पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्य परीक्षण • तरी तोचि सेवकां पावन ठावो । तेथें सवेसि न वचता पाहो । दंडी रावो निजभृत्यां ॥ २४ ॥ कां दुर्बळी आणि समर्थ । दोहसराये घातले हात । तरी दोघांसि ही तेथ । सहजचि होत समागम्य ॥ २५ ॥ देशभाषा वैभवें । प्रपंचपदार्थों पालटलीं नावें ॥ परी रामकृष्णादि नाम नव्हे । भाषा वैभवें पाहूं ॥२६ ॥ संस्कृतवाणी देवें केली । प्राकृत तरी चोरापासोनि झाली ॥ असो या अभिमानभुली । वृथा बोली काय काज ॥ २७ ॥ आतां संस्कृत किंवा प्राकृता । भाषा झाली जे हरिकथा || पावनचित्ता | सत्य सर्वथा मानली ॥ २८ ॥ एकनाथानें मराठी भाषेत ग्रंथ लिहिण्याबद्दल आपलें समर्थन करतांना संस्कृत देवानें निर्मिली व प्राकृत चोरापासून आली काय असा द्वंद्वयु- द्धाचा आवेश आणेिला आहे तो आवेश त्याच्या पेक्षां जरा अधिक तरुण पण त्याशींच समका- लीन असलेल्या दासोपंतांत अधिक दिसतो. तो हल्ला प्रतिपक्षाच्या गोटांत नेतो, आणि मराठी भाषेचाच आश्रयं करण्याचें श्रेष्ठत्व स्थापन करूं पहातो. त्याचें म्हणणें असें आहे की, मराठीत शब्दभांडार संस्कृतपेक्षां जास्त आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारांत संस्कृतचें महत्त्व नाहीं आणि सूक्ष्म अर्थभेद दाखवील इतकी व्यापक शब्द- रचना मराठींत आहे तशी संस्कृतमध्यें नाहीं. तो असे दाखवितो की संस्कृत शब्द "घट" घेऊन तुम्ही बाजारांत जा आणि तुम्हांस हवा तो माल मिळतो का पहा. संस्कृतमध्ये निरनिराळ्या आका २२ रांच्या वस्तूंनां “घट" हा एकच शब्द आहे बाजारांत म्हणजे प्राकृत भाषेत प्रकारागणित शब्द आहेत तसें संस्कृतमध्ये कोठें आहेत? “येथे संस्कृतचि केवळ । न सरे नाणें सकळ कोण्ही एक स्थळ । ऐसें आहे ॥ संस्कृतें घटु म्हणती । आतां तयाचे भेद किती कवणा घटाची प्राप्ती । पावावी तेणें हारा, डेरा, रांजणू । मुढा, पडगा, आनु सुगड, तौली, सुजाणु । कैसी बोलेल ॥ घडी, घागरीं, घडौली। अलंदें, बाचिकें, चौळी चिटकी, मोरवा, पातली । सांजवणें तें ॥ . ऐसे प्रतिभाषे वेगळाले । घट असती नामाधिले एके संस्कृतें सर्व कळे । ऐसे कैसेन ॥” "संस्कृतें घटु म्हणती " हे शब्द लिहितांना आज ज्याप्रमाणें "भटें" शब्द वापरतात तशाच अर्थाने आणि वृत्तीने दासोपंतांनी "संस्कृतें" हा शब्द वापरला असावा असा भास होतो. तर दासोपंत प्राकृतभाषादूषकांस म्हणतो- “प्राकृत म्हणोनि दूषिती । तेचि ययाज्ञाना वंचती भाषाचि केवळ भजती । ते मूर्ख कीं ना ॥ हातीं देतां नवरत्ने । मन्हाटेन बोलें, न घेणें संस्कृते बोलले सेवणें । तेंचि सांडावें प्राकृत वचनें आतां हानि तयाकारणे । ते दूरि नसे. ऐसिया मूर्खा मुंडणे । किती आतां ॥' संस्कृत भाषेच्या अभिमान्यांचें मुंडन करूं तीची अभिज्ञता नव्हती असें नाहीं. त्याची इच्छिणाऱ्या दासोपंतास संस्कृत भाषेतील संस्कृ- संस्कृत भाषेविषयीं वृत्ति होती ती केवळ मराठी भाषेच्या अभिमान्याची नसून ज्ञानविकासेच्छूची “संस्कृत असती ग्रंथ । तयांचं जाणावें मत होती हैं पाहून विशेषच कौतुक वाटतें. ऐसें जैं आर्त । उपजे जिवा ॥ तरीचि ते अभ्यासावे । अभ्यासूनि तख जाणावें मग शब्द अवघे सांडावे । न व्हावे आसक्त ॥ कणु घेऊनि भूस । देइजे जैसे पश्वादिकांस तव जाणोनि शब्दास । तैसें सांडावें