पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1094 २१ आणि शिक्षणानें संस्कृत पंडितांच्या कोटींतील होतीं. पण तीं देश्य वाङ्मयाच्या बाजूला वळून निराळाच वाङ्मयसंप्रदाय उत्पन्न करतीं झालीं. आणि त्यांनीं जी परंपरा पाडली तिला तर मराठी काव्यवाङ्मय चिकटलें असें म्हणतां येईल. यावेळेच्या संस्कृत वाङ्मयामध्ये मराठींत चांगले ग्रंथ लिहिणें हा मूर्खपणा आहे अशा तऱ्हेचे विचार दिसत नाहींत. चतुर्वर्गचिंतामणी हा त्या वेळचा मोठा संस्कृत ग्रंथ होय. पण त्यांत मराठी ग्रंथरचनेविषयीं तिरस्कार कोठेच नाहीं. या वरून मराठीचा तिरस्कार त्या वेळची हेमाद्रि, बोपदेव यांच्यासारखी अगदीं वरच्या दर्जाची मंडळी करीत नसावी. तथापि त्या वेळचा शास्त्री वर्ग एकंदरींत प्राकृत ग्रंथांकडे तुच्छतेनें पहात असल्यास नवल नाहीं.त्यांची टीका आज शिल्लक मात्र राहिली नाहीं. त्यांचें अस्तित्व ग्रंथकारांच्या टीकेस दिलेल्या उत्तरांवरूनच कळून येत आहे. टीकाकार नेहमी मोठ्या योग्यतेचे असतात असें नाहीं. त्यामुळे त्यांचे शब्द टिकून रहात नाहींत.कार्यकर्ता क्वचितच निघतो पण टीकाकार मात्र हवे तितके निघतात, त्यांचा परिणाम जरी होत असला तरी निंदकांची निंदा फारच थोडा काल टिकते पण त्या निंदेचा परिणाम जर निंदित कवीच्या इतर काव्यांवर झाला असेल तर तो मात्र शिल्लक रहातो; आणि कवींनीं कोणत्या परिस्थितींत ग्रंथ लिहिले हे कवी आपल्या कृती- संबंधाने आपल्या तर्फेची कैफियत मांडतात ती- वरूनच उत्तरकालीनांस समजतें. मराठी वाङ्म- याच्या प्रथम कालांत कवींच्या कृतींचें परीक्षण व्हावयाच्या ऐवजीं त्यांच्या परिश्रमाच्या उपयुक्तते- संबंधानेंच प्रश्न उपस्थित होत असला पाहिजे हैं मुकुंदराज, ज्ञानेश्वर, एकनाथ व दासोपंत इत्यादि- कांच्या लेखांवरून दिसून येतें. तो काल त्यांच्या कृतींचें अंतरंग परीक्षून मत देण्याचा नव्हता, तर त्यांच्या प्रयत्नांच्या उपयुक्ततेविषयींच संशय प्रथमकाल घेणारा होता, व त्यांच्या त्या प्रकारच्या आक्षेपांस कवींनी उत्तरे दिलीं आहेत. कांहीं उत्तरे येथे मासल्यासाठीं देतों. " म्हणौनि मज काहिं । समर्थनीं आतां विषो नाहीं गीता जाण हे वाङ्मई । श्रीमूर्तिप्रभूची । आतां आइती गीता जगीं । मी सांधें महटिया भंगीं । एथ कैचा विस्मया लागि। ठा ॐ असे॥” ज्ञानेश्वरांनी त्यांच्यावर समकालीनांकडून शक्य होणाऱ्या टीकेची आठवण खालील वाक्यांत रक्षिली आहे. शब्दु “तन्हि पुरोहित गुणें । बोलिला पुरें उणें । तें तुम्ही माउली पणें उपसाहिजो जी ॥१ अलंकारु म्हणिजे | काइ तें नेणें ॥२ कैसा घडिजे । प्रमेय कैसेयां पढिजे । साएखेडाचे बाउलें। चालवी तेच्या सूत्राचेनि चाले। तैसा मातें दाविती बोलें । स्वामी तो माझा || " आतां एकनाथाला मराठी भाषेचा कैवार घेऊन ज्या अस्तन्या साराव्या लागल्या त्याची पुढील ओव्यांनी आठवण देतों. या ओव्यांचा मराठीच्या अभिमान्यांनी इतका वारंवार उच्चार केला आहे कीं, त्या बऱ्याच लोकांस पाठ झाल्या असतील. “संस्कृतग्रंथकर्ते महाकवी । प्राकृतीं काय उणीवी । नवीं जुनी म्हणावीं । कैसेन केवीं सुवर्णसुमनें ॥ए. भा. १.१२१॥ कपिलेचें म्हणावें क्षीर | मग इतरांचें का नीर | वर्णस्वादें एकचि मधुर । दिसें साचार सारखें ॥२२॥ जे पाविजे संस्कृत अर्थे 1 तेंचि लाभे प्राकृतें | तरी न मानावया येथें । विषमचि तें कायीं ॥२३॥ कां निरंजनीं बसला रावो ।