पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण होता अशी पूर्वावतारपरंपरा उल्लेखिली आहे. गोरा कुंभाराचें चरित्र नामदेवाच्या चरित्रामध्येच अंतर्भूत केलें आहे. तसेंच सांवतामाळ्याचें चरित्र देखील नामदेवाच्या चरित्रांत घुसडल्यासारखें दिसतें व चोखामेळ्याचें चरित्रहि नामदेवाच्या चरित्राच्या अनुषंगानें सांगितलें आहे ( आवटे गाथा ). २६ कविता करणाऱ्या जुन्या संतांमध्ये कान्हो- पात्रा, गोराकुंभार, सेना न्हावी, सांवता माळी, चोखामेळा, नरहरी सोनार यांचे अभंग पाहतां त्यांत, त्यांनीं आपल्या प्रेरणेविषयीं फारसें लिहि- लेलें नाहीं. निवृत्तिनाथाहि चतुष्टयाची कान्हो- पात्रेनें स्तुति केली आहे. कान्होपात्रा आपल्या अभंगांत “ धन्य कान्होपात्रा आजी झाली. भाग्याची। भेटी झाली ज्ञानदेवाची । म्हणोनिया" असें ज्या अभंगसमुच्चयांत म्हणतो, त्या अभंग- समुच्चयांतच रेड्याच्या मुखें वेद वदविले, चौदाशें वर्षे तप करणाऱ्या चांगदेवाचा गर्व हारविला व भिंत चालविली असा उल्लेख करिते. यावरून ज्ञानदेवाच्या चमत्कारांची प्रसिद्धि त्याच्याच काळांत झाली होती की काय असा प्रश्न उत्पन्न होतो. गोरा कुंभाराचे तीनच अभंगपरिच्छेद (आवटे एकनाथ गाथा १४५) उपलब्ध आहेत, पण त्यांत तो आपल्या प्रेरणेचा उल्लेख करीत नाहीं. तसाच सांवतामाळी ( अभंगपरिच्छेद १-१०) व चोखामेळाहि (अभंगपरिच्छेद १-१४ ) करीत नाहीं. नरहरी सोनार देखील आपल्या काव्य- स्फूर्तीविषयीं कांहींच सांगत नाहीं. सेना न्हावी याचे अभंगपरिच्छेद १६५ आहेत त्यांत तों निवृत्तिनाथ, ज्ञानदेव यांच्याविषयीं तसेंच आपला गुरु गैबीनाथ याच्याविषयीं आदर दाखवितो, परंतु काव्याचा इतिहास या दृष्टीनें तो कांहींच सांगत नाहीं. ज्ञानेश्वर व नामदेव यांच्या ग्रंथा- वर अभिप्राय व्यक्त करणारे कांहीं उतारे येथें देतो. G नामदेवाचा ज्ञानेश्वरीबद्दल अभिप्राय येणें- प्रमाणे:- “ज्ञानराज माझी योग्याची माउली । जेणें निगम- वल्ली प्रगट केली ॥१॥ गीता आलंकार नाम ज्ञाने- श्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ||२|| अध्यात्म- विद्येचें दाविलेसें रूप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥ छपन्न भाषेचा केलास गौरव । भवार्णवी नाव उभारिली ||४|| श्रवणाचे मिषें बैसावें येऊनी। सामराज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभ- वावी ॥ ६ ॥ " जनाबाईचा ज्ञानेश्वरीवरील अभिप्राय येणें- प्रमाणे आहे:- “ गीतेवरी आन टीका । त्यांनी (ज्ञानेश्वर) वाढ - येली लोकां ॥१॥ रान ताटामाजीं । त्यांनी वोग- रिलें कांजी ॥ २ ॥ या ज्ञानेशावांचानी । म्हणे नामयाची जनी ॥ ३ ॥” परसा भागवताचा नामदेवाच्या कवित्वावर अभिप्राय येणेप्रमाणे:- "कविरस वाटोनी क्षीरीस हिंगाची फोडणी । भक्तिवीण आळवणी तैसी केंवी रुचे ॥१॥ तैसें रसाळ अमृत नामयाचें गीत । अनुभवी जाणत तेथींची गोडी ॥२॥ दुधातुपाची वाटी लावोनिया होटी । कांजी तया पोटीं केंवि रुचे ॥३॥ धायवरी जेवी जे तुपेसी क्षीरी । त्यावरी भाकरी नाचण्याची ॥४॥ तैसे केशवाचें प्रेम नामदेव जाणें । तेथील अनुभव परसा म्हणे ||५|| " असेच अनेक कवींचें दाखवितां येईल. कवीं- विषयों प्रशस्त्या उत्तरकालीनांनी लिहावयाची पद्धति केवळ संतांत होती इतरांत नव्हती असें नाहीं. संत या वर्गात जे येत नसत अशा कवींची स्तुति एकमेक करीतच आहेत; उदाहरणार्थ, रामचंद्र बडवेकृत मोरोपंतांची स्तुति प्रसिद्ध आहे:-