पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यावरून काय दिसून येतें बरें ? यावरून एवढेच दिसून येतें कीं आपण केवळ कवीच नाहीं तर काव्याचे शास्त्र जाणणारे आहोंत असें दाखविण्याची आपल्या निळोबांनां हौस होती. आपण कवि आहोंत हैं जरी एखाद्या कवीला समर्थन करतां आलें नाहीं व आपल्या कवित्वाचें कोणी काव्यदृष्टीने परीक्षण करूं लागेल ही कल्पना जरी कवीस भयभीत करीत असली व तीमुळे आपल्या कृतीचें परीक्षण तो टाळू लागला तरी तेवढ्याने त्याचा कवित्वावरचा हक्क नाशा बित होतो असें नाहीं. आपणांस आज त्याचें हक्क सांगणें आणि परीक्षणाबद्दल भीति बाळगणे या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ३५ या सर्व देखाव्याकडे पहाणाऱ्या साहित्यशा- स्त्राच्या ऐतिहासिक अभ्यासकास कांहीं निराळेंच सत्य समजून येतें. या संतमंडळीमध्ये कांहीं काव्यविषयकतत्त्वें नवीन होतीं. तीं नवीन तत्त्वें ते रचनेंत दाखवीत त्याप्रमाणेंच काव्यचर्चेत देखील दाखवीत; तथापि तीं त्यांस साहित्यशास्त्राच्या भाषेत सांगतां आलीं नाहींत. तीं जर त्यांस सांगतां आली असती किंवा तत्कालीन साहित्यशास्त्रज्ञांस संतकवींचें अंतःकरण समजून घेऊन तीं आपल्या पद्धतीनें मांडतां आलीं असती तर साहित्यशास्त्रांत एक नवीन संप्रदाय उत्पन्न होऊन कुंठित झालेल्या साहित्यशास्त्रास चालना मिळाली असती. ती क्रिया अगदींच व्हावयाची राहिली नाहीं. ती क्रिया रामदासांनीं कांहीं अंशी केलीच. पण राम- दासांनी जो साहित्यशास्त्रीय विचार मांडला तो संस्कृत ग्रंथांत गेला नाहीं आणि त्यामुळे तो अतिमहाराष्ट्रीय किंव। अखिल भारतीय झाला नाही. ऐतिहासिक दृष्टीने पहातां मराठी संतकवींच्या यावरून उत्पन्न होणारे साहित्यशास्त्र संस्कृत साहित्यशास्त्राची अपूर्णता पूर्ण करणारें होतें. साहित्यशास्त्रांत प्रथम अलंकारांसच प्राधान्य जीपंती नं.पं. वाचनादन संतकवींची जाणीव होतें व पुढे ध्वन्यालोक वगैरे ग्रंथांनीं ध्वनीस प्राधान्य दिले. व विश्वनाथादि कांहीं ग्रंथकारांनी पुढे रसास प्राधान्य दिले पण साहित्यशास्त्र या संतमालि - केच्या ग्रंथाभ्यासाने आणखी पुढे सरकावयास हवें होतें. आपल्या नवीन कवितेबरोबर त्या प्रका- रच्या कवितेचें समर्थन करणारे नवीन साहित्य- शास्त्रहि उदय पावावयास पाहिजे होतें पण तसें तें झालें नाहीं यांतः आश्चर्यहि नाहीं. साहित्य- शास्त्राचा मुख्य उपयोग लोकाभिरुचि सुशिक्षित करणे हा आहे. आणि लोकाभिरुचि सुशिक्षित करण्याचा मुख्य उपयोग नवीन कृतीची चहा व्हावी हा होय. संतकवींच्या कृतीची चहा वार- करी मंडळींत होतच होती व ती मंडळी जुन्या साहित्यशास्त्रीय कल्पनांनी बांधलीच गेली नव्हती, तर जुन्या साहित्यशास्त्रीय कल्पनांचें उच्चाटण करण्याची तरी आवश्यकता काय? संस्कृत वाङ्म- यांत अवगाहन करून आनंद पावगारा जो वर्ग होता तो कमी कमी होत होता म्हणून त्या वर्गाशी दोन हात करण्याची फिकीर संतकवींनीं केलीच नाहीं. समाजांत ज्याप्रमाणे एका प्रकारच्या मालाचे उत्पादक त्या प्रकारच्या मालास गिन्हाइकी असली म्हणजे त्या मालास जे गिन्हाईक नाहींत त्यांच्या टीकेविषयीं उदासीनच असतात, त्याप्रमा- च संतकवींची स्थिति होती. ज्याप्रमाणे लोक- प्रिय नाटकें करणारे "वालयाच्या" दृष्टीनें नाट- कांचें परीक्षण करूं पहाणाऱ्या टीकाकारांनां असें म्हणतात की "बाबानों, तुम्हीं आमच्या नाट- कांच्याकडे तुमच्या वाङ्मयविषयक उच्चतेच्या दृष्टीने पहात राहूं नका. मी नाटक लिहितों तें बाजार कसा आहे हें पाहून लिहितों. मी उच्च नाटककार नाहीं. मला पाहिजे तर तमाशा लिहि- णारा म्हणा." या तन्हेनें अनेक नाटके लिहिणा- रानीं आपल्या कृतीचें समर्थन केलें आहे. आणि जुन्या साहित्यविषयक कल्पनांनी आच्छादित