पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण मी कवि नाहीं, मला कवित्व समजत नाहीं असे जेव्हां जेव्हां एखादा संतकवि म्हणतांना दिसतो तेव्हां त्यांचे ते शब्द वाचून कोपरच्या 'मला कशाबद्दल गर्व वाटत नाही' हे सांगणाऱ्या ओळींची आठवण वाचकांस होते. कोपरने म्हटले आहे की "मला राजवंशीयत्वाबद्दल गर्व वाटत नाहीं पण ज्या आईबापांना स्वर्गात स्थान मिळालें अशांपासून आपण झालों याचा मला गर्व वाटतो. My Boast is not I deduced my birth From loins enthroned and rulers of the Earth But higher far_my proud pretention lies Son of parents that passed into the skies. ३४ हैं वाचून कवी विषयीं जराशी बेताचीच सह दयता वाटत असलेला बाचक म्हणेल कीं, अरे कोपर, उगाच खोटें कां बोलतोस तुला आपल्या राजवंशसंभवाबद्दलच बढाई गावयाची आहे, दुसरें आम्हांस कांहीं दिसत नाहीं. तुला जर आपल्या राजवंशसंभवाबद्दल अभिमान नाही तर तूं राज- वंशीय आहेस हे सांगायला कशाला आलास ! तुला विचारलें होतें कोणी ? तूं सांगितले नस- तेस तर तुझा राजवंशसंभव शोधायला कोणीहि आलें नसतें. राजवंशसंभवाबद्दल तुला अभिमान नाहीं हें दाखविण्यासाठीं जें कारण तूं सांगतोस तें काय ? तर तुला गर्व बाळगायला त्याहून मोठी जागा आहे, अशा प्रकारचें; आणि तें हैं कीं जे स्वर्गात गेले त्यांच्या पोटचा तूं आहेस ! म्हणजे जें कधींच सिद्ध होणार नाही । म्हणजे केवळ काल्पनिकच कारण देतोस. ज्याबद्दल मनांत बढाई वाटते ती गोष्ट तर सांगावयाची आणि तीबद्दल आपणास अभिमान वाटत नाहीं म्हणून सांगावयाचें. या तऱ्हेची प्रवृत्ति मनुष्याच्या मनांत कां बरें उत्पन्न होते ? ही प्रवृत्ति उत्पन्न होते हैं खचित. जेव्हां एखादा मनुष्य मी अमूक नाहीं असें एखाद्या उंच गोपुरावर उभे राहून सांगू लागतो तेव्हां तो खरोखर जें श्रेय वरवर नाकारीत असतो त्या श्रेयाचा तो हक्कच सांगत असतो; एवढेच केवळ नव्हे तर तो तें श्रेय केवळ शालीनतेमुळे नाका रीत नसतो. तर त्यास दुसऱ्या कोणाच्या तरी टीकेची भीति वाटत असते हैं होय. आपणांस इकडे काव्यशास्त्र समजत नाहीं म्हणून सांगा- वयाचें तरी देखील आपणांस तें समजतें अशी आपल्या चहात्यांची समजूत होईल इतपत पुरावा देऊन ठेवावयाचा या प्रकारची क्रिया देखील होत होती. आपण ईश्वराच्या सक्तीमुळे रचना करतों, आपण खरोखर कांहीं एक जाणत नाहीं अशी भाषा बोलणाऱ्या निळोबानें आपणाला रसांची नावें ठाऊक आहेत असे दाखविण्याचा एक प्रयत्न केला आहे तो येथे देतों. "सांगो नवरस लक्षण | तरी शृंगार हास्य करुण। धीर वीर भयानक जाण । बीभत्स अद्भुत शांत - रस ॥ १ श्रृंगारिक तें माधुर्य जाणें । हास्य तें विनोद करणें । कारुण्य तें कींव भाकणें । धैर्य उपजवणें तें धीर ॥ २ वीर ते युद्धाच्या गांठीं । शब्दामागें शब्द उठी । भयानक रस भय घाली पोटीं । बीभत्स त्याहुनी कुष्टी उच्छृंखल ॥ ३ अद्भुत रस ते नवलवाणें । जे का अच बोलणें । श्रोतयातें विस्मय दे । ऐकतां शहाणे निर्बुजती ॥ ४ शांतरस तो शुद्ध सात्त्विक । विकारविवर्जित माि विवेक । निळा म्हणे हे नवरस देख । जाणती गायक चतु- रते ॥ ५” ( आवटे, निळोबा गाथा १४२७ ).