पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तेव्हां ती कस्तुरी ज्यांच्या अंगांतून निघाली ते) मृग उद्धरतात असा याचा अर्थ आहे ] असें म्हणतो तेव्हां जगन्नाथरायाच्या कविकल्पनेबद्दल आपणांस कौतुक वाटते, पण त्याच्या भक्तीबद्दल आपली खात्री होत नाहीं. तसेंच जेव्हां मोरोपंत - "तुम्हांसमचि हें गुणे अणु उणें नसे नाम हा । दिसे अधिकहि तसा गुण तुला असेना पहा । सदैव भलत्यासहि सुलभ आणखी गायका । छळी न न अधोगति क्षणहि दे जगन्नायका || [ ईश्वराचें नांव ईश्वराप्रमाणेंच बलवान आहे, लोकांनां तारण्याच्या बाबतीत ईश्वरापेक्षां बिलकुल कमी नाहीं, कदाचित तें ईश्वरापेक्षां देखील अधिक चांगलें आहे, निदान तें लोकांचें बरेंच करील. पण ईश्वर मात्र कधीं बरें तर कधीं वाईट असें करील. तूं देवा ज्याप्रमाणें गायकास (शुक्राचार्यास) फस- त्रिलेंस तसें तें नाम गायकास फसविणार नाहीं. तूं ज्याप्रमाणें (बळीस) अधोगति (पाताळचें राज्य ) दिल्लीस त्याप्रमाणें हें तुझें नांव कोणासहि अधो- गति देणार नाहीं, व तें वाटेल खास सुलभ आहे, असा अर्थ ]. असें म्हणतो तेव्हां देखील आपणांस मोरोपंताच्या कल्पनेबद्दल कौतुक वाटतें पण त्याच्या भावा- त्कटत्वाबद्दल साशंकताच उत्पन्न होते. मागें केका - वलीतील भक्ति हा वादाचा विषयहि झाला होता तेव्हां मोरोपंताचे भक्त असलेल्या विष्णुशास्त्री चिपळुणकरांनीं मोरोपंताच्या केकावलीतील भक्ती- विषयी शंका घेणाऱ्या रानड्यांच्यावर जो ताशेरा झाडला तो निबंधमाळेत मोरोपंताची कविता या निबंधांत पहावयास मिळेल. त्या टीकेची पांगार - करांनी फार स्तुति केली आहे पण पांगारकरांस देखील रानड्यांचा मुद्दा आणि विष्णुशास्त्र्यांच्या 'टीकेचें अप्रयोजकत्व मयूरप्रेमामुळे लक्षांत आलें नाहीं. ३७ त्या निबंधांत रानड्यांच्या केकावलीच्या अभि- प्रायावर टीका करतांना मालाकार आपली काव्य - संतकवींची जाणीव जिज्ञासा विसरले होते आणि तो धार्मिक चळ- वळीचा प्रश्न समजून प्रार्थनासमाजिस्टांची भक्ति श्रेष्ठ कीं जुन्या लोकांची भक्ति श्रेष्ठ या प्रश्नांत शिरले होते, आणि "देह जावो अथवा राहो । पांडुरंगी माझा भावो ।” म्हणून सोप्या शब्दांनी भावोत्कटता प्रगट करणारी मंडळी आणि कोट्या करणारा मोरोपंत हे मालाकारांनी एका वर्गीतले धरले होते व रानडे विरुद्ध पक्षांतले धरले होते, व संतकवींची भक्ति प्रार्थनासमाज़िस्टांच्या भक्तीपेक्षां थोर आहे असें सांगून संतकवींत नसलेल्या मोरो- पंतांच्या कृत्रिम काव्यांत भक्तीचें दौर्बल्य मुळींच नाहीं अशी मांडणी त्यांनी केली होती. असो. प्रस्तुत प्रश्न सुधारक - उद्धारकवादाचा नाहीं किंवा प्रार्थनोंची भक्ति उच्च किंवा वारकरी मंड- ळीची भक्ति उच्च हाहि नाहीं. तथापि रान- ज्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नास मयूरभक्तीमुळे शास्त्रीबोवांनीं व हरिभक्तिपरायणांनी वादाचें स्वरूप त्या तऱ्हेचें कलिलें आहे. आपण आज वादाचा प्रश्न शास्त्रीय दृष्टीनें सोडविण्यासाठीं रानडे, विष्णुशास्त्री आणि पांगारकर या तिन्ही व्यक्तींनां गाळू, एवढेच नव्हे तर मोरोपंतांसहि गाळू; आणि अलंकारप्राचुर्य रसहानि करतें कीं काय एवढाच प्रश्न विचारास घेऊं. भावना जेव्हां उत्कट असेल तेव्हां मनुष्य पांडित्याच्या गोष्टी बोलेल काय ? व उपमा उत्पन्न करील काय असा प्रश्न विचारला तर त्यास नाहीं असें मिळेल भावना उत्कट असते तेव्हां अलं सुचतात काय हा केवळ मनुष्यस्वभाव निरीक्षणाची प्रश्न आहे. भावबद्ध मनुष्यास अलंकार सुचत नाहींत. एवढेच नव्हे तर मोठमोठे पंडित दुःखा- वेगांत लहान मुलासारखे रडूं लागतात. असेंच दिसून येतें. वस्तुस्थिति असेल ती दाखवावयाची आणि भावांच्या गाढत्वानें कवीस वाचकावर परि- णाम घडवावा लागतो. त्यामुळे रसपोषक क करणारा कवि भावनाप्रधान काव्यांत कोट्या