वराची ( मराठी ) वाग्वाणी । भरी स्वानंद गोंधळी ॥ ( कित्ता. ६. १५६ ) (३) इति श्रीभारत-वनपर्वणी । कथा नर्मदा रसवाहिनी ॥ ओवियारूपें पवित्र पुलिनीं । बाणलिंगे विचित्रे ॥ तटीं श्रवणसुखाचे आर्ती । तपश्चर्या करितां श्रोतीं । भोगा मुक्ति आयती । स्वधर्मपत्नी सारिखी ॥ (कित्ता. १२.२१७-२१८ ) ( ४ ) मुक्तेश्वराचा वाग्विलास । देशभाषा परि संतोष | मानूनियां साक्षीलागी व्यास । उभा असे जवळिके । (कित्ता. १५.२०५ ) " वामनपंडितानें देखील आपल्या ग्रंथाविषयीं आपला अभिप्राय वारंवार व्यक्त केला आहे. $6 'म्हणोनि जे भागवतीं शुकानें । लीला तुझी वर्णिलि कौतुकानें ॥ टीका तिची मी क्षितिलोकवाणी । करीन जेथें न सुखास वाणी ॥ " ( संकलित रामायण श्लो. ५) आपल्या योगवासिष्ठावरील वामन पंडित येणें प्रमाणें मत देतात - असा प्रश्न ऐकोनिया राघवाचा । वदे उत्तर श्री वसिष्ठ खवाचा |