पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ आज्ञेनेच लिहिलें आहे असें म्हणणे म्हणजे ग्रंथ काराच्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्याची जी वाच- काची बुद्धि असेल तिला फार ताण देणें आहे असें वाटतें. महिपती जरी चरित्रकार होता व साहित्य जमवून चरित्रे लिहीत होता तरी तो देखील आपण प्रत्येक अक्षर ईश्वराज्ञेनेंच लिहिलें आहे असे बोलत आहे. "जैशी आज्ञा केली रुक्मिणीवरें तितुकींच लिहिली ग्रंथीं अक्षरें जैसा वाजविणार फुंकितो वारें तैशीं वाजत्रे वाजती ॥ क्षेत्रांत बीज पेरले जाण अंकुर येणें जीवनावीन की बाहुल्याचें नाचणें जाण कळे सूत्राधीन असे. ॥” यासाठी जेव्हां कवि आपले लिहिणें प्रेरणेनें झाले अने सांगतो तेव्हां तें सर्वदा विश्वसनीय नाहीं. मेहनतीनें लिहिलेलें अनेक प्रकारचे वाङ्मय प्रेरणेनेंच आहे असें सांगण्याची प्रवृत्ति मराठी कवींत दिसून येते. ही प्रवृत्ति एक गोष्ट मात्र सिद्ध करते आणि ती म्हटली म्हणजे, प्रेरणा काव्याचे महत्त्व कवींनी पूर्णपणे ओळखले होते हैं होय. प्रेरणाकाव्याचें साहित्यशास्त्रीयदृष्ट्या त्यांस किती महत्त्व भासतें व तें महत्त्व पुढे तरवदृष्टीने कसें मांडले गेले याचे विवेचन पुढे येईलच. प्रकरण ८ वै. संतकवींची आपल्या वैशिष्टयाविषयीं जाणीव आतां जुन्या संतकवींच्या कवित्वविषयक विचारांकडे वळू. त्यांचे इतर संतकवींविषयींचे जे अभिप्राय आहेत ते ते संत या नात्यानें त्यांच्या विषयीं आदर दाखविण्याच्या स्वरूपाचे आहेत. कवींनीं आपल्या पूर्वगामींच्या ग्रंथांची काव्यदृष्टीनें ३३ .. णनाव, संतकवींची जाणीव चिकित्सा केली नाहीं; व काव्यविषयक आपल्या कल्पना जर त्यांनी मांडल्या असतील तर त्या आपल्या लेखनाचे समर्थन करतांनाच मांडल्या आहेत, इत्यादि गोष्टी मागें दाखविल्याच आहेत. संतकवीनां काव्य ही गोष्ट महत्त्वाची वाटत नव्हती. संतत्व ही गोष्ट महत्त्वाची होती. जो चांगला भक्त असेल पण ज्यानें एकहि अभंग लिहिला नसेल अशांचीहि मान्यता त्यांच्यांत होत असावी. उदाहरणार्थ, गोरा कुंभाराचे अभंग थोडेच आहेत. संतत्वाला जरी महत्त्व होतें तरी संतकवींनी आपल्या काव्यरचनेबद्दल अभिमान वाटत होता. मला कवित्व समजत नाहीं, मला कवित्व समजत नाहीं असें जेव्हां ते उच्च स्वरानें सांगत होते, तेव्हां ती शालीनता आत्मकृतिमंड- नार्थ होती दुसरें कांहीं नाहीं. आपण केवळ भक्त नसून कवी आहोंत याची जाणीव संतकवींस होती एवढेच केवळ नव्हे तर आपणांस कवि म्हणवून घ्यावयास कांही तरी अडचण उत्पन्न होईल हैं हि त्यांस समजत होतें, व यासाठी आम्हीं कवित्व करीत नाहीं, पांडुरंगाविषयीं जें प्रेम वाटतें तें व्यक्त करतो किंवा पांडुरंग जे सांगेल ते बोलत आहोंत असे ते वारंवार मांडीत. म्हणजे एकीकडे तर कवित्वावर हक्क सांगावयाचा आणि कोणी "तुम्ही कवि कसे ?" असा प्रश्न विचारला तर भांडण चुकविण्यासाठी आपण कवि नसून भक्त आहोंत असें म्हणावयाचें; आणि पुन्हां कवित्वाची व्याख्या देखील आपणांस लागू पडेल अशीच करावयाची, या सर्व क्रिया एका विशिष्ट प्रकारच्या विचारप्रवृत्तीच्या दर्शक आहेत. या प्रवृत्तीचा थोडक्यांत अर्थ सांगावयाचा म्हटला म्हणजे आपण कवि आहोंत असें संतकवींस वाटत होतें, पण आपण कवि कसे आहत हैं साहित्यशास्त्रज्ञांशी भांडून सांगण्याइतकी हिंमत त्यांनां नव्हती. म्हणून ते कवित्वाचें श्रेय नाका- रीत होते.