पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नामदेवाची काव्यविषयक वृत्ति काय असावी हें त्यानें स्पष्ट दिलें नाहीं, परंतु गायन, ग्रंथपारा- यण व वेदपुराणे यांचे अध्ययन यांविषयीं त्यानें जी वृत्ति दाखविली आहे, तीवरून त्याची काव्य- विषयक दृष्टि सहज समजून येते, आणि ती म्हटली म्हणजे भक्ति असेल तर ती हवी, मग ती भक्ति बोबड्या पद्यांत कां व्यक्त होईना. भक्तीचें कवन करावें मग त्यांत अलंकारादि काव्यगुण असो किंवा नसो. भक्तीची उत्कटता त्यांत व्यक्त झाली पाहिजे. सुंदर शब्दांचें, सुंदर उपमा घातलेलें व अतिशय अलंकारांनी भरलेलें असें काव्य त्यास नको होतें. भावोत्कटता नसेल तर तूं वैदिक, पुरा - णिक वगैरे होशील पण वैष्णव होणार नाहींस असें नामदेव म्हणे. “वेदाध्ययन करिसी तरी वैदिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना॥१॥ पुराण सांगली तरी पुराणिकाच होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥२॥ गायन करिसी तरी गुणी जन होसी ॥ परी ॥ ॥३॥ कर्म आचरसी तरी कर्मठची होसी ॥ परी ॥ ३९ ||४|| यज्ञ करिसी तरी याज्ञिकची होसी ॥ परी० ॥ ॥५॥ तीर्थ करिसी तरी कापडीच होसी ॥ परी ॥ ॥६॥ नामा म्हणे नाम केशवाचे घेसी । तरीच वैष्णव होसी अरे जना || || " "शास्त्रज्ञ पंडित तो एक मी मानी । आपणांतें देखोनी तन्मय झाला ॥१॥ येरा माझे नमन सर्व- साधारण | ग्रंथांचें रक्षण म्हणोनियां ॥ २ ॥ वेद पारायण मानी तो ब्राह्मण । चित्त समाधान संतुष्ट सदा ||३॥ पुराणिक तो होऊनि कृतार्थ । विषयीं विरक्त विधि पाळी ||४|| मानी तो हरिदास ज्या नामीं विश्वास । सर्वस्वें उदास देह भावा ||५|| नामा म्हणे ऐसे भेटवी विठ्ठला । त्यालागीं फुटला कंठ माझा ||६||" 1 “शिकला गाणें राग आळवण । लोकां रंज- वण करावया ॥१॥ भक्ताचें तें गाणें बोबडीया संतकवींची जाणीव बोलीं । तें तें विठ्ठलीं अर्पियलीं ||२|| बोबडीया बोलीं जे कोणी हांसती । ते पचिजेती रौरवीं ॥३॥ नामा म्हणे बहुत बोलों आतां कांई । विठोबाचे पाय अंतरी ||४|| " संतकाव्याचे स्वरूप त्यांच्या भावनेनेंच निश्चित केलें होतें. ती भावना मोरोपंतादि कवींच्यामध्ये नव्हती काय? असा प्रश्न उत्पन्न होतो. व कित्येक मोरोपंताचे चहाते त्याच्या भक्तीला कमीपणा दिल्याबद्दल मांडावयास येतील. ते म्हणतील कीं मोरोपंतांस किंवा कालिदासास कोट्या करण्याची ताकद होती म्हणून त्यांनी केल्या; संतमंडळी भाळीभोळी होती म्हणून त्यांनीं कोटया केल्या नाहींत, व यासाठीं संतकवींचें भक्तिकाव्य उच्च व मोरोपंताचे हलकें असें म्हणतां येणार नाहीं. जे साहित्यशास्त्र शिकले असतील व कल्पक असतील त्यांनी आपले कौशल्य फुकट घाल- वावें काय ? मोरोपंतादि मंडळीस साहित्यशास्त्रीय आणि संस्कृत कवींच्या ग्रंथांचा संस्कार झालेली अभिरुचि होती म्हणून त्यांच्या ग्रंथांत कोट्या नाहीं. या अक्षिपास असें उत्तर देतां येईल की, आल्या. त्यांची भक्ति कनिष्ठ होती असे मुळींच कोणाची भक्ति कमी किंवा जास्त हैं हृदयांत एखादें यंत्र खुपसून मोजतां तर येत नाहीं. तथापि त्याप्रकारच्या प्रश्नाची आपणांस आवश्यकताच नाहीं. आपला प्रश्न व्यक्तीच्या श्रद्धेविषयींचा नसून काव्याच्या रसोत्पत्तीचा आहे. कवीमध्यें जर पांडित्य असले तर भक्ति कमी होते काय, हाहि प्रश्न आपल्या पुढें नाहीं. काव्य कसें असावें एवढाच आहे. आणि याला उत्तर असें कीं, रसाच्या परिपोषणाकडे लक्ष देणें हें जेव्हां कवीचे कर्तव्य असतें तेव्हां त्यांनीं पांडित्य दाखविण्याचा आणि लोकांस चकित करण्याचा मोह सोडला पाहिजे. संतकवींपैकी पुष्कळांपाशीं पांडित्याचें ओझें नव्हतें ही गोष्ट जरी खरी असली तरी त्यांची काव्यविषयक वृत्तिं कशी होती हैं लपत