पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

20 NOV 2023) महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ग्रंथसंक्षेप प्रकरण १ ले (पृ. १-३ ) प्रास्ताविक मराठी काव्यपरीक्षणाचा इतिहास कविते बरोबरच जन्मास आला (पृ. १). संस्कृत साहि- त्यकारांचें मराठी वाङ्मयाकडे दुर्लक्ष झालें (पृ. १). साहित्यशास्त्रज्ञानीं प्राकृत वाङ्मयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या शास्त्राचा विकास थांबला (पृ.२). साहित्यशास्त्राचे नियम केवळ मार्गदर्शक आहेत (पृ. २). काव्यपरीक्षणाचा इतिहास लोकाभि- रुचीच्या इतिहासाचा भाग आहे (पृ. २). प्रकरण २ (पृ. ३-१० ) काव्यपरीक्षक आणि जनता जनता है काव्याचे शेवटचें न्यायासन आहे (पृ. ३). प्रल्हाद बडव्यानें "सुश्लोक वामनाचा" ही आर्या लिहिली तेव्हांपासून लोकमतांत विशेष बदल झाला नाहीं (पृ. ४) टीका अधिक उप- युक्त करण्याच्या व टीकाकार वर्ग अधिक जबाब- दार करण्याच्या दृष्टीनें काव्यपरीक्षणाचा इति- हास महत्त्वाचा आहे (पृ. ५). समकालीनांकडून चहा कांहींच झाली नाहीं हें भवभूतीच्या बाब- तींत खरें नाहीं (पृ. ५). महाराष्ट्रीय वाड्मय लोकाश्रयानेंच वाढले आहे (पृ. ६). मराठी कवितेस दरबारी कवितेचे दुर्गुण लागले नाहींत. (पृ. ६). मोगरे यांचे मराठी भाषाविकासावर काव्य (पृ. ७). हालाच्या सप्तशतीवरून प्राकृत वाङ्मयास आश्रय देण्याची राजेलोकांची पद्धति सिद्ध होत नाहीं (पृ. ८). टीकाकारांची टीका प्रामाणिक असल्यास ती लोकमतप्रदर्शक असते म्हणून उपयुक्त आहे (पृ. ८). चांगले वाड्मय ८१३० पोसण्याइतकी जनता सुशिक्षित आहे काय? (पृ. ९). लोकाभिरुचेि दुर्लक्षणें मंथलेखकास शक्य आहे काय? (पृ. ९). प्रकरण ३ . (पृ. १०-१७ ) भारतीय काव्यपरंपरा व मराठी संतकबी संतकवी भारतीय कविपरंपरेंतील व्यक्ती नव्हत्या (पृ. १०). कवि म्हणजे शहाणा या अर्थानें संतांस कवि म्हणतां येईल (पृ. ११). संतकवींना hat म्हणून व त्यांना लागू पडणारें वर्णन कवि- लक्षण समजून अर्वाचीन कवींचा उपहास कर- ण्याची प्रवृत्ति (पृ. ११). संस्कृत अध्यात्मवाङ्म- याचें विस्तरण मराठी कवींचे ग्रंथ होत (पृ.११). नवव्या शतकापासून ज्ञानेश्वरकालापर्यंत संस्कृत, व कानडी वाङ्मयांचे कोश, व्याकरण, साहित्य- शास्त्र, नाव्यकथा व काव्य, संगीत व ज्योतिष या बाबतींत सिंहावलोकन, आणि त्यावरून महा- राष्ट्राचें वाङ्मय संस्कृत व मराठी या दोन भाषांत होते याचे स्पष्टीकरण (पृ. १४ ). मराठी वाङ्मय आणि महाराष्ट्राची संस्कृति हीं एकच धरतां कामा नयेत (पृ. १७). प्रकरण ४ थे (पृ. १७-१९ ) संतकवींचे पूर्वगामी संतकवींचे पूर्वगामी द्राविडांतील आळवार होते; आणि नाथसंप्रदाय आणि रामानंद यांस संतकवींचे पूर्वगामी म्हटले पाहिजे (पू. १७).