पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"मोरेश्वर पंताची ऐकुनि कविता मनीं सुकवि लाजे । पावे विवर्णता ते मीं किति वर्णू जनीं सुकविला जे ॥ मोरेश्वरपंताची कविता रसनिपुणसत्सभागेया । अभिमानें सेर्ण्य कवन करितां सम सुरभिवत्स भागे या ॥ आर्या केका करितचि शिरला वाटे मयूर यमक वनीं सुजनासि फार पीडिल म्हणुनि भुलविल किरातयम कवनीं कवितेंत भाषणांतहि भासे मृदुकरोनि ॥ शुकपिका । विश्वफळ श्रीरामा घाली कब तेंवि हा शिशु कपि कसा । सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची ॥ कठिण ग्रंथ म्हणुनिया आर्यातें निंदिती न सुकवी ते मोठ्या, मोठ्या कविचे मान्या यद्भणिति ओष्ठ सुकवीते ॥ सुस्वर कंठें रसिकें आर्या गातां मयूरबाबाची | वेधी सुजनमनातें न तशी धुन ऐकतां रबाबाची ॥ मिळता अन्य नमनि घृत मिळतां जेंवि । । । सद्रासिक तेला वणिज न गंगेच्याहि आणुनि पावेल भद्र सिकतेला ॥ या जन्मताचि गेल्या काशीरामेश्वरा नमायाला । प्रौढपणीं आर्यातें जगतीतलही पुरे न मायाला ॥" महाराष्ट्र कवींच्या कृतीवर अभिप्राय व्यक्त कर- ण्याची आणखी एक पद्धत म्हटली म्हणजे मराठी ग्रंथाची संस्कृतमध्ये रूपांतरें करणें. ही क्रिया दुस्थानांत वारंवार दृष्टीस पडते. प्रथम एखादा ग्रंथ प्राकृतमध्ये होतो आणि त्या ग्रंथास नंतर सार्वजनिकत्व येण्यासाठीं त्याचें संस्कृतमध्ये भाषां- तर होतें. ही क्रिया मराठी कवींचा उदय होण्या- पूर्वी देखील पुष्कळदां झालेली आपणांस आढळते. पाली व अर्धमागधी भाषांत बौद्ध आणि जैन यांनी जे विचार आणले तेच विचार पुढे सार्वजनिक क्षेत्रांत येण्यासाठी संस्कृत रूपां तर पावले. वेताळपंचविशी देखील प्राकृतमध्ये २७ अभिज्ञतेचे प्रकार असावा; ही आपणांस बृहत्कथेंत दृष्टीस पडते. तसेंच पंचतंत्रादि ग्रंथांतील कथा पूर्वी प्राकृत- मध्येच असून संस्कृतामध्ये त्याचीं रूपांतरें झालीं आहेत त्या कथा प्रथम आपणांस जातकांत दिसून येतात. स्वाभाविकतः मनुष्य स्वभाषेमार्फ- तत्र इतरांस कथा सांगतो, त्या कथा इतरांमध्ये पसरतात आणि त्या जेव्हां संस्कृतमध्यें लिहि- ण्याचा हव्यास असलेल्या मनुष्याच्या हातीं लागतात तेव्हां त्या संस्कृत ग्रंथांत जाऊन देशी भाषेतील वाङ्मयाचें संग्राहक वाङ्मय होत बसतात. संस्कृतवाङ्मय येणेप्रमाणे प्रत्येक होतें. व त्या प्रवृत्तीमुळेच आपणांस मराठींतील वाङ्मयाच्या संस्कृत प्रतिकृती झालेल्या आढळ- तात. येणेंप्रमाणें विवेकसिंधूची प्रतिकृति अनंत- मुनीने केली आहे आणि अमृतानुभवाची प्रति- कृति प्रल्हाद बडवे यांनीं केली आहे. व अली- कडे ज्ञानेश्वराची देखील संस्कृतप्रतिकृति जतच्या न्यायाधिशांनीं केली आहे. अनंतमुनि व प्रल्हाद बडवे हे अगदीं अलीकडचे ग्रंथकार होत, आणि यामुळे मराठी ग्रंथांस संस्कृतिकरणाचा मान जरा उशीराच मिळाला. असो. जुन्या कवींच्या काव्याभिज्ञतेचें आणखी एक अंग म्हटलें म्हणजे अनुकरण होय. जेव्हां एक दुसऱ्याचें अनुकरण करतो, तेव्हां तो दुसन्या- विषयीं आपली अभिज्ञताच दाखवितो. याप्रमाणें अनुकरण जुन्या कर्वीत पुष्कळ दिसून येतें. राम- दासाचे मनाचे श्लोक हे अत्यंत लोकपरिचित आहेत हें खरें; दुसऱ्या कोणाचा मनास बोध तितका लोकपरिचित नाहीं. तथापि हा विषय रामदा- सानें जो आपला विषय केला, त्याच्या पाठीमार्गे परंपरा आहे. नामदेवाचा मनास उपदेश हा जर प्रारंभींचा म्हटला तर वावगे होणार नाहीं. त्याच्या- नंतर आपणांस एकनाथाचा मनास उपदेश दृष्टीस पडतो व सरतेशेवटीं रामदासाचा दृष्टीस पडतो. या तिहींमध्ये श्री रामाचा उल्लेख अनेकदा येतो.