पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण २४ आहाच सांपडता धंन । त्याग करणें मूर्खपण । द्रव्य घ्यावें सांठवण | पाहोंच नये ॥ ४ ॥ तैसे प्राकृतीं अद्वैत । सुगम आणि सप्रचीत । अध्यात्म लाभे अकस्मात । तरी अवश्य घ्यावें ॥५॥ भाषा पालटें कांहीं | अर्थ वाया जात नाहीं । कार्यसिद्धी ते सर्वही। अर्थाचपासी ॥६॥ तथापि प्राकृत - करितां। संस्कृताची सार्थकथा । येन्हवी त्या गुप्तार्था कोण जाणें ॥७॥ अर्थ सार भाषा पोंचट । अभिमाने करावी खटपट । नाना अहंतेने वाट । बोधिली मोक्षाची ॥८॥” (दशक ७ समास १ ) मुक्तेश्वराचें अनुकरण करणाऱ्या नरहरि मोरे- श्वरानें देखील आपल्या पूर्वीच्या प्राकृत कत्रींवर संस्कृत महाभारतांतील कथेंत फरक केल्याचा आरोप केला आहे. “प्राकृत कवींची वाग्वल्ली । सौभद्र पडिल्या भूमी वरी। लत्ताप्रहार मस्तकावरी । केला सैंधवे संतोषे ॥ सौभद्रे प्राण धरितां कंठीं । होतां धनंजयाची भेटी । गुज सांगतां क्रोधें किरीटी । प्रतिज्ञा करी प्रतापै ॥" प्राकृत भाषेत लिहिण्याबद्दल माफी मागण्याची चाल बरेच दिवस चालू होती असें दिसतें. बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतला मुरारि कवि जुन्या कवींचेंच गाणे गातो. जेव्हां कवि आपण प्रत्येक वाक्य ईश्वराज्ञेनें लिहीत आहों, आपण केवळ ईश्वराच्या हातां- तील बाहुले आहों अशी मांडणी करतो तेव्हां त्याच मनुष्यानें मराठीत लिहिण्याबद्दल माफी मागत रहावें हें अनुचित होईल. तथापि असा प्रसंग फारसा येत नाहीं. मराठीत लिहि- ण्याबद्दल माफी मागणारे बहुतेक लेखक ब्राह्मण आहेत. आणि त्यांतले बहुतेक पंडित आहेत. आपण ईश्वरी प्रेरणेनें किंबहुना त्याच्याच आदे- शाने प्रत्येक वाक्य उच्चारीत आहों असें म्हणणारे बहुतेक कवी कुणबी वगैरे अशिक्षित जातींतले आहेत. तथापि या दोहोंच्या मधला मार्ग कित्येक कवी स्वीकारतात. अशा कवीमध्येच मुरारीचा उल्लेख केला पाहिजे. त्यानें आपल्या कवितेचें श्रेय परमेश्वरी आज्ञेस दिलें नसून गुरुकृपेस दिलें आहे. " तो मुरारि नामें ब्राह्मण पाहीं । इच्छा उदेली त्याच्या देहीं । जे महाराष्ट्र कविता करावी कांहीं । कृपाबळें गुरूच्या ॥ धर्मराजे श्वान तारिला । स्वर्ग- भुवनीं मान्य केला । तैसें माझ्या महाराष्ट्र बोला । पावन सर्वी करावें ॥ धवल अथवा कपिला गाय । भिन्नवर्णे दिसती पाहे । परी दुग्धवर्ण भिन्नता नोहे । स्वाद ऐक्य सारखें ॥ तैसा संस्कृतीं जो कां अर्थ । तोचि प्राकृती जालिया प्राप्त । मग कां तेथ धरावें द्वैत । श्रवणीं सादर असावें ॥ देवें संस्कृत भाषा केली । म्हणोनि विश्ववंद्या झाली । तरी देवाविरहित काय आली । प्राकृत भाषा आज है ।। " मुरारीचें वरील लिहिणें बहुतेक अनुकरणात्मक होतें असें आजगांवकरांनी आपल्या महाराष्ट्र कवि- चरित्रांत दाखवून दिलें आहे. श्रीधराच्या मराठी भाषेतील ग्रंथांचा स्त्रियांस कसा उपयोग होतो त्या विषयींच्या ओव्या प्रसि- द्धच आहेत. " अबलांसि न कळे संस्कृत वाणी । जैसे आडांतलें गोड पाणी । परी तें-दोर पात्रा - वांचनी । अशक्त जना केंवि निधे ॥ तोचि तडागासि येता त्वरें । तात्कालाच तृषा हरे । तेवि अबलाजन तारावया ईश्वरें । प्राकृत ग्रंथ निर्मिले ||" भाषेचा अभिमान कोणत्या तऱ्हेनें धरावा याविषयींचे दासोपंताचें तत्त्व न्या. रानड्यांसा- रख्या उत्तरकालीनांस समजलें नव्हतें असें दिसतें. संस्कृत ग्रंथ अभ्यासावेत पण जें लिहावयाचें तें मराठींतच लिहावें अशी दासोपंताची वृत्ति होती तर अलीकडच्या मराठीच्या दुर्दैवी अभिमान्यांची वृत्ति त्याच्या उलट आहे. संस्कृत वाङ्मयाऐवजीं मराठी वाङ्मयच वाचावें, अशी त्यांची वृत्ति आहे. म्हणजे मूळ श्रेष्ठ वाड्मय न वाचतां त्याची अर्ध्या कच्च्या पढिकांनीं केलेलं रूपांतरेंच वाचीत बसावें असें म्हणण्यासारखे आहे. हा मराठीचा खोटा अभिमान आहे.