पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण किंवा गूढ अर्थाची वाक्यें घालणार नाहीं. मोरो- पंतादिकांची ईश्वरविषयक भावना जरी तीव्र असली तरी त्यांच्या अलंकारांमुळे दुर्बल दिसूं लागते. हा दोष मराठी कवींतच आहे असे नाहीं तर अलंकारांचें आणि पांडित्याचे ओझें घेऊन बस गान्या मोठ्या कवींत सुद्धां ती दिसून येते. याला आपण कविकुलगुरु कालिदासाचेच उदा- हरण घेऊ. कालिदासानें या प्रकारची रसनिष्प- त्तीविरुद्ध गुन्हेगारी जवळजवळ प्रत्येक करुण- रसप्रधानप्रसंगी केली आहे. उदाहरणार्थ- " हृदये वससीति मत्प्रियं उपचारपदं न चेदिदं त्वमनंगः कथमक्षता रतिः " [ रतीला आपला नवरा मदन हा शिवानें भस्म केला हे कळल्यानंतर बेशुद्ध झालेली रति पुन्हां उठून कोटि करते कीं हे मदना, मी तुझ्या हृदयांत वास करितों असें जें तूं मला म्हणालास तें खोटें आहे हें मी जाणतें, तें जर औपचारिक भाषण नसेल तर तूं अगदीं शरीरविहीन झालास तेव्हां मीहि जळून कशी गेलें नाहीं. मी अगदीं अक्षत कशी राहिल्यें? ] हा श्लोक सुंदर असून रसहानिकारक आहे. तसेच जेव्हां रामाने सीतेचा त्याग केला तेव्हां सीता लक्ष्मणापाशीं जें रामासबंधीं बोलली त्यांत बिचाऱ्या सीनेस देखील कोटि करावयास कालि- दासाने लावले आहे. " उपस्थितां पूर्वमपास्य लक्ष्मीम् वने मया सार्धमसि प्रपन्नः त्वयाधुना प्राप्यतया तिरोषात् सोढास्मि न त्वद्भवने वसंति " [जेव्हां (यौवराज्याभिषेकसमयीं लक्ष्मी तुझ्या जवळ आली तेव्हां तिला टाकून देऊन तूं माझ्या बरोबर वनांत आलास; आतां तिला तूं सांपडला आहेस तर तिनें ही संधि साधून ( पूर्वीच्या ३८ गोष्टीची आठवण धरून) अत्यंत रागाने मला तुझ्या घरीं राहूं दिलें नाहीं. ] ही दोन्ही उदाहरणें रसहानि करणारी आहेत. अशींच उदाहरणें अजविलापांत सांपडतात. वरील दोन्हीं उदाहरणांत रसहानि झाली आहे आणि तीं कालिदासाच्या आपले कौशल्य दाख- विण्याच्या बुद्धीमुळे झाली आहे. निवेदनात्मक काव्यांत ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तीशीं तादात्म्य उत्पन्न करणें, हें रसोत्पत्ति करूं इच्छिणाऱ्या कवीचें काम आहे. तें काम असल्या कोट्यांनीं बाजूला रहाते. वाचकास आपण वर्णित व्यक्तीच्या अंतःकरणांत शिरत आहों अशी भावना होत नाहीं, तर त्याचें लक्ष वर्णित पात्रां- वरून व त्यांच्या अंत:करणस्थितीवरून उडतें व तो कवीचीच तारीफ करूं लागतो. असें झालें म्हणजे रसहानि आलीच. भक्तिपर काव्यामध्यें कवीच्या मनांतील भक्ति वाचकाच्या मनांत उत- रली पाहिजे व पण ती न उतरतां वाचक मध्ये कवीची त्याच्या कोट्यांबद्दल तारीफ करूं लागला म्हणजे तेथें " भक्तिहि हीनवाणी " समजली पाहिजे. कोट्या करण्याचे टाळीत असत. रामदासांनीं सरल- नामदेव, तुकाराम, निळोबा यांसारखे कवी होय. कोटया पुष्कळ असलेलें काव्य हैं रसानें कवित्वाचाच आग्रह धरला आहे तो यासाठींच कधींच ओथंबत नाहीं. मिल्टनसारखे कवी देखील असली घाण करतातच. मिल्टनला शोकादि भाव दाखवितांना कोट्यांच्या ऐवजीं ग्रीक, लॅटिन वाङ्मयांतील उल्लेख पात्रांच्या तोंडीं घालून आपलें पांडित्य दाखविण्याचा मोह पडे. याबद्दल डॉ. जान्सनने मिल्टनला जो दोष दिला आहे तो अगदी रास्त आहे. संतकवीस अर्थात भावनेच्या उत्कटल्याचें काव्य पाहिजे होतें आणि ज्या अर्थी ते ईश्वराविषयीं असलेली भक्ति ही श्रेष्ठ भावना समजत होते त्या अर्थी त्यांस तेंच काव्य श्रेष्ठ वाटत होतें.