पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मागें सर्वथा नुरलेची ॥ ३ ॥ चौदा कल्प मार्के डेया पडे । तैं लोमहर्षणाचा एक लोम घडे । बकदालभ्याचें निमिषे मोडे । गेले एवढे अरे मना ॥ ४ ॥ बकदालभ्याचें पुरे निमिष । तैं वटहंसाचे उपडें पिच्छ । तयासी होतां मृत्यु प्रवेश । तो एक श्वास भृशुंडीचा ॥ ५ ॥ मरणांत पुरे भृशुंडीचा । तैं एक दिवस कूर्माचा । नामा विनवी केशवाचा । वेगीं विठोबाचा पंथ धरा ॥ ६ ॥ " “लाजों नको मना हरीच्या कीर्तना । संसारा पाहुणा दो दिवसांचा ॥ १ ॥ बाळकाचे बोल माउली प्रीति करी । तैसी कीर्ति हरी परिसे चित्ते ॥ २ ॥ भलतीया परी बोले बा श्रीहरी । तो भवसागरीं तारील जाणा ॥ ३ ॥ येणें तारुण्य- पणें भ्रमलासी जणीं । भोगिसी पतनीं जन्मांतरी ॥ १ ॥ तूं होय मागतां हरी होय दाता । शरण जाई अनंता म्हणे नामा ॥ ६ ॥" २९ एकनाथ-मनास उपदेश-अंभगसमुच्चय २६२४० २६७२ यांत रामदासाच्या मनास बोधाचीच पूर्वावृत्ति होय असें वाटूं लागतें. याच्यामध्ये ज्या गोष्टी एकनाथानें मनास बोधिल्या आहेत, त्याच रामदासाने आपल्याहि मनास बोधिल्या आहेत. तथापि रामदासामध्यें नावीन्य नाहीं असें नाहीं. कारण रामदासाच्या स्वभावांत एकनाथापेक्षां जी आत्मसामर्थ्याची जाणीव होती ती दिसून येत आहे. “सदां चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालतो संकटीं स्वामि तैसा ॥ " तसेंच "सम- र्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळीं कोण आहे ॥ ” या तऱ्हेचे जे उद्गार रामदासानें काढले आहेत ते एकनाथाच्या मनास उपदेशांत दिसत नाहींत. एकनाथाच्या मनास उपदेशांत विठ्ठलाकडे दृष्टि आहे तर रामदासामध्ये फक्त रामाकडे दृष्टि आहे. तथापि रामविषयक अनेक उल्लेख एकनाथाच्या मनास उपदेशांत आहेत. "सर्वा भूतीं राम दृष्टीचें देखणें " तसेंच "मन राम रंगले | अवघें मन राम झालें" अशा तऱ्हेचे रामविषयकहि उल्लेख आहेत. खातो. पं. वाचक 66 स्वकाव्यसमर्थनमहत्त्व मनास बोध णारा रामदास हा शेवटचा कवि खास नव्हे. त्याशीं समकालीन जे कवी होते त्यांत एका मोठ्याच कवीनें तोच विषय घेतला आहे आणि त्यांत अनुकरण अगदी स्पष्ट आहे. हा कवि म्हटला म्हणजे वामन होय. रामदासाचे श्लोक भुजंगप्रयात वृत्तांत आहेत तसेच वामनाचेहि आहेत. आणि आपला श्लोक रामदासाचा समं- जला जाऊन आपले श्रेय जाऊं नये म्हणून त्या प्रत्येक श्लोकांत आपले नांव घालून श्लोकावर पक्के शिक्कामोर्तब केलें आहे. या विषयाची आवड घर- "मना वैभवा भूलला व्यर्थ प्राणी । सखे सोयरे दीसतां सौख्य मानी ॥ जिवाचा सखा तूं विचारूनि पाहे । म्हणे वामना मुक्ति सन्नीध आहे" ॥ प्रकरण ७ वे. स्वकाव्यसमर्थन व त्याचें महत्त्व जुन्या मराठी कवींच्या लेखांचें अवलोकन केलें तर त्यांत ग्रंथचर्चामूलक काव्यपरीक्षण- तत्त्वाची विशेष वाढ झालेली दिसत नाहीं. तथापि विशिष्ट काव्यपरक्षिणाकडे दृष्टि जाण्यापूर्वी वाड्म- यांत जे कांहीं खेळ दिसून येतात त्यांत आपले समर्थन, दुसऱ्या संतकवींची स्तुति, ग्रंथांचीं रूपांतरें, अनुकरण इत्यादि गोष्टींचा निर्देश करतां येईल. या विविध प्रकारांचें प्रतिबिंब त्यांच्या ग्रंथांत आपणांस कसे पहावयास सांपडतें, हें मागच्या लेखांत दाखविलेंच आहे. आतां जुन्या कवींच्या आणखी एका वैशिष्टया-- कडे व त्यांच्या कवितेवर आपलेच मत सांग- ण्याच्या पद्धतीकडे वळू मराठी ग्रंथरचनेच्या प्रारंभ- काली मराठी कवितेच्या किंवा मराठी ग्रंथाच्या अस्तित्वाचेंच समर्थन करण्याची जरूरी सर्वोसच भासत होती, आणि हें समर्थन मुकुंदराजाच्या