पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें . अभिज्ञतेचे तीन प्रकार • आदरव्यक्ति, भाषांतर व अनुकरण जुन्या कवींच्या काव्यविषयक वृत्तीचे सांग- ण्याजोगें दुसरें एक अंग म्हटले म्हणजे, एक- मेकांची केलेली स्तुति होय. तथापि ही स्तुति काव्यविषयक गुणांबद्दल असे असें नाहीं. ही स्तुति संत म्हणून करण्यांत येई. एकमेकां- विषयीं त्याच दृष्टीने आदर दाखविण्यांत येई. मराठीत ग्रंथ करण्याचें समर्थन केल्याने मराठी ग्रंथास स्थैर्य आलें नसतें. त्या ग्रंथाची चहा लोकांत झाली पाहिजे, आणि ही गोष्ट मराठी कवींच्या लक्षांत आली होती. यामुळे प्रत्येक मराठी कवीची वृत्ति आपल्या पूर्वगामीविषयीं आदर दाखविण्याची होती. काव्य ईश्वरीप्रेरणे मुळे झालें असा विश्वास ज्यानें व्यक्त केला व्यावि- षयीं आदरबुद्धि इतर संतांनी दाखविली नसती तर संतमंडळींचें लोकांवर मुळींच वजन पडलें नसतें. एकमेकांविषयी आदर हा संतकवींच्या संप्रदायाचा प्राण होता असे म्हटले पाहिजे. जेव्हां संतमंडळींनी आपला संप्रदाय स्थापन केला तेव्हां त्यांनी एकमेकांविषयीं अत्यादर दाखविला आहे, याविषयी आपणांस ज्ञानेश्वरकालीन वाङ्म- यही साक्ष आहेच. ग्रंथकारांविषयीं आदर सर्व जनतेंत पसरण्यासाठीं ज्या आख्या- यिकावाङ्मयाची आवश्यकता आहे तें आख्या यिकावाङ्मय नामदेवाच्या गाथेत इतकें सपाटून भरले आहे कीं, तें नामदेवाचेच असेल काय अशी शंका स्वाभाविकपणे उपस्थित होते. संतकवी इत- रांविषयीं आपला आदर केवळ स्तवनानेच दाख वितात असें नाहीं तर आख्यायिकांचे रक्षण करून दाखवितात. जुन्या कवींनीं आपले अभिप्राय आपल्या पूर्वीच्या कवींवर व्यक्त केले आहेत, पण क्ष्यांत त्या कवींच्या काव्यगुणावर विवेचन नाहींच ४ १८७३ अभिज्ञेतचे प्रकार असें म्हटलें तरी चालेल. त्यांनां त्यांच्या काव्यगुणा- पेक्षां त्यांची संत व भगवद्भक्त या नात्याने थोरवी गावयाची होती आणि ती त्यांनी अनेक तन्हांनी गाईली आहे. ज्ञानेश्वराच्या मनोहर उपमांपेक्षां ज्ञाने- श्वराने भिंत चालविली, रेड्याकडून वेद बोलविले इत्यादि गोष्टींचीच तारीफ झाली आहे. महिपतीनें संतमंडळींचे चमत्कार वर्णिले आहेत.पण महिपती हा केवळ पूर्वकालीन लेखकांचा कित्ता गिरवीत आहे. संतांचीं चरित्रे लिहिणारा महिपति ह। एकच कवी नाहीं. निरनिराळ्या संतांची निरनिराळ्या कवींनीं लिहिलेली चरित्रे प्रसिद्ध आहेत. आणि यांच्यावर आरत्याहि लिहिल्या गेल्या आहेत. त्या मानाने त्या व्यक्तीवर उत्तरकालीन कवींकडून ज्या मानाने व्यक्तीचें संतमंडळांत महत्त्व असे काव्यपुष्पें अधिक उधळली जात. उदाहरणार्थ, दासोपंत घ्या. याच्याइतकें वाङ्मय दुसऱ्या फारच थोड्या कवींनीं लिहिलें आहे. व दासोपं- ताच्या ग्रंथांचे परीक्षण केलें असतां त्याच्यामध्ये विद्वत्ता अनेक कवींपेक्षां जास्त दिसून येते. असें असतां दासोपंताची प्राचीन कवींमध्ये मोठी चहा होती असें नाहीं. एकनाथानें निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई यांच्या स्तुतीपर अभंग लिहिलेच आहेत. त्याप्रमाणेंच त्याने नामदेव, गोराकंभार, सांवतामाळी व चोखामेळा यांचीं चरित्रे लिहिली आहेत. त्यामध्ये एकनाथाने त्यांच्या काव्याविषयीं मत व्यक्त केलें नाहीं, तर काव्याची प्रेरणा त्याच्या मतें ज्या भक्तीमुळे होई त्या भक्तीची व त्यांच्या आत्मज्ञानाची अभिज्ञता दाखविली आहे. त्याची ज्ञानेश्वराच्या काव्याविषयी प्रशंसा जर असेल तर ती ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्याने एका ओवीत घातली आहे तेवढीच आहे. ती ओवी म्हटली म्हणजे "ज्ञानेश्वरीच्या पाठीं, जो ओंवी घालील मन्हाटी । तेथे अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली ॥” त्याच्या नामदेवचरित्रामध्ये नामदेव पूर्वजन्मीं उद्भव, त्याच्यापूर्वी अंगद व त्याच्याहिपूर्वी प्रद