पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रंथांतील अर्थ पाहिजे, भाषा केवळ भूस आहे असें तो सांगत असे. ज्ञानाकडे लक्ष न देतां पांडित्याचेंच दंभ मात्र ज्यास करावयाचे असेल त्यानेंच परक्या भाषेत पांडित्य करावें; प्रामाणिक मनुष्यानें स्वभाषेतच स्वजनांनां खरा अर्थ सांगावा. पण ज्याला लोकांस ठकबाठकवीचाच धंदा करावयाचा असेल त्यानें संस्कृत शास्त्रे शिकावीं व वटवट करावी असें त्याचें म्हणणें होतें. दासो- पंताचें मत एकंदरीत असें दिसत होतें कीं, संस्कृत 'शास्त्रे " म्हणून जे वाङ्मय आहे तें आहे तसेंच शिकून त्याचा पुनरुच्चार करीत जाणे ही निव्वळ ठकबाजी आहे. दासोपंत म्हणतो- "अथवा उदरपूर्तिकारणे । योग्यतेचेनि गुणें मूर्ख लोकां ठकर्णे । ऐसे जे ॥ तैं शास्त्रे समग्र शिकावीं । अपार वटवट करावी नाना उपायी आणावी । आपणां योग्यता ॥ नाना विद्या जाणोनी । नाना मतें शिकोनी नानाविध जिंकोनी । वादी लोक ॥ आंगीं योग्यता आणावी । मग ते अभिमानें पोपावी संसारिकप्रति दावावी । साधावा रुका ॥ अर्थप्रयोजनु जया असे । तथा क्रियेची चाड नसे स्वहित स्वप्नींहि न दिसे । तेणें शास्त्रे ॥" तथापि हें सर्व संस्कृत पांडित्य लोकांकडून पैसा काढण्यापुरतेच असतें. व्यवहार आला म्हणजे ते मराठीकडेच धांव घेतात असें दासोपंत सांग- तात. "आतां आला रुका पुरे । मग सांडी संस्कृते उत्तरें । प्राकृता वाणी विचरे । संसारमागौं." I मराठी भाषेत ग्रंथरचना करण्याच्या कृतीचे समर्थन दासोपंताइतकें तीव्रतेने दुसऱ्या कोणी केलेले दिसत नाहीं. पण यास कारण देशी भाषेचें आयुष्याच्या व्यवहारांत स्थान काय असावें याविषयीं दासोपंताइतका दुसऱ्या कोणी विचा- रच केलेला नव्हता. दासोपंताइनपत वृत्ति अली - कडील मराठीच्या अभिमान्यांनीं दाखविली नाहीं. २३ जो गं. पं. बाघ प्रथमकाल मराठींत ग्रंथचरना करण्याची प्रवृत्ति पक्की झाली होती तथापि तिच्याविषयीं तुच्छता लोकांच्या मनांतून गेली नव्हती मुक्तेश्वर म्हणतो- "सुरस सुंदरी पवित्र सृष्टि । पक्वान्नें निपज - बुनीं पाठीं । संस्कृत शब्द सुवर्ण ताटीं । श्रेष्ठ श्रेष्ठां ओगरली | तें रसायण दुर्बलपणीं । महाराष्ट्रभाषा रंभापर्णी । वाढिलें तरी भुकाळु जनीं । न सेविजे किमर्थ॥” ही मुक्तेश्वराची भाषा किती तरी भीत भीत लिहिलेली दिसते. मुक्तेश्वर जरी मराठी भाषेचा संवर्धक होता तरी संस्कृत भाषेतील शब्दांचे महत्त्व त्यास पटलें होतें. आणि आपण एक तेवढे चांगले विद्वान मराठी भाषेच्या अभिवृद्धीस लागलों आहोत पण इतर मराठी ग्रंथकार गचाळ आहेत आणि भाषाहि गचाळच आहे असा त्याचा समज झाला होता. तो संस्कृतचा जाडा पंडित होता अशांतला भाग नाहीं; त्याने ज्या प्रकारची संस्कृत पधे केली तशी आज जर कोणी केली तर त्याचे कान उपटण्यास अनेक टीकाकार धांवतील. मुक्तेश्वराच्या काळांत अगोदर झालेल्या वांडम- याकडे अधिक परीक्षक दृष्टीने पहाण्याची प्रवृत्ति उत्पन्न झाली असावी. या प्रवृत्तीचे स्वरूप मुक्तेश्वराच्या महाभारतांत दृष्टीस पडते. द्रौपदी- स्वयंवर वर्णनप्रसंगी आपल्या पूर्वी भारतकथेवर मराठीत ग्रंथ लिहिणाऱ्या कवींवर मुक्तेश्वराने पुढील ताशेरा झाडला आहे. “प्राकृत कवींचा वाग्जल्प । तैल कढईत पाहूनिया रूप । फिरतां मत्स्य सकंप । वामनेत्रीं विंधिला । परी मूळ भारतांत नाहीं । म्हणोनि असो न बोलों काहीं । नलिका छिद्रांतून पाहीं । यंत्र भेदोनि पाडले. येक म्हणती 'महाठे काय । हें तों भल्यांसी ऐकों नये' । तीं मुखें नेणती सोय । अर्थान्वयाची ॥१॥ लोहाची मांदूस केली । नाना रत्ने सांठ- बिलीं । तीं अभाग्यानें त्यागिली । लोखंड म्हणो ॥ २ ॥ तैसी भाषा प्राकृत । अर्थ वेदांत आणि सिद्धांत । नेणोनि त्यागी भ्रांत । मंद बुद्धिस्तव ॥ ३॥