पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण २० नाहीं, अशिष्टांनींच लिहावें असा रिवाज महा- राष्ट्रांत असावा. पण लेखन मात्र चालूच असावें. ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ एकाएकीं मराठींत झाले नाहींत. भाषा विचारव्यक्तीसाठी हळूहळूच तयार होत असते, मुकुंदराज व ज्ञानेश्वर हे मराठीतील आद्यग्रंथकार खास नाहींत. जैन व बौद्ध ग्रंथका- रांनी देखील मराठीचा उपयोग केला असला ( पाहिजे आणि महानुभावांची परंपरा ज्ञानेश्वरपूर्व आहेच. तथापि हे सर्व शिष्टवाङ्मयाचेच उत्पा- दक आहेत. यांच्या अगोदर मराठीमध्यें काव्यें करणारांचा एक जुना वर्ग होताच आणि तो म्हटला म्हणजे लावण्या, पोवाडे करणारांचा होय. लावण्यांची परंपरा शातवाहनांपासून सुरू झाली ती एकसारखी चालूच असली पाहिजे. पण त्यांचें काव्य तयार होऊन लोकांच्या मुखीं व्हाव- याचें आणि नंतर दुसऱ्याचें काव्य लोकमुखी झालें म्हणजे पूर्वीचें काव्य विस्मृतिपंथास जावयाचे असा प्रकार चालू होता. हालाची सप्तशती आहे हा एक संग्रह आहे. निरनिराळ्या कवींच्या लावण्या त्यांत एकत्र केलेल्या आहेत. आणि त्या वेळेसच ती लावणी म्हणणाऱ्यांची परंपरा स्थापित झाली होती असें दिसतें. नटांचे अस्तित्व जुन्या काला- पासून आहे. नाटकांतील पडदे, नटांचा अभि- नय (१६. ३७४) राजाराणीची सोंगें घेणारे लोक, आणि नायकिणी यांचा उल्लेख ज्ञानेश्वरानें केलाच आहे. त्यावरून ज्ञानेश्वरपूर्वकालीन वाङ्मय- याची कल्पना होते. तेव्हां लोकांची वृत्ति झाली होती ती अशी- महत्त्वाच्या विषयावर संस्कृत मध्ये लिहावें आणि केवळ सामान्य लोकरंजनार्थ जें लिहिणें असेल तेवढेच मराठींत पहावें. ही वृत्ति अजून पालटली नाहीं. वैज्ञानिक वाङ्म याची परंपरा मराठींत पूर्णपणे स्थापन करावी ही बुद्धि अजून स्थापित झाली नाहीं. आणि मराठीस देशशासनदृष्ट्या महत्त्व आल्याशिवाय ती परंपरा चांगली स्थापित होणार नाहीं. सामाजिक आयु- ष्यक्रमांत काव्यनाटकादि लोकरंजनार्थ होणाऱ्या वाङ्मयापेक्षां प्राकृतभाषेस कांहीं अधिक स्थान द्यावें असे लोकांस वाटत नव्हतें. ज्ञानेश्वरादि संतकवींनी लोकरंजनार्थ होणाऱ्या वाङ्मयांत भर टाकली नसून पारमार्थिक वाङ्मयाची भर टाकली. तथापि मराठीनें पूर्वपरंपरागत ग्रंथांचें केवळ दास्य न पत्क- रतां आपली स्वतंत्र राष्ट्रीय संस्कृति तयार करावी या वृत्तीचा देखील उदय होत होता असें दिसतें. पण ती वृत्ति फोफावली नाहीं. मराठीनें आपलें स्वतंत्र वाङ्मय करावें, संस्कृतमध्यें ग्राह्य असेल तेवढे घ्यावें, असें केल्याने संस्कृतमधील पूर्वकालीन सर्व प्रकारच्या कल्पनांचे दास्य उत्पन्न होत नाहीं इत्यादि विचारपरंपरा जरी दासोपंतानें पुढे मांडली तरी ती कल्पना महाराष्ट्रांत रुजलीच नाहीं. महा- राष्ट्र दासोपंताचे ध्येय घेण्याइतका स्वतंत्र बुद्धीचा बनला नव्हता. त्याला जर कांहीं अनुयायी मिळते तर दासोपंताचे वाङ्मयध्येय उत्कर्ष पावलें असतें, व मराठी राज्यांत त्यास चांगलीं फळें आलीं असतीं, असो. मुकुंदराय, ज्ञानेश्वर यांनी जें कार्य केलें तें प्रतिष्ठित ग्रंथरचनेस मराठींत सुरवात केली हे होय. मुकुंदराय व ज्ञानेश्वर हे सामाजिक दृष्टीने लावण्या रचणाऱ्या वर्गातील नसून सुशिक्षित मंडळींत मोडत होते. यासाठी आपण ज्या वर्गात मोडतों त्या वर्गानें आपल्या कृतीकडे सप्रेम पहावें ही इच्छा त्यांच्या मनांत होती. आणि यासाठीं ते जेव्हां कोणाला उत्तर देतांना दृष्टीस पडतात तेव्हां तें याच वर्गाला उद्देशून असतें. सुशिक्षित ब्राह्मणवर्ग हा आपलें वाड्मय आणि आपला अभ्यास समाजांतील उच्च वर्गाच्या लोकांच्या आश्रयानें करीत होता. त्या वर्गाकडून मराठींतील वाङ्मय दुर्लक्षिलें जाई. या नवीन होणाऱ्या मराठी वाङ्मयाला कोणताहि निश्चित अधार मिळाला नसतां तर झालेले वाङ्मय टिकलेच नसतें आणि नवीन उत्पन्न झालें नसतें. ज्ञानेश्वर मुकुंदराज हीं माणसें जन्मतः