पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

+1.3A 1994 ईश्वरी कृपेचाच भाग असला पाहिजे. या प्रका- रची वृत्ति अनेक कवींत दिसून येत आहे. पांडित्य म्हणजे काय याची त्यांस अंधुक कल्पना असे आणि तें आपल्यापाशीं नाहीं हें त्यांस समजे. एक तर आपली कवित्वशक्ति ईश्वरी कृपेनें आली आहे असें ते समजत किंवा ती गुरु- कृपेनें आली अशी कल्पना करीत. आपल्या कवितेमध्यें गंभीर विचार आहेत असें त्यांचें त्यानांच वाटे, आणि ते विचार ईश्वरीप्रेरणेनें आले आहेत आणि ते व्यक्त करण्या इतकी आपली बुद्धि तर नाहीं. असें त्यांस वाटे. आपल्या अपेक्षेपेक्षां पुष्कळच चांगले लेखन आपल्या लेख- तून उतरले असा अनुभव पुष्कळ लेखकांस येतो तसाच त्यांस आला असावा. नामदेवाच्या कवितेंत प्रेरणासमर्थन आहे. त्याचे उतारे पुष्कळच देतां येतील. पण नामदेवाच्या एकंदर काव्या- विषय इतका संशय आहे कीं, ते उतारे न दिल्यास तें काव्य नामदेवाचेंच आहे काय याविषयीं वाद उपस्थित होईल. तुकारामाचा आपल्यास प्रेरणा झाल्याचे सांगणारा लोक- परिचित अभंग म्हटला म्हणजे:- "आपुलिया बळें नाहीं मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंखी ते कैची बोले मंजुळ वाणी बोलवीता धणी वेगळाची काय म्या पामरें बोलावीं उत्तरें परित्या विश्वंभरे बोलविलें" हा होय. या तऱ्हेची वाक्यें तुकाराम बोलला तेव्हां त्याच्या मनांत वर सांगितलेल्या भावनाच दिसून येतात. तुकारामाचा शिष्य निळोबा हा आपल्या प्रेर- णेविषयीं तर एक कवित्व नांवाचें काव्य लिहितो. त्या काव्याचा अर्थ पुढीलप्रमाणें आहे. हे काव्य सुंदर असल्यामुळे जवळ जवळ सर्वच दिले आहे:- ३१ स्वकाव्यसमर्थनमहत्त्व "गा पांडुरंगा, माझी वाचा उगाच कां वद- वितां ? ती ऐकतां कोणासहि रुचत नाहीं; हांसों लागतात. हें पाखांड रचलें आणि तोंड सैरावैरा वाजविलें असें म्हणतात. जो द्योकार दिला तो आतां ठेवा ( मला नको). एकच अक्षर वाचेस आलें तर तें (देवा तुम्ही ) विस्तार करून वाढवितां हे चक्रपाणी माझी वाणी कां चेतविली हें मला समजत नाहीं. वाणीमध्ये आयता रस तुम्ही जोडून देतां व त्याला निवडून सारांश लावितां, तुह्मी सुजाण कृपाब्धी आहांत. तर आतां तरी माझी स्थिति जाणा. मला कांहींच समजत नाहीं हें माझ्या जिवांत मला ठाऊक आहे. पण मला देव बोलवितो, तेथें उपाय कोणाचा आहे. (मी) बहुश्रुत वक्ता, पंडित किंवा वाचाल नव्हे श्री. विठ्ठल बोलवी ते बोल बोलतो. श्री हरीनें जें आज्ञापिलें तें ही वैखरी बदली. येथें माझें वीर्य नाहीं । हें कार्य ज्याचें आहेत जाणतच आहे. मी म्हणतों याची तुम्हांस येईल तर चित्तांत हितबुद्धीच घर!. येरी टाकून द्या, आणि नास्तिकवादी दूर परतो. तुमच्या गुणानें माझी वाणी सत्याक्षरें प्रवर्तली. जे अर्थ तुम्हीं दाविले ते ओळींतून यथार्थ मांडले. ही माझी वाणी कांहीं मतांतरांत शिरली नाहीं. ही वाक्यपूजा गरुडध्वजाच्या इच्छेसाठींच आहे. पंढरीनाथा, जो कोणी मला निंदील तो निंदो, किंवा माझी खोटी स्तुति खुशाल करो. पंढरि- किंवा ऐकूं नको. मला बळ देऊन कृपाळु विश्व- नाथा, मी तुमचेच गुण गाईन, तूं आवडीने ऐक जनिताच बोलवितो. देवा, जना नावडे तें मज हातीं कांहो वदवितां ? झिरपणाऱ्या अमृताप्रमाणें सुस्वाद असलेली आयत्या प्रसादासारखी संत- वाणी तर आहेच. ती संतवाणी जे जे सत्य स्वानुभव बोलले ते प्रगट होतांच सहज सिद्धांत