पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण काळापासून रामदासाच्या काळापर्यंत चाललेंच होतें, एवढेच नव्हे तर राजकीयदृष्ट्या ज्या काळांत मराठी भाषेला महत्त्व आलें तो काळ म्हणजे बाळाजी बाजीराव पेशव्यांचा काळ, या काळांत देखील त्या समर्थनाच्या छटा मुरारीसा- रख्या ग्रंथकारांच्या लेखांत दिसून येतात. हैं मागें दाखविलेंच आहे. हें समर्थन मराठी भाषेची तर फदारी करूनच होत होतें असें नाहीं तर आपण ईश्वरी आज्ञेमुळे लिहीत आहोत असे सांगून कर- यांत येई. जेव्हां मराठी कवी कविता करीत; तेव्हां केवळ विद्वान व संस्कृतज्ञ कवीच कविता करीत असे नव्हतें. बरेचसे कवी साधारणच शिकलेले होते व पुष्कळांस संस्कृत येत नसावें खुद्द तुकारामास संस्कृत येत असेल असें वाटत नाहीं तथापि त्यास संस्कृत ग्रंथांतील विचारांची बऱ्या प्रकारें ओळख झाली असावी असें वाटतें. काव्यस्फूर्ति पावलेला मनुष्य जर लोकांत मान्य व्हावा असें असेल, तर तशी लोकांमध्ये केवळ काव्याकडे लक्ष देण्याइतपत अभिरुचि वाढली असली पाहिजे; परंतु तशी अभिरुचि आजहि वाढलेली आहे असे वाटत नाहीं, ती डोकावूं लागली आहे यांत शंका नाहीं व आजच्या तरुण पिढींत काव्याभिज्ञता गेल्या पिढी- पेक्षां खास अधिक आहे, तथापि निव्वळ प्राकृत काव्य लिहिणारा कवि जर सुशिक्षितांत मोडण्या सारखा नसला, तर तो आपल्या काव्यगुणांमुळे सभ्य लोकांत मोडेल अशी आजहि परिस्थिति नाहीं. ज्याअर्थी कवींस विद्येची जोड नव्हती आणि ज्याअर्थी कविता धार्मिक आयुष्यक्रम आणि वेदांत एवढ्याच कक्षेत परिभ्रमण करीत होती त्याअर्थी, ज्या कवींस या क्षेत्रामध्ये काव्य करावयास पाहिजे होतें पण संस्कृत पांडित्य नव्हतें त्यांच्या काव्यलेखनाचें समर्थन व्हावयास कांही तरी निराळी उच्चता पाहिजे होती. धार्मिक विषयावर चर्चा करण्यास किंवा व्याख्यान देण्यास ज्यांनां पांडित्य नसेल, त्यांनां अधिकार उत्पन्न होण्यास "ईश्वरी प्रेरणा" किंवा "गुरुकृपा " यांची आवश्यकता असते यामुळे अनेक मराठी कवींनी आपण "ईश्वरी प्रेरणे" नें बोलत आहों असें सांगितलें आहे. तुकारामानें याविषयीं पुष्क- ळदांच ईश्वरीप्रेरणा झाल्याची जाणीव दाखविली आहे. आपण जें बोलतों तें ईश्वर आपणांस बोल- वीत आहे असें तुकारामानें इतक्या वारंवार दाख- विलें कीं, तें सिद्ध करण्याची आवश्यकता नाहीं. - कवि आपल्या काव्याचें आपणांस प्रेरणा झाल्याचे सांगून समर्थन करीत. कवि आप समर्थन कसें करतो हैं साहित्यशास्त्राच्या शोध- कास अत्यंत महत्त्वाचें आहे. कवींची आत्म- समर्थनाची पद्धति कवीचे स्वतःच्या काव्याविषयीं काय मत होतें तें दाखविते. कवीचे आपल्या स्वतःच्या कवितेवर काय मत होतें ही गोष्ट प्राचीनांच्या काव्यविवेचनाच्या इति- हासांत वगळतां यावयाची नाहीं. पुष्कळ कवीनीं आपल्या कवितेवर मतें व्यक्त केलीं आहेत आणि तीं व्यक्त करतांना त्यांनी आपल्या दृष्टीनें जें सत्य. वाटत होतें तें सांगून टाकलें आहे. पुष्कळ कवींना असें वाटत होतें कीं आपण ईश्वरी प्रेरणे- नेंच लिहीत आहों. आपणांस ईश्वरी प्रेरणा झाली आहे असें तें जेव्हां सांगत असत तेव्हां ते खोटें बोलत होते असें नाहीं. ते आपला त्या प्रकारचा स्वतःचा विश्वास व्यक्त करीत होते यांत शंका नाहीं. त्यांना ईश्वरी प्रेरणा झाली होती अशां- तला भाग नाहीं. त्यांची ईश्वरी प्रेरणा म्हणजे आपण ज्यास स्फूर्ति म्हणतों तीहून निराळी होती असें नाहीं. पण तिला ते ईश्वरी प्रेरणाच समजत असत. त्यांस असें वाटे की "आपण तर विद्वान् नाहीं, तर मग आपण कविता करतों तरी कशी? आपणास ज्याअर्थी विद्वत्ता नाहीं त्याअर्थी आपणांस जें काव्यसामर्थ्य आलें तें