पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण झाले. निळा तुमच्या वरदानानें तिच्याच अनु- वादाने बोलत आहे. तुमच्या पायीं मन जडलें, तर शब्दाचें प्रयो- जनच काय उरलें; असें असतां माझी मति कां चेतविली, आणि गुणीं कां प्रवर्तिली? ( ती चेत- विल्याने काय झालें आहे बरें ?) रात्र आणि दिवस हे लिहितां पुरत नाहींत. अक्षरांच्या चळथा उठतात. गोविंदा, तुम्ही मला धंदा लावून दिला आहे. तुमची लीला कळत नाहीं. तुम्ही जे जे बोल बोलवितां त्यांमाजी अर्थ खोल आहे. देवा, आपल्या आवडीप्रमाणे मज - कडून वदवा आणि आपलें रंजन करून घ्या. हे भोजासारख्या देवा, माझी लौकिक लाज दूर करून कौतुकानें नाचवा. हे कृपासूर्या, हें सर्व ( माझी ) वाणी प्रकाश करून करा. ३२ तुम्ही चुबकळून काढलेली (माझी) अक्षरें ब्रह्म- रसाने घोळलेली असावीत अशी तुमची इच्छा झाली. तुम्ही माझ्या भावासारखे आहांत. मी अर्थ - चातुर्य जाणत नाहीं. तुमचें करणें तुम्ही जाणा. माझा भाव कायतो एवढासा, तेवढाच तो तुमच्या पायी वाहिला. पण यावर तुम्हीं जें कांहीं दिलें तें अगाध आहे. माझी मति किती तरी अल्प, पण तेवढीच तुम्ही वाढवून सरती केली. धरण फुटलें, लोंढा आला तो माझ्या तोंडाला आवरत नाहीं ( हा काव्याचा लोंढा येण्याचें कारण ) तुमच्या कृपेच्या मेघानें वृष्टि केली त्यामुळे उत्तमप्रकारच्या बोधाने वाचा गर्जना करिती -झाली. प्रतीतीध्या विद्युल्लता झळकतात आणि ब्रह्मरसाचे थेंब खालीं येतात. त्यामुळे जें पीक - पिकलें आहे तें सर्व भागांस आले आहे. माझी आर्षवाणी (ईश्वरानें) वदविली आहे, ती वैदिक आहे आणि पुराणांनी मिश्र आहे. आणि संतसज्जन बैसून श्रवण करितात. आणि तात्पर्याचे अर्थ घेतात. आणि मस्तक डोलवितात. दयाघन विठ्ठलाने मला असे केलें आहे. देवानें मला वाचेनें बोलविलें ; ( नाहीं तर ) मला हैं ( सर्व कवित्व ) काय हावें होतें. ( मला स्फुर्ति कशी झाली म्हणाल तर सांगतों) सहज नामें आळवीत असतां हा अवचित ओघ आला. (इतर प्रकारच्या कवित्वापासून माझ्या कवित्वां - तील ) अंतर संत जाणतात. आणि हा रखुमा- ईचा वर आहे असें ओळखतात. हे सर्व विचा- रलें म्हणून सांगतों हें पुन्हां माझ्या ओंठाशीं येणार नाहीं." हे निळोबाचे अभंग वेदवक्त्या ऋषींच्या अत्यंत सुंदर सूक्तांच्या तोडीचे आहेत असे म्हटल्यास हरकत नाहीं. निळोबानें बालक्रडिचे अभंग वर्णनपर केले खरे पण ते देखील लिहिण्याचें काम आपण ईश्वरकृपेनेच केलें आहे अशी भावना निळोबा दाखवितो. त्या अभंगांच्या शेवटीं तो म्हणतो. " मी तर व्यासवाणी समजत नाहीं, जे साधे किंवा गुह्य अर्थ पुराणांत आहेत ते जाणत नाहीं. इतर कवी जे प्रसाद वाणी बोलते झाले तेहि अर्थ मी नेणें. मी आपल्या आवडीच्या भरीनें आपली वाणी गौरविली आहे. चतुरांनी श्रवण करावी अशी ही नव्हे. ही मुग्धवाणी आहे. पण माझ्या मनांत एक थोर विश्वास वागत आहे तो म्हटला म्हणजे स्वामी तुकया हा सद्गुरु आहे. तो माझी भक्ति जाणून माझा अव्हेर कधीं कर- णार नाहीं. त्यानेच माझ्या अंतरींची आर्तावस्था जाणून वर देऊन ही वाग्वाणी कृष्णचरित्रीं वद- विली आहे. आणि माझी "आयणी" पुरविली आहे." जेव्हां कविता उद्गारात्मक असेल तेव्हां मी जें लिहिलें तें सर्व प्रेरणेनें लिहिले आहे किंवा ईश्वराच्या आज्ञेनें लिहिलें आहे असें कवीनें म्हणणें गैर वाटणार नाहीं. तथापि जेव्हां लांब- लांब आख्याने कवी लिहू लागतो, चरित्रे वर्णितो तेव्हां आपण प्रत्येक शब्द अक्षर ईश्वराच्या