पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण झालेल्या लोकांशीं भांडण चुकविलें आहे. तीच क्रिया संतकवी करीत होते. ज्याप्रमाणें नाट्य- शास्त्रांत बदलत्या लोकाभिरुचीप्रमाणें नावीन्य आणूं पाहणारा नाटककार निरर्थक भांडण चुक- विण्यासाठीं अपल्याकडे लघुत्व घेऊन आपला कार्यक्रम मात्र चालू ठेवतो तीच क्रिया हे संतकवी करीत होते. आणि त्यांनां त्यांचा चहाता वर्ग असल्यामुळे ते संस्कृत पंडितांच्या मताविषयीं उदासीन होते. जेव्हां नवीन प्रकारचें वाङ्मय उत्पन्न होतें तेव्हां त्याबरोबर जुन्या साहित्यशास्त्रीय ग्रंथांत कांही तरी सुधारणा करावी लागते. नवीन वाङ्- मय लोकाभिरुचि बदलून काव्यपरीक्षणाचें एखादें नवें तत्त्व पुढें आणतें. तर आतां मराठी कबीनीं जुन्या साहित्यशास्त्राची अपूर्णता कशी नजरेस आणली तें पाहूं. साहित्यशास्त्रांत रस हा काव्याचा आत्मा समजतात, तर उत्तम काव्य हें ध्वनिकाव्य कसें म्हणतां येईल. ध्वनि म्हणजे काय तर व्यंग्यार्थाला प्राधान्य असलेले काव्य. व्यंग्यार्थाला जर प्राधान्य द्यावयाचे असेल तर तें काव्य खरोखर रसास पोषक नसून रसास अपकर्षकच आहे. तें काव्य चांगले चाखावयाचें म्हणजे त्यांतील व्यंग्यार्थ काय हें अगोदर काढावयाचें आणि तोच मुख्य अर्थ समजावयाचा, असलें काव्य खरोखरच परिणामकारी नसून केवळ खेळ आहे. जें सहज समजेल असें काव्य उत्तम असूं शकणार नाहीं काय? उलट असे म्हणतां येईल कीं, तसलेच काव्य उत्तम, जे समजावयास सोपें व जें ताबड- तोब परिणामकारी असेल असे काव्य जेव्हां लोकांनां करतां येत नाहीं तेव्हां मनांतील अर्थ द्राविडी प्राणायामाच्या पद्धतीने सांगून चमत्कृति उत्पन्न करावयाची क्रिया होते. म्हणजे भावाची उत्कटता साधत नसेल तरच ध्वनीस महत्त्व ३६ येईल पण कवीनें खरोखर भावाची उत्कटताच साधली पाहिजे. पण ती साधावाची कशी? तर त्याला उत्तर हेंच आहे कीं, जेव्हां कवीच्याच मनांत उत्कटता असेल तेव्हां ती उत्कटता काव्यांत येईल, एरव्ही यावयाची नाहीं. यासाठींच जेव्हां कवि आपल्या स्वतःच्या भावना व्यक्त करीत असतो तेव्हां तें उत्तम काव्य होईल. "लिरिक्” नांवाच्या काव्याची म्हणजे ज्या काव्यांत कवी आपल्या स्वतःच्या भावना व्यक्त करतात अशा काव्याची महति यामुळेंच आहे. पण कवीनें आप- ल्याच भावना व्यक्त करावयाच्या म्हटल्या म्हणजे कवीला स्वतःच काव्याचें नायक व्हावें लागतें. कवीने स्वतःच कवनविषय होण्याची पद्धति पडली नव्हती. या प्रकारची कविता त्यांस परि- चित नव्हती. संस्कृत काव्यांत कवि आपल्याच भावांचे वर्णन करतो असे महत्त्वाचे मध्यकालीन काव्य म्हटले म्हणजे बिल्हणाचें चौरपंचाशिका होय. आणि नंतरचें म्हणजे भामिनीविलास होय आणि त्यांतल्या त्यांत करुणविलास होय. कवि जेथे नायक होईल आणि आपला भाव स्वेच्छेनें वर्णन करूं शकेल असें दुसरें काव्य म्हटले म्हणजे भक्तिकाव्य होय. त्यांत कवि आपली ईश्वरविष- यक भावना मोकळ्या मनानें मांडूं शकतो. जेव्ह भक्तिकाव्यांत अतिशयोक्ति केली जाते आणि कोट्या लढविल्या जातात तेव्हां त्या भक्तीचा आवेश दुर्बल असतो हें सांगावयास नकोच. संस्कृतमध्ये भक्तिकाव्ये फारच थोडी आहेत. स्तोत्ररत्नाकरांतील काव्यै कृत्रिमच भासतात. जेव्हां जगन्नाथराय गंगालहरींत- " प्रभाते स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटी- गतो यावन्मातर्मिलति तत्रतोयैर्मृगमदः । मृगास्तावद्वैमानिकशतसहस्रः परिवृताः विशंति स्वच्छंदं विमलवपुषो नंदनवनम् ॥” [ सकाळी स्नान करणाऱ्या राजस्त्रियांच्या स्तनास असलेली कस्तुरी जेव्हां तुझ्या पाण्यांत मिसळते